महाभारत एक प्राचीन ग्रंथ असून यामध्ये विविध नायक आहेत. त्यामधीलच एक नायक भीष्म पितामह हे आहेत. सर्वांना माहिती आहे की, पितामह भीष्म यांनी महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने युद्ध केले होते. परंतु फार कमी लोकांना त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी माहिती असाव्यात. उदा. पूर्वजन्मात कोणत होते भीष्म पितामह, कोणाच्या शापामुळे त्यांना मनुष्य योनीत जन्म घ्यावा लागला. त्यांचे गुरु कोण होते आणि त्यांना गुरुसोबत युद्ध का करावे लागले? भीष्म पितामह महाभारताच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंतच्या प्रत्येक घटनेतील एक नायक होते. त्यांनी आयुष्यभर केलेल्या प्रतिज्ञेचे पालन केले आणि हस्तिनापुरला सुरक्षित हातांमध्ये पाहूनच प्राणत्याग केला. आज (27 जानेवारी, मंगळवार) भीष्म अष्टमी आहे. धर्म ग्रंथानुसार या दिवशी भीष्म पितामह यांनी प्राणत्याग केला होता. या निमित्ताने आम्ही तुम्हाला भीष्म पितामह यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या काही खास गोष्टी सांगत आहोत. पूर्वजन्मात वसु होते भीष्म महाभारताच्या आदी पर्वानुसार एकदा पृथु, वसु पत्नीसोबत मेरु पर्वतावर भ्रमण करत होते. तेथे विशिष्ठ ऋषींचा आश्रम होता. एका वसु पत्नीची दृष्टी वशिष्ठ आश्रमात बांधलेल्या नंदिनी नावाच्या गायीवर पडली. तिने ती गाय तिच्या द्यौ नावाच्या वसुला दाखवली आणि ती गाय आपल्याकडे असावी अशी मागणी केली. पत्नीच्या इच्छापूर्तीसाठी द्यौने भावंडांच्या मदतीने त्या गायीचे हरण केले. वशिष्ठ ऋषी आश्रमात आल्यानंतर त्यांनी दिव्य दृष्टीने सर्व घटना जाणून घेतली आणि क्रोधामध्ये त्यांनी वसुंना मनुष्य योनीत जन्म घेण्याचा शाप दिला. त्यानंतर सर्व वसु वशिष्ठ ऋषींची माफी मागण्यासाठी त्यांच्याकडे आले. तेव्हा वशिष्ठ ऋषींनी सांगितले की, तुम्ही सर्वजण लवकरच मनुष्य योनीतून मुक्त व्हाल परंतु या द्यौ नावाचा वसुला सर्व कर्माचे भोग भोगण्यासाठी दीर्घ काळापर्यंत पृथ्वीलोकात राहावे लागेल. महाभारतानुसार द्यौ नावाच्या वसुने गंगापुत्र भीष्म रुपात जन्म घेतला. शापाच्या प्रभावामुळे ते दीर्घकाळापर्यंत पृथ्वीवर राहिले आणि शेवटी इच्छामृत्युने प्राणत्याग केला. - कसा झाला भीष्म पितामह यांचा जन्म? भीष्म पितामह यांच्या वडिलांचे नाव शांतनु होते. एकदा शांतनु शिकार करताना गंगातटावर पोहोचले. तेथे त्यांना एक परम सुंदर स्त्री दिसली. त्या स्त्रीला पाहून शांतनु तिच्यावर मोहित झाले. शांतनुने तिला लग्नाची मागणी घातली. त्या स्त्रीने लग्नाला होकार दिला आणि एक अटही घातली की, तुम्ही कधीही मला कोणतेही काम करण्यासाठी आडवणार नाहीत, असे कल्यास त्याचक्षणी मी तुम्हाला सोडून निघून जाईल. शांतनुने अट मान्य करून तिच्याशी लग्न केले. त्यानंतर दोघांचे वैवाहिक आयुष्य सुखात व्यतीत होऊ लागले. शांतनुच्या घरात सात मुलांनी जन्म घेतला परंतु सर्व मुलांना पत्नीने गंगा नदीमध्ये टाकले. शांतनु हे सर्व पाहूनसुद्धा शांत होते कारण पत्नीला दिलेले वचन ते मोडू शकत नव्हते. आठवा मुलगा झाल्यानंतर त्यालाही पत्नी गंगेत टाकत असताना शांतनुने तिला अडवले आणि विचारले, तू असे का करत आहेस ? त्या स्त्रीने सांगितले की, मी देवनदी गंगा असून ज्या मुलांना मी यामध्ये टाकले आहे ते सर्वजण वसु होते. यांना वशिष्ठ ऋषींनी शाप दिला होता. यांना मुक्त करण्यासाठी मी या सर्व मुलांना नदीमध्ये प्रवाहित केले आहे. तुम्ही अट मोडल्यामुळे मी आता जात आहे. त्यानंतर गंगा शांतनुच्या आठव्या मुलाला सोबत घेऊन गेली. - भीष्म पितामह यांचे खरे नाव काय होते? शांतनुच्या आठव्या मुलाला गंगा घेऊन गेल्यानंतर शांतून खूप उदास राहू लागले. काही काळानंतर शांतनु गंगेच्या काठावर फिरत असताना त्यांना जाणवले की, गंगा नदीमध्ये पाणी खूप कमी राहिले असून ते प्रवाहित होत नाही. हे रहस्य जाणून घेण्यासाठी ते थोडसे पुढे गेले. तेथे त्यांना एक युवक अस्त्रांचा अभ्यास करताना दिसला आणि त्याने बाणांच्या प्रभावाने गंगेचे पाणी आडवले होते. हे दृश्य पाहून शांतनुने चकित झाले. तेवढ्यात तेथे शांतनुची पत्नी गंगा प्रकट झाली आणि सांगितले की, हा तुमचा आठवा मुलगा असून याचे नाव देवव्रत आहे. याने वशिष्ठ ऋषींकडून वेदांचे अध्ययन केले असून परशुरामांकडून सर्व शस्त्रांची विद्या आत्मसात केली आहे. हा श्रेष्ठ धनुर्धर असून याचे तेज इंद्रासमान आहे. देवव्रतचा परिचर देऊन गंगा त्याला शांतनुकडे सोडून गेली. शांतनुने देवव्रतला राज्यात आणून त्याला युवराज घोषित केले. गंगापुत्र देवव्रतने व्यवहारकुशलतेने सर्व प्रजेला प्रभावित केले होते. या कारणामुळे देवव्रतचे नाव भीष्म पडले.. एक दिवस राजा शांतनु यमुना नदीच्या काठावर फिरत असताना त्यांना एक सुंदर युवती दिसली. ओळख विचारल्यानंतर तिने स्वतःचे नाव निषाद कन्या सत्यवती सांगितले. तिच्या सौंदर्यावर शांतनु राजा मोहित झाला होता आणि तिच्या वडिलांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा त्या युवतीच्या वडिलांनी एक अट ठेवली की, माझ्या कन्येपासून उत्पन्न झालेला मुलगा राज्याचा उत्तराधिकारी असेल. ही अट ऐकून शांतनुने निषाद राजाला नकार कळवला कारण त्यांनी देवव्रतला युवराज घोषित केले होते. या घटनेनंतर राजा शांतनु शांत राहू लागले. देवव्रतने याचे कारण वडिलांना विचारले, परंतु त्यांनी काहीही त्याला सांगितले नाही. तेव्हा देवव्रतने शांतनूच्या मंत्र्याकडून सर्व घटना जाणून घेतली आणि स्वतः निषाद राजाकडे वडिलांसाठी त्या युवतीचा हात मागण्यासाठी गेला. निषाद राजाने देवव्रतसमोरही तीच अट ठेवली. तेव्हा देवव्रतने प्रतिज्ञा घेऊन सांगितले की, तुमच्या मुलीच्या गर्भातून उत्पन्न झालेला मुलगाच महाराज शांतनु यांच्या राज्याचा उत्तराधिकारी असेल. त्यानंतर निषाद राजा म्हणाला की, तुझ्या मुलाने माझ्या मुलीच्या मुलाचा वध करून राज्य प्राप्त केले तर काय होईल? तेव्हा देवव्रतने आजीवन ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली आणि सत्यवतीला घेऊन शांतनु राजाकडे गेला. त्यानंतर राजा शांतनुने देवव्रतला इच्छामृत्युचे वरदान दिले. देवव्रतच्या या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांचे नाव भीष्म पडले. या कारणामुळे देवव्रतचे नाव भीष्म पडले.. एक दिवस राजा शांतनु यमुना नदीच्या काठावर फिरत असताना त्यांना एक सुंदर युवती दिसली. ओळख विचारल्यानंतर तिने स्वतःचे नाव निषाद कन्या सत्यवती सांगितले. तिच्या सौंदर्यावर शांतनु राजा मोहित झाला होता आणि तिच्या वडिलांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा त्या युवतीच्या वडिलांनी एक अट ठेवली की, माझ्या कन्येपासून उत्पन्न झालेला मुलगा राज्याचा उत्तराधिकारी असेल. ही अट ऐकून शांतनुने निषाद राजाला नकार कळवला कारण त्यांनी देवव्रतला युवराज घोषित केले होते. या घटनेनंतर राजा शांतनु शांत राहू लागले. देवव्रतने याचे कारण वडिलांना विचारले, परंतु त्यांनी काहीही त्याला सांगितले नाही. तेव्हा देवव्रतने शांतनूच्या मंत्र्याकडून सर्व घटना जाणून घेतली आणि स्वतः निषाद राजाकडे वडिलांसाठी त्या युवतीचा हात मागण्यासाठी गेला. निषाद राजाने देवव्रतसमोरही तीच अट ठेवली. तेव्हा देवव्रतने प्रतिज्ञा घेऊन सांगितले की, तुमच्या मुलीच्या गर्भातून उत्पन्न झालेला मुलगाच महाराज शांतनु यांच्या राज्याचा उत्तराधिकारी असेल. त्यानंतर निषाद राजा म्हणाला की, तुझ्या मुलाने माझ्या मुलीच्या मुलाचा वध करून राज्य प्राप्त केले तर काय होईल? तेव्हा देवव्रतने आजीवन ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली आणि सत्यवतीला घेऊन शांतनु राजाकडे गेला. त्यानंतर राजा शांतनुने देवव्रतला इच्छामृत्युचे वरदान दिले. देवव्रतच्या या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांचे नाव भीष्म पडले. भरतवंशी राजा शांतनुला सत्यवतीपासून दोन पुत्र झाले - चित्रांगद आणि विचित्रवीर्य. दोघेही पराक्रमी आणि हुशार होते. चित्रांगद युवावस्थेत असतानाचा राजा शांतनुचे निधन झाले. त्यानंतर भीष्माने सत्यवतीच्या आज्ञेने चित्रांगदला सिंहासनावर बसवले. काही काळानंतर त्याचेच नाव असलेल्या गंधर्वराज चित्रांगदने याचा चित्रांगद राजाचा वध केला. त्यानंतर भीष्माने विचित्रवीर्यला राजा बनवले. विचित्रवीर्यच्या लग्नासाठी योग्य मुलीचा शोध चालू अतानाच काशी राज्याच्या राजाने मुलींच्या स्वयंवराचे आयोजन केले होते, परंतु काशी नरेशने द्वेषपूर्वक हस्तिनापुरला निमंत्रित केले नाही. यामुळे क्रोधीत भीष्माने स्वयंवरात जाऊन सर्व राजकुमार आणि काशी नरेशला पराभूत करून त्याच्या तिन्ही मुली अंबा, अंबिका व अंबालिका यांना हस्तिनापुरला आणले. त्यानंतर काशी नरेशाची मोठी मुलगी अंबाने भीष्माला सांगितले की, मी राजा शाल्वला मनापासून पती मानले आहे. त्यानंतर भीष्माने अंबाला जाण्याची परवानगी दिली आणि इतर दोन मुलींचे विचित्रवीर्यसोबत लग्न लावले. भीष्माने का केले स्वतःच्या गुरुसोबत युद्ध - महाभारतानुसार, अंबाला भीष्माने जाण्याची परवानगी दिल्यानंतर ती राजा शाल्वकडे गेली. परंतु राजा शाल्वने तिचा स्वीकार केला नाही. कारण अंबाचे भीष्माने हरण केले होते. त्यानंतर अंबाला या सर्व घटनेमागे भीष्म कारणीभूत असल्याचे जाणवले. ती भीष्माचे गुरु परशुराम यांच्याकडे गेली आणि त्यांना सर्व घटना सांगितली. अंबाचे म्हणणे ऐकून भगवान परशुराम यांनी शिष्य भीष्माला तिच्यासोबत लग्न करण्यात सांगितले. परंतु ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केल्यामुळे भीष्माने लग्नाला नकार दिला. त्यानंतर परशुराम आणि भीष्म यांच्यामध्ये भीषण युद्ध झाले आणि आपल्या पितरांचे म्हणणे ऐकून परशुराम यांनी अस्त्र ठेवले. अशाप्रकारे युद्धात कोणाचाही जय झाला नाही आणि पराजय झाला नाही. पुढील जन्मात अंबाने शिखंडी रुपात जन्म घेतला आणि भीष्माच्या मृत्यूचे कारण ठरली. भीष्म पितामह यांनी युधिष्ठीरला दिला होता विजयी होण्याचा आशीर्वाद कौरव आणि पांडवांचे युद्ध सुरु होत असताना धर्मराज युधिष्ठीर रथामधून उतरून कौरवांच्या सैन्याकडे निघाले. कौरव सैन्यामध्ये जाऊन युधिष्ठीरने सर्वात पहिले भीष्म पितामह यांना नमस्कार केला आणि युद्ध करण्याची परवानगी मागितली. तेव्हा भीष्म पितामह म्हणाले की, जर यावेळी तू माझ्याकडे आला नसतात तर तुमी तुला पराजयाचा शाप देणार होतो. परंतु आता मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू युद्धाला सुरुवात कर, विजय तुझाच आहे. तेव्हा युधिष्टिरने भीष्म पितामह यांना सांगितले की, तुम्हाला युद्धामध्ये कोणीही पराभूत करू शकत नाही मग आम्ही कसे जिंकणार. भीष्म पितामह म्हणाले की, या युद्ध भूमीमध्ये मला कोणी पराजित करेल असे मला वाटत नाही आणि माझ्या मृत्यूची निश्चित अशी कोणतीच वेळही नाही. यामुळे तू मला एखाद्या दुसर्‍या वेळी येउन भेट. भीष्मावर श्रीकृष्ण झाले क्रोधीत - पांडव आणि कौरवांचे युद्ध सुरु झाल्यानंतर कौरवांचे सेनापती भीष्म पितामह होते. युद्धाच्या तिसर्‍या दिवशी भीष्म पितामह यांनी पांडवांच्या सैन्यावर बाणांचा वर्षाव करून त्यांना भयभीत केले. हे पाहून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की, तू भीष्म पितामय यांच्यासोबत युद्ध कर. अर्जुन आणि भीष्म यांच्यामध्ये भयंकर युद्ध झाले परंतु थोड्यावेळाने अर्जुन कमजोर पडला आणि पांडवांचे सैन्य सैरावैरा पळू लागले. हे पाहून श्रीकृषणाला खूप राज आणि ते रथातून खाली उतरले. श्रीकृष्ण सुदर्शन चक्र घेऊन भिष्मावर चाल करून गेले. श्रीकृष्णाचे हे रूप पाहून भीष्म जराही घाबरले नाहीत. भगवान श्रीकृष्णाला अशा रुपात पाहून अर्जुन त्यांना थांबवण्यासाठी त्यांच्या मागे पळाला. अर्जुनाने श्रीकृषणाला मी युद्धात कमजोर पडणार नाही असे वचन दिले. अर्जुनाच्या सांगण्यावरून श्रीकृष्ण शांत झाले आणि पुन्हा रथावर चढले. भीष्म पितामह यांनी स्वतःच सांगितले स्वतःच्या मृत्यूचे रहस्य - महाभारत युद्धामध्ये भीष्म पितामह यांनी पांडवांचे असंख्य सैन्य नष्ट केले. पांडव देखील भीष्म पितामह यांचे हे रूप पाहून घाबरले. तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णाला भीष्म पितामह यांना हरवण्याचा मार्ग विचारला. श्रीकृष्णाने सांगितले की, हा उपाय स्वतः भीष्मच सांगू शकतात. त्यानंतर पांडव भगवान श्रीकृष्णासोबत भीष्म पितामह यांना भेटायला गेले. भीष्म पितामह यांनी पांडवाना सांगितले की, तुमच्या सैन्यामध्ये शिखंडी नावाचा एक राजा आहे, जी पूर्वी स्त्री होता आणि नंतर पुरुष झाला. अर्जुनाने जर शिखंडीला पुढे करून माझ्यावर बाण चालवले तर मी धनुष्य उचलणार नाही. या संधीचा लाभ घेत अर्जुनाने मला जखमी करावे. अशाप्रकारे माझ्यावर विजय प्राप्त करून तुम्ही या युद्धात यश प्राप्त करू शकता. असा झाला भीष्म पितामह यांचा पराभव - महाभारत युद्धाच्या दहाव्या दिवशी भीष्म पितामह यांनी पांडवांचे भरपूर सैन्य नष्ट केले. हे पाहून युधिष्ठीरने अर्जुनाला भीष्म पितामह यांच्यासोबत युद्ध करण्यास सांगितले. अर्जुनाने शिखंडीला पुढे करून युद्धाला सुरुवात केली. शिखंडीला पाहून भीष्म पितामह यांनी अर्जुनावर बाण चालवले नाहीत आणि त्यानंतर अर्जुनाने बाणांच्या शय्येवर पितामह पडले. बाणाच्या शय्येवर पडल्यानंतर पितामह यांचे शीर पूर्वेकडे होते आणि त्यांनी पाहिले की, सूर्य सध्या दक्षिणायनमध्ये असून हा काळ मृत्यूसाठी ठीक नाही. यामुळे त्यांनी त्यावेळी प्राणत्याग केला नाही. महाभारत युद्ध समाप्तीनंतर भगवान श्रीकृष्ण युधिष्ठीरला म्हणाले की, सध्या पितामह बाणांच्या शय्येवर आहेत. तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन त्यांना नमस्कार करून तुमच्या मनात जे काही प्रश्न, शंका असतील त्याविषयी त्यांना विचारा. त्यानंतर युधिष्टिर भीष्म पितामह यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याकडून धर्म, अर्थ, काम आणि मोक्षचे ज्ञान प्राप्त केले. युधिष्ठीरला ज्ञान दिल्यानंतर भीष्म पितामह म्हणाले की, आता तू न्यायपुर्वक शासन कर आणि सूर्य उत्तरायणात गेल्यानंतर माझ्याजवळ ये. जेव्हा सूर्यदेव उत्तरायणात गेले तेव्हा युधिष्ठीर सहित सर्व लोक भीष्म पितामह यांच्याजवळ पोहोचले. त्यांना पाहून भीष्म पितामह म्हणाले की, या तीक्ष्ण बाणांवर मी 58 दिवसांपासून शयन करत आहे. श्रीकृष्णाकडे पाहून त्यांनी प्राणत्याग करण्याची इच्छा व्यक्त केली. असे म्हणून ते काही काळ शांत पडून राहिले आणि मनासहित प्राणवायू क्रमशः भिन्न-भिन्न धारणांमध्ये स्थापित करू लागले. भीष्माचा प्राण ज्या अवयवाचा त्याग करून बाहेर पडत होता, त्या अवयवातील बाण खाली पडत होते आणि जखमही भरत होती. भीष्माने देहाचे सर्व द्वार बंद करून प्राण थांबवला आणि यामुळे प्राण मस्तक (ब्रह्म रंध्र) फोडून आकाशात निघून गेला. अशाप्रकारे महात्मा भीष्म यांचे प्राण आकशात विलीन झाले. साभार : दैनिक भास्कर ..
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel