भक्तीचे पोटीं बोध कांकडा ज्योती कांकडा ज्योती ॥
पंचप्राणें जिवें भावें ओंवाळू आरती ॥ १ ॥
ओवाळूं आरती सद्गुरूनाथा, माझ्या पंढरीनाथा ॥
दोनी कर जोडुनी चरणी ठेविला माथा ॥ धृ. ॥
काय महिमा वर्णु आतां सांगणें किती, आतां सांगणें किती ।
कोटी ब्रह्मगत्या मुख पाहातां जाती ॥ २ ॥
राई रखुमाई दोघी उभ्या दोघाही उभ्या दोघाही ॥
मयूरपुच्छचामरें झळकति ठायींचे ठायी ॥ ३ ॥
इटेसहित पाउलें मनभावें ओंवाळी, मनभावें ओंवाळी ॥
कोटी रविशशि दिव्य उगवले ठायीचे ठायीं ॥ ४ ॥
तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनींत शोभा ॥उन्मनींत शोभा ॥
इटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.