नगाधिराज हिमालय हे आम्हा भारतीयांचे भूषण आहे . हि हिमालयाची भूमी पुरातन कालापासून सिद्धांची तपोभूमी म्हणून प्रसिध्द आहे . काही वर्षापूर्वी माझ्या माहितीचे एक साधक हिमालयाच्या यात्रेस गेले होते , तिथून परत आल्यावर ते मला म्हणाले , " चीनने हिमालयाच्या बाजूने भारतावर कितीही हल्ले चढवले तरी ते यशस्वी होणार नाहीत. कारण हिमालयावर साक्षात भागवान शंकरांचा वास असून ती तपोभूमीत अनेक सिद्ध महापुरूष तपश्चर्या करीत आहेत , असा तेथील रहिवाशांचा ठाम विश्वास आहे !" हिमालयावर साक्षात भगवान संकर वास करत आहेत हि कल्पना पुराण कालापासून चालत आलेली आहे; परंतु ती एक पुराणकथा म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केले तरी त्या तपोभूमीत अनेक सिद्धपुरुषांचा वास आहे हि गोष्ट दुर्लक्षितता येणार नाही . कारण या सिध्दपुरुषांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य काही भाग्यवंतांना लाभले आहे . या संदर्भात एका महान योगींराजांनी सांगितलेली हकीकत लक्षात ठेवण्यासारखी आहे. या योगिरजनचे नाव आहे श्री. जोती:प्रकाशाश्रमजी. त्यांनी हि आश्चर्यकारक गोष्ट प्रथम श्री. दिवाकर शास्त्री सांगितली पुढे श्री. दिवाकर शास्त्री यांच्याकडून ती श्री . रामदास शरणदास यांना समजली व त्यांनी ती 'कल्याण' मासिकाच्या नोव्हेंबर १९६२ च्या अंकात खास जिज्ञासू वाचकांसाठी लेखन्रुपने प्रसिद्ध केली लेखरुपाने प्रसिध्द केली . ती सारीच हकीकत जितकी विस्मयकारक तितकीच मनोरंजकदेखील आहे. योगी श्रि. जोती:प्रकाशाश्रमजी हे जातीने ब्राम्हण. बालपणापासूनच त्यांच्या मनात रामादर्शनाची ओढ निर्माण झाली आणि माता - पित्यांच्या निधनानंतर ती ओढ इतकी वाढली, की सर्वसंगपरित्याग करून ते हिमालयाच्या कुशीत शिरले. हिमालयात अनेक सिध्द महात्मे तपश्चर्या करीत असतात हि गोष्ट त्यांनी अनेकांकडून ऐकली होती ; परंतु या ऐकीव माहितीवर त्यांचे समाधान होऊ शकले नाही . या सिध्द पुरुषांना प्रत्यक्षच पाहावे अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु झाले . प्रथम बद्रीनारायणाचे दर्शन घेऊन त्यांनी हिमालय पर्वत चढण्यास सुरवात केली. कित्येक दिवस ते मार्गक्रमण करीत होते. वाटेत एका भयंकर वनराजाने त्यांना दर्शन देऊन चांगलेच घाबरवून सोडले. त्यावेळी त्यांनी मनात रामनामाचा जप सुरु केला आणि आश्चर्य असे , की तो सिंह त्यांच्या डोक्यावरून उडी मारून गुपचूप पुढे निघून गेला ! हि सारी प्रभू रामचद्रांचीच कृपा असे स्वामीजींना वाटले आणि त्यांनी त्यांच्या दर्शनासाठी त्या निर्मनुष्य ठिकाणी घोर तपश्चर्येस प्रारंभ केला . त्यांनी आपल्याबरोबर हिमालयात सापडणारा एक विशिष्ट कंद घेतला होता. तो कंद खाल्ल्यावर आठवडाभर भूक लागत नसे आणि , विशेष म्हणजे तो पाचावयासही हलका होता. त्या ठिकाणी काही औषधी वनस्पतीही उगवलेल्या होत्या. त्या वनस्पतींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या वनस्पती रात्रीच्या अंधारात प्रकाशत असत आणि त्यांचा प्रकाश त्यांच्यापासून चांगला चार-पाच फुट अंतरापर्यंत पडत असे ; परंतु त्यांना स्पर्श करताच तो प्रकाश अपोआपच लुप्त होत असे. अश्याप्रकारे कित्येक दिवस त्या निर्जनस्थळी उग्र तपश्चर्या केल्यानंतर स्वामीजींना एक जटाधारी ब्रम्हचारी भेटला. त्याने स्वामीजींकडे पाहत शुद्ध संस्कृत भाषेत विचारलं,'कस्त्वम , कुतश्च्र समायात:' (म्हणजे …तु कोण आणि इथे कशासाठी आला आहेस?) ; परंतु स्वामीजींना संस्कृत बेताचेच येत असल्याने त्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे हिंदी भाषेत दिली. प्रथम आपलं नाव सांगून ते म्हणाले ,"या हिमालयावर मोठमोठे सिद्धपुरुष तपश्चर्या करीत असल्याचे मी अनेकांच्या तोंडून ऐकले आहे. त्या महापुण्यवान सिद्धपुरुषांचे दर्शन घडावे , या हेतूने मी इथे आलो आहे ." त्यावर तो जटाधारी ब्रम्हचारी किंचित हसून म्हणाला ," मित्रा , तू म्हणतोस तसे सिद्धपुरुष हृषीकेशपासून पुढे सर्व हिमालयावर पसरलेले आहेत; परंतु सामान्य माणसांना ते कसे दिसतील ? मला सांग ? तू गायत्री मंत्राचे किती पुरुश्चरणे केली आहेस? किंवा कोणती तू आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचे प्रयत्न केले आहेस? तू जर यांपैकी काहीच केले नसशील तर मुकाट्याने परत फिर" अश्याप्रकारे त्या ब्राम्हचाऱ्याने आमच्या योगीमहाराजांना त्यांच्या विचारांपासून परावृत्त करण्याचे पुष्कळ प्रयत्न केला ; परंतु योगीमहाराज काही गंम्मत म्हणून त्या ठिकाणी आलेले नव्हते सिद्धपुरुषांचे दर्शन घेतल्याशिवाय परत फ़िरयचेच नाही, अश्या निर्धारानेच ते तेथे आले होते. ते त्या ब्राम्हचाऱ्याच्या उपदेशाला थोडीच बधणार? त्यांनी स्पष्ट शब्दात त्या ब्रम्हचाऱ्याला सांगितले ," महाराज, क्षमा करा . मी आता परत फिरू शकणार नाही इथे राहूनच राम मंत्राचा जप करीन मग जशी प्रभूची इच्छा असेल तसे घडेल ?" योगीराजांचे ते निर्धाराचे बोल ऐकून तो जटाधारी ब्रम्हचारी म्हणाला ," ठीक आहे ! जशी तुझी इच्छा " आणि असे म्हणून त्यांनी योगीराजांना कसलीशी बुटी दाखवून म्हटले ," या बुतिच एक तोळा अर्क काढून तू प्यायला असता सात दिवसांपर्यंत तुला भूक लागणार नाही आणि तुझी शक्तीही कमी होणार नाही. तुझी इच्छा असल्यास तू हिच उपयोग कर. त्यानंतर त्याने योगीराजांना एका प्रचंड वटवृक्षाखाली नेउन म्हंटले," तू या वृक्षाखाली बसून तपश्चर्या कर. हे स्थान तपश्चर्येसाठी योग्य आहे." तो वटवृक्ष पाहून योगी विस्मयचकित झाले, कारण त्याचा परीघ जवळ जवळ एक मैल पसरला होता , आणि त्याची उंचीही फारच प्रचंड होती. त्या वृक्षाचे दुसरे वैशिष्ट्य असे होते , की थंडीच्या दिवसांत त्याच्या खालचे वातावरण गरम राहत असे तर उन्हाळ्याच्या दिवसांत ते अतिशय थंड बनत असे. त्या दिवसापासून योगीराजांनी तेथेच बसून आपली तपश्चर्या पुढे सुरु केली. असेच दहा-बारा महिने गेल्यानंतर तो पूर्वीचाच ब्रम्हचारी अचानक एक दिवस तिथे आला आणि योगीराजांना म्हणाला," मित्र, आता तपश्चर्या बस झाली! तू आता देशावर जाऊन अध्यात्मशास्त्राचा अभ्यास कर , नि मग वाटलं तर पुन्हा इकडे ये ." परंतु योगीराज पूर्वीच्याच निग्रही स्वरात म्हणाले ," महाराज! कृपा करून आता मला परत जाण्यास सांगू नका. मी इथे आलो ते सिद्धपुरुषांच्या दर्शनाची इच्छा बाळगूनच! माझी ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी मुळीच परत जायचा नाही." त्यावर तो ब्रम्हचारी थोडा वेळ विचारात पडला. नंतर तो उठून उभा राहिला आणि त्याने योगीराजांना आपल्या पाठोपाठ येण्यास सांगितले. योगीराज म्हणतात, की ,"थोडे अंतर चालून गेल्यावर आम्ही एका प्रचंड शिळेजवळ आलो. त्या शिलेवर एक योगी समाधी लावून बसलेला होता. त्याने पद्मासन घातलेले होते. तो इतका उंच होता, कि तो माझ्यासमोर बसला असूनसुद्धा माझ्यापेक्षा अधिक उंच दिसत होता! त्याच्या जाता जमिनीवर लोंबत होत्या. त्याच्या भ्रुकुतिचे केस दाढीसारखे लांब वाढले होते. त्याची नखे सिंहाच्या नखासारखी दिसत होती. " त्याच्याकडे बोट करून ब्रम्हचारी म्हणाला," हेच माझे पूज्य गुरुदेव! गेली शंभर वर्षे हे समाधी अवस्थेत आहेत. चल , आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना? आता मी तुला तुझ्या वटवृक्षाजवळ घेऊन जातो. कारण तुला एकट्याला तो रस्ता सापडणार नाही." असे म्हणून त्याने मला माझ्या पूर्वीच्या वटवृक्षाजवळ आणून सोडले आणि मी पुन्हा माझ्या तपश्चर्येला सुरवात केली. त्यानंतर थोड्याच दिवसांनी तो ब्रम्हचारी पुन्हा त्या योगीराजांकडे आला व म्हणाला ," आता जप करून तुझे मन पुष्कळच पवित्र झालेले आहे. चल , मी तुला आता आणखी काही अदभुत गोष्टी दाखवतो." त्याचे ते भाषण ऐकून योगीराजांना फार आनंद झाला आणि ते त्या जटाधारी ब्रम्हचार्याबारोबर निघाले. बराच वेळ चालल्यानंतर ते दोघे एका प्रचंड गुहेपाशी आले . त्या गुहेच्या तोंडाशी एक खूप मोठा वजनदार दगड होता; परंतु त्या जटाधारी ब्रम्हचार्याने अगदी सहजपणे तो बाजूला केला व ते दोघे आतमध्ये गेले. योगीराज म्हणतात,"नंतर आम्ही आठ तास सतत चालत होतो , शेवटी आम्ही त्या गुहेच्या पार टोकाशी आलो . तेथेही एक प्रचंड दगड दाराशी बसविलेला होता . ब्राम्हचारीबुवांनी तो पूर्वीसारखाच अगदी सहजपणे बाजूला केला आणि आम्ही बाहेर आलो. त्यांची ती विलक्षण ताकद पाहून मी तर थक्कच झालो. आता आमच्या समोर एक प्रचंड मोठे मैदान पसरलेले दिसत होते. त्याला लागुनच एक भव्य असा किल्ला होता . या किल्ल्यात कितीतरी महात्मे , सिद्धपुरुष समाधी लावून बसलेले आम्ही पाहिले. त्यांच्या बाजूला असंख्य फळा -फुलांनी नटलेले कितीतरी वृक्ष आणि वेळ होते. त्याचप्रमाणे स्वच्छ पण्याचे झरेही झुळझुळ वाहत होते . "हे कोणते स्थान आहे?" योगीराजांनी कुतूहलाने जटाधारी ब्राम्हचार्याला विचारले . "हा अर्जुनाने बांधलेला किल्ला आहे. मुनिश्रेष्ठ व्यासांच्या सांगण्यावरून अर्जुन या ठिकाणी तपश्चर्येसाठी आला होता ."ब्रम्हचारी म्हणाला . नंतर त्यांनी अंगुली निर्देश करून तो ब्रम्हचारी पुढे म्हणाला , " हे जे पुरुष तुला दिसताहेत , ते सारे महाभारत काळापासून इथे समाधी लावून बसले आहेत "
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel