प्रकरण १२
जवळ  जवळ मध्य रात्र झाली होती सौम्या तिच्या खुर्चीत बसून पाणिनी कडे घाबरून बघत होती .  ते दोघे बाहेरून जेवून ऑफिस मधे आल्यापासून पाणिनी सतत येरझाऱ्या घालत होता .बाहेरचे जेवण सुद्धा त्यांना चवीने घेता आले नव्हते.
 “ घरी जा  सौम्या”  पाणिनी म्हणाला. तिने मानेने नकार दिला.” आपल्याला काही कळे पर्यंत मी जाणार नाही.
“ सव्वा बारा वाजून गेले आहेत. संध्याकाळपासून पोलीस  जयकर च्या घराजवळ ठाण मांडून बसले आहेत.साडे दहा वाजता त्यांना संशय  यायला सुरुवात झाली की त्याने त्यांच्या हातावर तुरी दिली आहे. “ सुमारे साडे अकरा ला त्यांची खात्रीच पटली  आता ते पुढील कारवाई करतील .पोलिसांना माहीत आहे की अनन्याआणि  जयकर फरार आहेत . जयकर हा तिच्या विरुद्ध चा साक्षीदार असू शकतो त्यची साक्ष सुरक्षित राहील यासाठी हवे ते उपाय पोलीस करतील .”
“दुसऱ्या शब्दात सांगयचे तर ते दोघे लग्न करणार आहेत याचा आगाऊ अंदाज ते बांधतील ?” सौम्या ने विचारले.
“ पोलीस मूर्ख नाहीत ही कल्पना त्यांच्या डोक्यात या घटकेला आहेच.’
“ काय करू शकतात ते?”
“ बरंच काही.”
“ उदाहरणार्थ?”
“ एक तर राज्याच्या सीमेवरील नाके तपासू शकतात, वेगास किंवा युमा मधे रेडिओ च्या माध्यमातून प्रक्षेपण करू शकतात. त्या दोघांना  लग्न करण्याची एकच संधी होती ती म्हणजे पोलिसांच्या लक्षात येण्यापूर्वीच स्वतंत्र  विमानाने युमा ला जाणे.”
सौम्या जवळ जवळ रडण्याच्याच अवस्थेत होती.” मी यात मधे घुसले म्हणून ही वेळ आली तुम्ही येई पर्यंत मी थांबले असते आणि तुम्हालाच सांगू दिले असते की विमानाने जा, आणि...”
“ वकिलाने कायदा धाब्यावर बसवणे अपेक्षित नसते.”
“ तुम्ही अप्रत्यक्ष पणे सांगू शकला असता.माझी आशा आहे की त्यांनी लग्नाच सर्व जमवलं असावं.”
पाणिनी ने पुनश्च येरझऱ्या घालायला सुरवात केली. “ कनक ला समजलं असेल?” सौम्या ने विचारले.
“ तो सगळ्याचाच एकाच वेळी आढावा घेतोय. त्याला समजेलच.”
“ पोलिसांना जी बाटली तळ्यात मिळाली त्यात विषारी गोळ्या किती होत्या?”
“ आपल्याला अजून समजलं नाही. पोलीस आपल्याला विश्वासात घेत नाहीत अजून. हेरंब खांडेकर हुशार असतील तर प्रकरण कोर्टात आल्यावरच कळू देतील ते. ”
“  जयकर आणि अनन्याचे लग्न झाल्यावर  जयकर तिच्या विरुध्द साक्ष देऊ शकणार नाही आणि तुम्ही हे प्रकरण सहज सोडवाल ? “
“ काहीतरी , कुठेतरी चुकतंय, बऱ्याच विषारी गोळ्यांच्या बाटल्याचा विषय विचारात घ्यावा लागणार आहे.पोलिसांनी एक तळ्यातून काढली.  जयकर ने एक संडासात टाकली,म्हणजे दोन झाल्या. नंतर एक गोड गोळ्यांची बाटली तळ्यात टाकली गेली होती म्हणजे एकूण  तीन झाल्या. दोन विषाच्या एक साधी. “
‘’ पण मग मिलिंद बुद्धीसागर ने गोड गोळ्यांची  तळ्यात टाकलेली बाटली ? “
“ तो नाकारणार ते.पोलीसाना ते माझ्यावर आणायला आवडेल. आपण त्या हाय टाईड हॉटेल वर अनन्याला का व कसे भेटायला गेलो या बद्दल  जर मिलिंद बुद्धीसागर ने खोटी कथा चांगली रचून सांगितली तर ते त्याला फार कठोर पणे नाही वागवणार.”
“ पण  तुम्हाला शोधून काढता येणार नाहीत  असे त्याच्या गोष्टीत कच्चे दुवे नसतील?”
पाणिनी काही बोलायच्या आधीच फोनची रिंग जोरात वाजली.सौम्या ने फोन घेतला, पलीकडून ओजस बोलत होता. पाणिनी ला जवळ उभे राहून फोन मधील कर्कश्य आवाज ऐकू येत होते.सौम्या च्या चेहेऱ्या वरून काय झाले ते ऐकायची गरज पाणिनीला पडली नाही.त्याने बाहेर पडण्याची तयारी सुरु केली. लाईट घालवले, आपली हॅट घेतली.
“ पोलिसांनी त्या दोघांना  लग्न करण्यासाठी जाताना रस्त्यातच पकडले.तो मूर्ख  स्वतःची गाडी चालवत निघाला होता.पोलिसांनी पेपर वाल्यांना बातमी पुरवली आहे., ओजस ने आपल्याला वाटेत त्याच्या ऑफिस मध्ये थांबायला सांगितलंय.” सौम्या म्हणाली.
पाणिनी ने सौम्या च्या कंबरे भोवती हात टाकले.त्याच्या खांद्यावर  तिचं डोक ठेऊन तिला मोकळे पणाने रडू दिलं ! “
(प्रकरण 12 समाप्त)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel