प्रकरण १५

राज्य सरकार विरुध्द अनन्या गुळवणी असा खटला उभा राहिला तेव्हा पत्रकारांचे दृष्टीने  ‘ त्यात हवी ती  सर्व नाट्यमयता ’ होती. पत्रकारांनी आरोपीचा अत्यंत सुंदर म्हणून उल्लेख करून आधीच प्रसिद्धी दिली होती.आता हे सर्व श्रुत झालं होत की तिच्यावर प्रेम करणाऱ्याला आता तिच्याच विरुध्द साक्ष देण्यासाठी सक्ती केली जाईल कारण पळून जाऊन लग्न करण्यापूर्वीच ते पकडले गेले. अशीही एक वदंता होती की सरकारी वकील अस सिध्द करणार आहेत की वरपांगी लाजाळू आणि सुंदर दिसणारी आरोपी ही प्रत्यक्षात अत्यंत थंड माथ्याची ब्लॅक मेलर आहे. आणि जेव्हा मिरगल ने  तिच्या या  ब्लॅक मेलिंग ला न घाबरता,तिला  जयकर शी लग्न करायला विरोध केला  तेव्हा तिने त्याला विषप्रयोग करून मारले.
या शिवाय या खटल्यात अनेक कायदेशीर बाबींचा थरार होता. आरोपीचा वकील पाणिनी पाणिनी पटवर्धन, हा आपल्या नाविन्य पूर्ण आणि अपारंपारिक क्लुप्त्यांसाठी मनाला जातो तोच अशा क्लुप्त्या लढवताना रंगे हात पकडला गेला होता. साध्या गोळ्यांची बाटली तळ्यात टाकून  पाणिनी पटवर्धन ने पुराव्यात गोंधळ निर्माण केला  असे  सिध्द करण्यात जरी अडचण असली तरी सरकारी वकील तशा प्रयत्नात होते.
 औषधाच्या अंमलाखाली असताना डॉक्टरां समोर टेप रेकॉर्डवर आरोपीने दिलेला कबुली जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो का ?  हा तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दा ही होता.
या क्षेत्रातील वर्तुळात अस बोललं जात होत की या खटल्यात पाणिनी पाणिनी पटवर्धन ला बचाव करण्या सारखे फारसे काही नाही, सतत कायदेशीर त्रुटी काढत राहणे , तांत्रिक बाबींवर हरकती घेणे असे करून खटला लांबवणे एवढेच त्याच्या हाती आहे.
तो हा खटला जिंकू शकेल का यावर दहा स एक या प्रमाणात पाणिनी पटवर्धन च्या विरोधात सट्टे लागले होते.
आणि आता. हेरंब खांडेकर कोर्टाच्या आवारात शिरत होते...
न्यायाधीशांची निवड झाली होती , त्यांना शपथ दिली गेली होती. खांडेकररांनी केलेले  प्राथमिक भाषण म्हणजे बचाव पक्षाला तिखट  पण सभ्य शब्दात वाहिलेली शिव्यांची लाखोली होती. 
त्यांनी त्याच्या भाषणाचा शेवट करताना म्हंटल, “ न्यायाधीशतल्या सभ्य स्त्री पुरुषांनी आरोपीच्या वकिलांनी पत्रकारांना उद्देशून केलेले विधान वाचले असेल, की ‘ माझी अशील ही योगायोगाने घडलेल्या परस्पर विरोधी घटनांची शिकार बनली आहे ‘ आम्ही सिध्द करणार आहोत की आरोपी ही योगायोगाने नाही तर जाणून बुजूनच खुनी, ब्लॅक मेलर झाली.आणि बरबादीच्या गर्तेत गेली.”
 एवढे बोलून त्यांनी कंबरेत वाकून नाटकी पणाने न्यायाधीश नं अभिवादन केले.आणि दमदार पावलं टाकत वकिलांसाठी राखून ठेवलेल्या जागी मांडलेल्या आसनावर जागा अडवल्या सारखे बसले. त्यांचा आवेश असा होता की विरोधी पक्षाला नेस्तनाबूत करायची ताकद त्यांच्यात होती.
“बचाव पक्षाला काही  बोलायचं आहे का?” न्यायाधीशांनी विचारले
“ अत्ता यावेळी नाही बोलायचे.” पाणिनी म्हणाला.” म्हणजे प्राथमिक भाषण करायची गरजच नाही. कारण खांडेकर नी जे सिद्ध करायच्या वल्गना केल्या ते कधीही सिध्द होवू शकणार नाही.” एवढ्याच बोलण्यातून.पाणिनी ने खांडेकर च्या लंब्याचवड्या भाषणातली हवाच काढून घेतली.
न्यायाधीश हिरण्यगर्भ सरकारी वकिलांकडे वळून म्हणाले, “ तुमचा पहिला साक्षीदार बोलवा.”
“डॉ. नितीन राजे” खांडेकर नी नाव पुकारले.
डॉक्टरांनी पुढे येऊन शपथ घेतली. डॉक्टरांची पदवी, सर्जन म्हणून त्यांची योग्यता,या बद्दल उलट तपासणीचे हक्क राखून ठेवत पाणिनी ने मान्यता दिली त्यामुळे या गोष्टी बद्दलचे प्रश्न खांडेकर यांना विचारण्याची गरज पडली नाही. “ डॉक्टर,तुम्ही मिरगल हयात असताना आणि त्याच्या शेवटच्या आजारपणात त्याच्यावर  रुग्ण म्हणून उपचार करत होता?”
“ होय “
“ मिरगल शेवटच्या घटका मोजत असताना तुम्ही त्याच्या सोबत होतात?”
“ तो गेल्या नंतर थोड्या वेळाने मी आलो.”
“ त्याची त्यावेळी शारीरिक स्थिती कशी होती? तुमच निरीक्षण काय होते?”
‘ माझ्या लक्षात आलं की त्वचेवर लालसर पणा आला आहे., एक पूर्व इतिहास आहे.....”
“एक मिनिट,” पाणिनी मधेच उठून उभा राहिला. “  माझी या पूर्व इतिहासाला हरकत आहे कारण हो गोष्ट ऐकीव आहे. डॉक्टर मी समजतो की हे तुम्ही नर्सेस ने तुम्हाला सांगितलेल्या माहिती च्या आधारे म्हणताय.”
“हो बरोबर.” डॉक्टर म्हणाले.
“ मग ते ऐकीव आहे. तुम्ही फक्त शरीराच्या प्रत्यक्ष स्थिती बद्दल बोला.” न्यायाधीश हिरण्यगर्भ म्हणाले.
“माझ्या लक्षात आलं की त्वचेवर लालसर पणा आला आहे, त्याला जेव्हा झटका आला तेव्हा तो चॉकलेट पीत होता.”
“एक मिनिट,” पाणिनी  पुन्हा उठून उभा राहिला. “ या उत्तरातला शेवटचा भाग विचारात घेऊ नये, चॉकलेट बद्दलचा. कारण तो भाग म्हणजे साक्षीदाराने काढलेला निष्कर्ष आहे.आणि दिलेले उत्तर हे, विचारलेल्या प्रश्नाचे नाही.”
“ ते वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून साक्ष देत आहेत. ते त्यांचे मत हे तज्ज्ञ म्हणून देऊ शकतात.” खांडेकर म्हणाले.
“ त्यांनी वैद्यकीय निष्कर्ष काढू देत.पण परिस्थितीजन्य पुरावा या विषया मधील ते तज्ज्ञ नाहीत. जे बघितले तेवढेच त्यांना सांगू दे. योग्य वेळ येईल तेव्हा त्यांनी वैद्यकीय अनुमान काढू दे.” पाणिनी म्हणाला.
“ ओ हो, हा एक तांत्रिक मुद्दा आहे.” खांडेकर यांनी नाराजी व्यक्त केली.
“ बचाव पक्ष आपणास सूचित करू इच्छितो की या खटल्याची परिस्थिती बघता, तांत्रिक बाबी मधे  कायद्याने देऊ केलेल्या  प्रत्येक सवलतीचा फायदा घेण्याचा आमचा इरादा आहे. ज्याचा उल्लेख सरकारी वकील तांत्रिक बाब असा  करत आहे ते प्रत्यक्षात, आरोपी अन्यायाने गुन्हेगार ठरवला जाऊ नये म्हणून  कायद्याने आरोपीला दिलेले सुरक्षा कवच आहे. बचाव पक्षाचा आग्रह आहे की यातील एकही संरक्षण दुर्लक्षिले जाता काम नये.”
“ बचाव पक्षाचे म्हणणे मान्य केले जात आहे. डॉक्टरांच्या उत्तरातील चॉकलेट बद्दलचा भाग वगळण्यात आला आहे. ” न्यायाधीशांनी आदेश दिला.
“ ठीक आहे.” खांडेकर चिडून म्हणाले.
“ डॉक्टर तुम्ही काय बघितलंत? तुम्हाला जे दिसलंय तेवढचं सांगा कारण तुम्ही अत्ता दुसऱ्या वकिलांनी काय हरकत घेतली ते पाहिलंय.” खांडेकर म्हणाले.
“ मी मिरगलला पाहिले. तो गेलेला होता. त्वचेवर मी लाल छटा बघितली.फरशीवर  फुटलेल्या कपाचे तुकडे बघितले.मी खाली सांडलेले आणि मिरगल च्या शर्टवर ओघळलेले  एक पातळ पेय पाहिले त्याला चॉकलेट चा वास येत होता.”
“ छान, जेव्हा कोर्टाच्या आदेशानुसार, मिरगलचे  पुरलेले प्रेत पुन्हा उकरून काढले गेले तेव्हा तुम्ही हजर होतात? “
“ मी होतो हजर.”
“ शव विच्छेदन प्रक्रियेत तुम्ही मदत केली?”
“होय”
“ त्या प्रक्रियेनंतर तुम्ही मृत्यूचे कारण काय होते याचे अनुमान काढले?’’
“ हो.”
“ काय कारण होते?”
“ मी अनुमान काढले की हर्षल मिरगल शरीरात विष गेल्यामुळे मरण पावला.”
“ विषाच्या प्रकारा  बद्दल तुमचे अनुमान काय होते?”
“ पोटॅशियम सायनाईड “
“ घ्या उलट तपासणी.”  खांडेकर विजयोन्मादाने म्हणाले.
पाणिनी उभा राहिला, ‘’ सरकारी वकिलांनी उल्लेख केलेली सर्व लक्षणे,तुम्ही मिरगल ला पाहिलेत तेव्हा तुमच्या लक्षात आली होती?” 
“ हो “
“ तुम्ही त्या सर्वांचा विचार केला होता?”
“  नाही, मी पहिली ती.”
“ तुम्ही ती काळजी पूर्वक विचारात घेतली नाही?”
“ त्या वेळी नाही.”
“ का?”
“ कारण त्या सर्व गोष्टींचे एकत्रित महत्व तेव्हाच काय अजूनही माझ्या लक्षात आलेले नाही.”
“तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टर म्हणूनच बोलावले गेले होते?”
“ अर्थात”
“ तो माणूस गेल्याचे तुम्हाला माहीत होते?”
“ हो”
“ तुम्हाला माहीत होते की दाखल्यात  मृत्यूचे कारण द्यावे लागणार आहे.?”
“ हो”
“ म्हणून तुम्ही शरीराची  तपासणी करून आणि आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेऊन मृत्यूचे कारण निश्चित केलेत?”
“ हो , आणि नाही सुध्दा.”
“ म्हणजे काय?”
“ म्हणजे मला म्हणायचं आहे की मी वरवरचीच तपासणी केली.”
“ आणि अशी वरवरची तपासणी करून मृत्यूचे कारण काय असावे याचा निर्णय घेतला?”
“ मी मृत्यू दाखला सही करून दिला.”
“ प्रश्न टाळू नका डॉक्टर .मी तुम्हाला विचारतोय की त्यावेळी तुम्ही कारणा बाबत निर्णय घेतला की नाही.”
“ हो”
“ आणि तुम्ही ठरवलं की रक्त वाहिन्यात रक्ताच्या गुठळ्या होऊन तो गेला?  बोला डॉक्टर, ठरवलं की नाहीत? “
“ हो”
“ आणि ते कारण नमूद करून तुम्ही दाखल्यावर सही केली?”
“ हो सर.”
“ आणि आता तुम्हाला वाटतंय की ते कारण देण्यात तुमची चूक झाली होती?”
“ नक्की वाटतंय”
“ आता तुम्हाला वाटतंय की मिरगल रक्त वाहिन्यात रक्ताच्या गुठळ्या होऊन गेला?  “
“ मला माहिती आहे आता की तो त्या कारणाने गेला नाही.”
“ तुम्हाला मान्य आहे की त्याच्या मृत्यूचे कारण देताना तुमची चूक झाली.”
“हो सर आणि मला त्या मागची कारण मिमांसा सांगायची आहे.”
“मला ते ऐकण्यात सध्या तरी रस नाही. “ पाणिनी म्हणाला .” मला एवढंच ऐकण्यात रस आहे की तुम्ही चुकीचा निष्कर्ष काढलात की नाही? हो किंवा नाही या स्वरुपात उत्तर द्या.”
“ हो.” डॉक्टरांचे ओठ रागाने थरथरत होते.”
“ चॉकलेट प्याल्यामुळे रक्त वाहिन्यात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात का?”
“ बिलकुल नाही.”
“ ज्या क्षणी मिरगल गेला तेव्हा त्याच्या मृत्यूचा दाखला आपल्याला द्यावा लागणार आहे हे तुम्हाला माहीत असेल ना?”
“ अर्थातच, स्वाभाविकपणे.”
“ म्हणून तुम्ही ते कारण शोधण्यासाठी आजू बाजूला पाहिलेत?”
“ मी नेहेमीच्या पद्धतीने जसे इतरत्र ही लक्ष देतो  तसे.”
“ तुम्हाला म्हणायचयं की तुमची नेहेमीची पद्धत ही निष्काळजी पणाची आणि भोंगळ पणाची आहे?”
“ अजिबात नाही.”
“ तुम्हाला म्हणायचयं की तुमची नेहेमीची पद्धत ही मृत्यूचे कारण ठरवण्यासाठी वापरली गेली नाही?”
“ नक्कीच नाही.”
“ तुम्हाला इथल्या न्यायाधीशांची अशी समजूत करून द्यायची आहे का की  त्या वेळेला मृत्यूचे कारण ठरवताना,तुम्ही तुमचं व्यावसायिक कौशल्य,अनुभव,अंदाज सर्व काही पणाला लावले होते?”
“ मला कबूल करावेच लागेल की त्वचेवरील लाली चा मुद्दा माझ्या डोक्यातून निसटला.”
“ म्हणजे, तुम्हाला इथल्या न्यायाधीशांची अशी समजूत करून द्यायची आहे का की  त्यावेळी तुम्ही तुमचं व्यावसायिक कौशल्य पूर्ण क्षमतेने वापरले नाही?”
“ म्हणजे... मी... चुकीचे अनुमान काढले एवढेच मी म्हणू शकतो.”
“म्हणजेच तुम्ही तुमच्यातले सर्वोत्कृष्ट असे दिले नाही.”
“ मान्य नाही हे मला, मी सर्वोत्कृष्ट असेच  दिले.”
“ तुम्ही सर्व वस्तुस्थिती आणि परिस्थिती विचारात घेतली होती?”
“ नक्कीच ! “
“ मग या म्हणण्याला अर्थ काय तुमच्या की त्वचे वरील लालसर पणा तुम्ही विचारात घेतला नाही?”
“ त्यावेळेला त्या लालसर पणाचा मृत्यूच्या कारणाशी काही संबंध असेल असे मला वाटले नाही.”
“ तुमच्या नजरेस तो लाल पणा आला होता?”
“हो, लक्षात आला होता.”
“ मृत्यूचे कारण ठरवताना जे अन्य मुद्दे गृहित धरले होते त्यात हा पण मुद्दा होता?”
“ हो विचारात घेतला होता.” डॉक्टर म्हणाले.
“ आणि नंतरच ठरवलं की हा लालसर पणा  रक्ताच्या गुठळ्या मुळे मृत्यू आल्याचे दाखवतो.”
“ नक्कीच नाही, उलट पक्षी, असा  लालसर पणा  सायनाईड मुळे किंवा कार्बन मोनोक्साईड मुळे  मृत्यू आल्याचे दाखवतो.”
“ तुमच्या  हे त्यावेळी लक्षात आलं ?”
“ हो”
“ आणि तुम्ही ते मृत्यू चे कारण ठरवताना विचारात घेतले?”
“ हो, एका अर्थी.”
“ आणि त्यावेळी सायनाईड मुळे मृत्यू झाला असेल असे तुम्हाला वाटले नाही?”
“ त्यावेळी नाही वाटले.”
“ कारण काय?”
“ कारण त्यावेळी मला त्यावेळेच्या परिस्थिती मधील काही घटनांची  माहिती  नव्हती. ज्याच्यामुळे नंतर संपूर्ण प्रकरणाला वेगळाच पैलू प्राप्त झाला.”
‘  त्या गोष्टींची माहीती झाल्यावर नंतरच्या काळात तुम्ही तुमचे मत बदललेत ?”
“ त्याचे प्रेत बाहेर काढून विच्छेदन केल्यानंतर “
“ त्यावेळी तुम्ही त्या लालसर डागाचे महत्व लक्षात घेतले?”
“ हो”
“ म्हणजे कोणी तरी नंतर तुम्हाला काहीतरी सांगितले म्हणून तुम्ही तुमचे मत बदलले?”
“ नाही सर तसे नाही.”
“कोणी तरी नंतर तुम्हाला काहीतरी सांगितले म्हणून त्वचेच्या लालसर पणाबद्दल तुम्ही तुमचे मत बदललेत ?”
डॉक्टर घुटमळले. असहाय्य पणे त्यांनी सरकारी वकिलांकडे पाहिले. “ मी अस म्हंटल की प्रकरणातील पूर्व इतिहास बघून .”
“ जेव्हा तुम्ही पूर्व इतिहास असं म्हणताय तेव्हा त्याचा अर्थ कोणीतरी तुम्हाला सांगितलेली गोष्ट?”
“ हो”
“ म्हणजेच तुम्ही तुमचे मत ऐकीव पुराव्याच्या आधारे बदलले?”
“ मी तसे म्हणालोच नाही.”
“त्वचेच्या लालसर पणाबद्दल तुम्ही तुमचे मत ऐकीव पुराव्याच्या आधारे  बदललेत ?”
“ बर , ठीक आहे. तुम्हाला तसे म्हणायचे असेल तर “
“ आभारी आहे डॉक्टर. “ पाणिनी म्हणाला.” झालं माझं !”
“ थांबा जरा डॉक्टर, “ हेरंब खांडेकर उठून उभे रहात म्हणाले. “ फेर तपासणीत मला काही प्रश्न . पुन्हा विचारायचे आहेत  खरं तर मला अपेक्षा होती की त्याचा  उलट तपासणीत अंतर्भाव होईल.”
“ डॉक्टर, तुम्ही आता का म्हणताय की हर्षल मिरगल चा मृत्यू, पोटॅशिअम सायनाईड ने झाला?”
पाणिनी पुन्हा उठला. “ एक मिनिट, या प्रश्नाला माझी हरकत आहे.ही फेरतपासणी योग्य नाही. सरतपासणीतच हा मुद्दा विचारायला जायला हवा होता. काय घडलंय इथे लक्षात घ्या. सरतपासणी पेक्षा  या मुद्द्याला उलट तपासणीत उत्तर दिले गेले तर ते अधिक प्रभावी ठरेल असा विचार करून सरकारी वकिलांनी एक जुगार खेळलाय. तो आता त्यांच्यावर बंधनकारक आहे ! “
न्यायाधीशांनी आपल्या हनुवटीवर बोटाने हलकेच चापटी मारली. काय निर्णय घ्यावा या संभ्रमात ते दिसले.
“ मी जरा खुलासा करू का?” खांडेकर यांनी विचारले.
न्यायाधीशांनी मानेने नकार दिला. “ मला वाटतं की परिस्थिती पुरेशी बोलकी आहे. मला अस वाटत की वस्तुस्थितीचा विचार केला आणि कायद्यातील नियमावली पाहिली तर  बचावाच्या वकिलांच म्हणणे बरोबर आहे.  या कोर्टाचे काम हे एखाद्या खेळाच्या पंचाचे  असते तसे दोन वकिलांमधील वादाचा निर्णय देणाऱ्या पंचाचे नाही तर न्यायाची अंमलबजावणी करणे हे आहे. उलट तपासणी घेणाऱ्या वकिलाचा गोंधळ व्हावा म्हणून काही महत्वाच्या घटना  सर तपासणीमध्ये न आणता मुद्दाम उलट तपासणीत पुढे येतील असे सापळे सर्रास लावले जातात , अत्ता असाच प्रकार सरकारी वकिलांनी केला पण पाणिनी पटवर्धन यांनी अत्यंत चातुर्याने तो ओळखला आणि त्यातून सुटले.”
‘’ परंतू, कोर्टाला याची पूर्ण कल्पना आहे की साक्षीदाराच्या तपासणी यथा योग्य आहे की नाही हे ठरवायचा पूर्ण अधिकार कोर्टाला आहे.मी आधी म्हंटल्या प्रमाणे हे काही दोन वकिलांमधील कायद्याचे युद्ध नाही. महत्वाच्या घटनांचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. कोर्ट साक्षीदाराला उत्तर द्यायची परवानगी देत आहे पण त्याच बरोबर हे पण स्पष्ट पणे सूचित करत आहे की बचाव पक्षाचे सर्व तांत्रिक हक्क अबाधित आहेत. डॉक्टर उत्तर द्या खांडेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाचे.”
आपल्याकडे  लक्ष वेधण्यासाठी डॉक्टर मुद्दामच  थोडेसे  खाकरले “ सुरुवातीला मी निष्कर्ष काढला होता की,रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे तो गेला. शव विच्छेदानात दिसले की रक्ताच्या गुठळ्या झाल्या नव्हत्या. एवढेच काय त्यातून मृत्यूचे कारणच उघड झालं नाही ! मृत शरीरात विशिष्ठ द्रव टोचून प्रेत पुरलं गेलं होत. मृत्यूचे जे काही कारण होते ते या द्रवा मुळे नष्ट झाले असा  वैद्यकीय दृष्टया तर्क काढता येतो. या सर्वाचा विचार करता, माझे असे स्पष्ट मत आहे की पोटॅशिअम सायनाईड मुळेच त्याचा मृत्यू आला आहे.”
“ बास ! एवढंच मला काढून घ्यायचं होत, तुम्ही हवी तर पुन्हा उलट तपासाणी घेऊ शकता.” खांडेकर म्हणाले.पाणिनी पाणिनी पटवर्धन पुन्हा उठून उभा राहिला,
“ दुसऱ्या शब्दात सांगायचं तर,आता तुम्ही जे म्हणताय की तो विष प्रयोगामुळे मेला, याचे कारण असे आहे की दुसरे कोणतेही कारण तुम्ही देऊ शकत नाही?”
“ तशा अर्थाने ते खरे आहे.” डॉक्टर उद्गारले.
“ तुम्हाला या गोष्टीची कल्पना आहे डॉक्टर, की काही प्रकरणात, देशातले या क्षेत्रातील  सर्वोत्तम शास्त्रज्ञ सुध्दा मृत्यूचे कारण सांगू शकत नाहीत?”
“ माहिती आहे पण अशी उदाहरणे फार आहेत असे नाही वाटत मला.”
“ किती टक्केवारी असेल?”
“मला नाही वाटत की त्याचा काही संबंध आहे याच्याशी.”
“ मला वाटतंय की संबंध आहे. काय टक्केवारी असेल?”
“ ती बदलती आहे.”
“ म्हणजे ही टक्केवारी काही प्रमाणात बदलते?”
“ अशा पद्धतीने मांडता येणार नाही पण योग्य पद्धतीने उत्तर देतो.”
“अगदी अशाच पध्दतीने मृत्यू आल्याने कारण देता आले नाही अशी अन्य प्रकरणे तुम्ही हाताळली आहेत का?”
“ हो “
“ तीन ते पाच टक्के ?”
“ होय”
“ या तीन ते पाच टक्केवारी मधल्या प्रकरणात, जिथे नेमके कारण देता आले नाही त्या ठिकाणी तुम्ही सायनाईड ने मृत्यू असेच कारण दिले का?”
“ असमंजस पणे बोलू नका पाणिनी पटवर्धन. नक्कीच असे कारण दिले नाही.”
“ अशा काही तुम्ही हाताळलेल्या  प्रकरणात तुम्ही दाखला दिला आहे का?”
“नाही “
अशा काही प्रकरणात मृत्यूचे कारण माहीत नाही असा दाखला तुम्ही दिला आहे?”
डॉक्टर अडखळले, “ अं, अं नाही.”
“ तुम्हाला कारण माहीत नव्हतं, तुम्हाला ते शोधून काढता आलं नव्हतं ! “
“ बरोब्बर.”
“ तरी तुम्ही तसे दाखल्यात नमूद केले नाहीत ?”
“ मृत्यू च्या दाखल्यात, काहीतरी कारण द्यावेच लागते.वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्याकडे, अशा कारणांची यादीच असते, आणि जेव्हा नेमक्या कोणत्या कारणाने मरण आले के काळाने अशक्य असते तेव्हा या यादीमधील एखादे  कारण दिले जाते.”
“ म्हणजे जेव्हा नेमके कारण समजत नाही तेव्हा तुम्ही काल्पनिक कारण दाखवता.?”
“ तुम्हाला काहीतरी कारण द्यावेच लागते पण ! “
“ तेच म्हणायचयं मला,ज्या ठिकाणी तुम्ही कारण देऊ शकला नाहीत, तेथे  तुम्ही सरळ सरळ काहीतरी कारण टाकले? “
“ हो अशा प्रकरणात  टाकले. “
“ म्हणजे तुमच्या कडील किमान तीन टक्के प्रकरणात तुम्ही जाणीव पूर्वक खोटा मृत्यू दाखला दिला?”
“ खोटा नाही दिला.”
“ चुकीचा होता?”
“ मला नाही माहीत”
“ तरी तुम्ही दाखल्यात नमूद केले की तुम्हाला कारण माहीत आहे?”
“ सगळेच डॉक्टर अस करतात.”
“ आणि तुम्ही पण करता?”
“ तुम्हाला हवा तसा अर्थ काढा तुम्ही.”
“ या प्रकरणात तुम्ही म्हणाला होतात की मृत्यू सायनाईड ने झाला, हा अपवाद वगळता  हे प्रकरण इतर प्रकरणा प्रमाणेच होत ? “
“ हे प्रकरण अगदी हुबेहूब  अन्य प्रकरणा प्रमाणे नाही.”
“ का नाही?”
“ कारण यात सायनाईड च्या वापराच्या शक्यतेचा पुरावा आहे.”
“ काय पुरावा आहे?”
“ कातडीचा लालसर रंग”
“परंतू तुम्ही रक्तवाहिन्या मधील गुठळ्या मुळे मृत्यू असे कारण दाखल्यात दिले तेव्हा हा रंग तुम्हाला दिसलाच होता ना?”
“ होय.”
“ ठीक आहे , आणखी काय होत तिथे?”
“ आरोपीने स्वतः दिलेला कवुली जबाब ! “
“ आता कसं बोललात ! तुम्ही नंतर च्या काळात दाखला बदललात याचे कारण म्हणजे आरोपीने दिलेला कबुली जबाब आणि त्यात तिने केलेला विष प्रयोग , याबद्दल  तुम्हाला सांगितल गेल होत.”
“ ते अनेक कारणा मधील एक कारण आहे.”
“ पण  अत्ता या ठिकाणी  तुम्हाला सांगण्यासारखे ते एकमेव महत्वाचं कारण आहे ? “
“ ते  आहेच आणि दुसरे म्हणजे अन्य  कोणतेही दृष्य स्वरूपाचे कारण नव्हते.”
“पण तुम्ही अत्ताच सांगितले की बऱ्यापैकी टक्केवारी मधे तुम्ही मृत्यू चे कारण सांगू शकला नाही म्हणून?”
“ हो बरोबर आहे.”
“ पण तुमचा दाखला तसे नमूद करत नाही.”
“ मी मृत्यू चे कारण दिलंय.”
तुम्हाला प्रत्यक्षात मरण माहीत नसूनही विशिष्ठ कारण देऊन तुम्ही दाखला सही करून दिला?”
“ वैद्यकीय क्षेत्रात ती प्रचलित पद्धत आहे.”
“ ठीक आहे , “ पाणिनी उलट तपासणी संपवण्याच्या दृष्टीने म्हणाला.
खांडेकर यांनी त्यांच्या सहाय्यक वकिलाकडे पाहिले.आणि कानात कुजबुजले. सकृत दर्शनी ते डॉक्टरांच्या साक्षीवर समाधानी नव्हते पण झालेले नुकसान कसे भरून काढायचे त्यांना कळत नव्हते.
“ आणखी काही प्रश्न आहेत?” न्यायाधीशांनी विचारले.
“ नाही.” खांडेकर यांनी मान हलवून नकार दिला. त्यांची देहबोलीच सांगत होती की सहाय्यकाच्या कानात कुजबुज ल्या मुळे आपली स्थिती आणखीनच नाजुक झाली आहे.
त्यांची पुढची साक्षीदार होती मायरा शेरगिल.ती सकाळच्या सत्रात काम करणारी नर्स होती.शनवारी जेव्हा मिरगल गेला तेव्हा तिच्याच कडे जबादारी होती .तिने सांगितलं की दर शनिवारी अनन्या गुळवणी  संबंधित नर्स ला जरा विश्रांती मिळावी या हेतूने दुपारच्या सुमारास थोडावेळ स्वतः कडे जबाबदारी घेत असे. त्या शनिवारी म्हणजे तो गेला तेव्हा साक्षीदार नर्स घरा जवळच्या कुंपणाजवळ होती आणि त्याच वेळी तिने बेल चा आवाज ऐकला म्हणून घाई घाईने मिरगल ला पाहायला घरात आली तेव्हा त्याला आकडी आलेली दिसली, त्याला ढास लागली होती आणि फरशीवर ओकल्या सारखा द्रव पडला होता, फुटलेला कप होता आणि  शर्टवर थोडे चॉकलेट सांडले होते. तिच्या हे ही लक्षात आले की जमिनीवर सांडलेले चॉकलेट अजूनही जरा गरम होते.
“ तुला आणखीन काही जाणवलं  का?” खांडेकर नी विचारले.
“ एक प्रकारचा वास “
“कसला वास?”
“ कडवट बदामाला येतो तसा वास”
“नर्स म्हणून तुला जे शिक्षण मिळालाय त्यात तुझा विषा बद्दल अभ्यास झालाय?’’
“ हो””
“तुला जो कडवट वास आला तो कसला होता?
“पोटॅशिअम सायनाईड चा.”
“ तो तुला त्या ठिकाणी आला?”
“ हो.”
“ घ्या उलट तपासणी “ खांडेकर  म्हणाले 
“ सगळ्यात प्रथम तुला त्या वासाचे महत्व कधी जाणवलं?” पाणिनी ने विचारले.
“ जेव्हा मी हर्षल ला पाहण्यासाठी ओणवी झाले तेव्हा लगेचच.”
“ माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. सगळ्यात प्रथम तुला त्या वासाचे  “महत्व”   कधी जाणवलं?”
“ ओह !  महत्व  नंतर समजलं. जेव्हा मला समजलं की यात सायनाईड च्या विष प्रयोगाची शक्यता आहे.”
“ जेव्हा डॉक्टर त्याला भेटायला आले तेव्हा तू तिथे हजर होतीस?”
“ हो , होते.”
तेव्हा कडवट वासाचे  तू त्याच्या निदर्शनाला आणलेस का?”
“ नाही सर”
“ डॉक्टरांनी तुला कडवट वास येतोय असे सांगितले का?”
“ नाही सर, वासा बद्दल चर्चाच झाली नाही.”
“ डॉक्टरांनी जेव्हा रक्त वाहिन्यातील गुठल्यामुळे मृत्यू असे कारण देऊन दाखल्यावर सही केली तेव्हा यु तिथे हजर होतीस का?”
“ जेव्हा त्यांनी हे कारण जाहीर केले तेव्हा मी होते.”
“ तू त्यांना सुचवलस का की कदाचित दुसरे कारण असू शकते म्हणून?”
“ नक्कीच सुचवलं नाही.डॉक्टरांच अनुमान दुरुस्त करणे हे नर्स चे काम नाही.”
‘’ तुला कधी अस वाटलं का मनात की त्यांचं अनुमान चुकलंय?”
“ ओह ! काय चाललंय हे?” खांडेकर उद्गारले ! ही साक्षीदार म्हणजे तज्ज्ञ किंवा निष्णांत असा डॉक्टर नाहीये,ती नर्स आहे,तिने थोडे प्रशिक्षण घेतलंय इतकंच. काही विशिष्ठ घटना ती सांगू शकते त्यावर  तिचं मत घेण योग्य नाही”
“ अतीशय व्यवस्थितच चालल्ये ही उलट तपासणी.” पाणिनी ने उत्तर दिले.” तिने साक्षीत सांगितलं की तिला कडवट बदमासारखा वास आला आणि तो वास कशाचा होता हे तिला मिळालेल्या प्रशिक्षणामुळे तिला समजल.म्हणूनच हे जाणणे महत्वाचे आहे की जर तिला तो विचित्र वास जाणवला होता तर तिने डॉक्टरांना सांगितलं का? कारण ही गोष्ट ती सहज करू शकत होती. तसे नसेल तर पोलिसांनी तिच्या डोक्यात ही कल्पना घुसवली का?”
“ हे अत्यंत अन्याय्य बोलणे आहे बचाव पक्षाचे.” खांडेकर कडाडले.” पोलिसांनी तिच्या डोक्यात ही कल्पना घुसवली असा कोणताही पुरावा नाही.” माझी जोरदार हरकत आहे याला. “
“ तुम्ही मला माझी उलट तपासणी पूर्ण करून द्या, मी दाखवून देतो की ही कल्पना कुठून आली ते.”
“ हे आपापसातले भांडण बस करा.” न्यायाधीश हिरण्यगर्भ म्हणाले.” हे खर आहे की ,सर तपासणीत हा साक्षीदार मृत्यूच्या कारणाबद्दल अभिमत देण्यास लायक असल्याचे दाखवण्यात आले नाही. पण पाणिनी पटवर्धन यांनी विचारलेला प्रश्न हा तिच्या त्या वेळेच्या वर्तना बद्दल होता., तुमची हरकत मान्य नाही , साक्षीदाराने पाणिनी पटवर्धन यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावे.”
“ त्यावेळी तू कोणालातरी लक्षात आणून दिलेस का की तुला तो कडवट वास आला म्हणून?”
“ नाही”
‘पोलिसांशी किंवा सरकारी वकिलांशी चर्चा करण्यापूर्वी तुला त्यावेळी त्या कडवट वासाच्या महत्वा बद्दल काही कल्पना होती का?’’
“ नाही.”
त्यावेळी, त्या प्रसंगी, तुला वाटलं होत का की या वासाचा संबंध सायनाईड शी आहे?”
“ अं.. नाही , त्या वेळी नाही.”
“पोलिसांनी नंतर च्या काळात जेव्हा तुला प्रश्न विचारला की वासाचा संबंध सायनाईड शी आहे असे तुला वाटत का , त्यावेळी तू ते विधान केलेस का?”
“पोलिसांनी नाही, सरकारी वकिलांनी.”
“ अरे बापरे ! दस्तूर खुद्द हेरंब खांडेकर यांनी ! “ सरकारी वकिलांकडे वाकून पहात पाणिनी म्हणाला.” म्हणजे त्यावेळी प्रथम तुझ्या मनात ते आलं , बरोबर ना?”
“ त्यावेळी पहिल्यांदा मी ते नमूद केलं”
“ त्या वेळी पहिल्यांदा तुला त्या वासाचे महत्व जाणवलं?”
“ हो.”
“खांडेकर यांनी विचारलं , की सायनाईड चा प्रयोग झाला असावा अशी शंका येण्याजोगे तुला काही आढळलं का ? “
“ होय.”
“ आणि खांडेकर यांनी पुढे असही  सांगितलं ना की बदामाचा कडवट वास हा  सायनाईड चे अस्तित्व दर्शवतो असे त्यांना स्वतःला माहीत आहे, आणि तुला असा वास आला का म्हणून?”
“ हो”
“ तुला तो कडवट वास आल्याचे तू त्यांना सांगण्यापूर्वी त्यांनी हे तुला संगितलं ना?”
“ ते माझ्या मनात आलं.”
“ ते तुझ्या पहिल्यांदाच मनात आलं का?”
“ हो.”

‘‘आणि नंतर तुला वाटलं की तुला ते आठवलं होत?”
“ तेव्हा मला आठवलं की मला तो वास आला होता.”
ठीक आहे, झालं माझं ! “ पाणिनी म्हणाला.
खांडेकर म्हणाले , “ माझा पुढचा साक्षीदार हा शत्रू धार्जिणा आहे., म्हणजेच बचाव पक्षाच्या बाजूचा आहे पण त्याची साक्ष काढणे आवश्यक आहे. डॉ. कार्तिक डोंगरे या पुढे आणि शपथ घ्या.”
डॉक्टरांनी शपथ घेतली , स्वतःची ओळख करून दिली,आणि आरोपीशी ओळख असल्याचे नमूद केले.
“ या सप्टेंबर महिन्याच्या पंधरा तारखेला, आरोपीने तुमचा व्यावसायिक म्हणून सल्ला घेतला होता ?” खांडेकर नि विचारले.”
“हो , घेतला होता.”
“त्या वेळी तुम्ही ठरवलं का की ती स्वतःला गुन्हेगार किंवा दोषी समाजत आहे म्हणून?”
“ हरकत आहे आमची या प्रश्नाला.” पाणिनी उठून उभा रहात म्हणाला.” कारण रुग्ण आणि डॉक्टरांच्या मधील चर्चा ही गुप्त असते आणि याच उत्तर द्यायला लावणे म्हणजे त्या दोघातील संबंधाना तडा गेल्यासारखे होईल.”
“ हरकत योग्य आहे. मान्य करण्यात येत आहे.” न्यायाधीशांनी आज्ञा केली.
“ तुम्ही त्यावेळी आरोपीला सुचवले का की तिला एक औषध – ट्रूथ सिरम पाजून तिची तपासणी केली तर तिच्यासाठी हितावह आहे?”
“ पुन्हा त्याच कारणास्तव हरकत आहे आमची “ पाणिनी म्हणाला.
“ माझे पूर्वीचेच मत आहे., हरकत मान्य.”
“ तुम्ही सतरा सप्टेंबर वा त्यापूर्वी, तिला ते औषध देले का?” खांडेकर नि विचारलं.
“” हो , दिले.”
“ जागते पणी  रुग्ण जे सहसा सांगत नाही ते त्याने सांगावे हाच त्या औषधाचा हेतू होता?”
“ हो,तोच होता.”
“तुमच्या कडे त्यावेळी  असलेल्या टेप रेकोर्डर वर रुग्ण जे बोलला ते ध्वनी मुद्रित केलंय?”
“ जर न्यायालयाची परवानगी असेल तर...” पाणिनी पाणिनी पटवर्धन उठत म्हणाला.” माझी हरकत आहे प्रश्नाला, या कारणास्तव की हा प्रश्न, कायदेशीर दृष्टया  विचारण्याचा अधिकार नसलेला प्रश्न आहे, याशिवाय, अप्रासंगिक व मुद्द्याला सोडून आहे आणि क्षुल्लक,आहे. रुग्ण  मुलगी त्यावेळी औषधांच्या अंमलाखाली होती,त्यामुळे ती त्यावेळी जे काही बोलली असेल ते काल्पनिक स्वरूपाचे असायची शक्यता आहे, आणखी एका कारणासाठी हरकत आहे की तिने जरी काही कबुली दिली असेल तरी त्यासाठी आवश्यक आधार मांडण्यात आला नाही शिवाय गुन्हा घडल्याचा संपूर्ण पुरावा सादर नाही.”
‘’ आता आपण इथे सर्वात महत्वाच्या कायदेशीर बाबीकडे वळलोय. “ न्यायाधीश हिरण्यगर्भ म्हणाले.
”अर्थात कोणत्यातरी क्षणी हे येणारच होते.मला लक्षात येतंय त्या नुसार सरकारी वकीलाना दाखवून द्यायचंय की अशा पद्धतीने टेप रेकॉर्डिंग केलं गेलं होत आणि नंतर साक्षीदार म्हणून या डॉक्टर ना जायला सांगायचं.नंतर हे टेप  रेकॉर्डिंग आरोपीचा कबुली जबाब म्हणून सादर करायचा आणि ज्युरींसमोर तो वाजवून दाखवायचा.”
“ बरोबर आहे तुमचे, “ खांडेकर म्हणाले.
“ इतर प्राथमिकता अद्याप पूर्ण झाल्या नसल्याने मी अत्ता ही हरकत अमान्य करतो.”
“ तुम्ही असे टेप रेकॉर्डिंग केले का?” खांडेकर यांनी विचारले.” केले असेल तर त्याचे नंतर काय केले तुम्ही”
‘‘ मी केले . नंतर पोलिसांनी सर्च वॉरंट आणून ते मशीन आणि टेप ताब्यात घेतली.”
खांडेकर यांनी ते मशीन आणि टेप डॉक्टरांकडून ओळखून घेतली आणि आपली तपासणी थांबवली. त्या नंतर पाणिनी पाणिनी पटवर्धन ने उलट तपासणी सुरु केली.
“ जेव्हा रेकॉर्डिंग केले तेव्हा अनन्या गुळवणी तुमची रुग्ण होती”
“ हो “
तुम्ही तिच्यावर उपचार करत होतात?”
“ हो.”
“ तिच्यावरील उपचार परिणाम कारक होण्यासाठी तुम्हाला अस वाटलं की काही गोष्टी प्रश्तोत्तरांच्या सहाय्याने जाणून घेणे आवश्यक आहे  आणि त्यासाठी ट्रूथ सिरम देणे गरजेचे आहे?”
“होय”
“ आणि ही चाचणी तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आणि शल्य विशारद म्हणजे सर्जन या भूमिकेतून घेतली?”
‘’ हो”
तेव्हा आरोपी औषधाच्या अमला खाली होती? ती काय करत होती हे तिला समजत नव्हते?”
“ तिच्या मनाच्या एका भागाला समजत होत की ती उत्तर देत्ये. औषधाने तिचे मन असे संतुलित प्रमाणात शांत केले होते की तिच्या कडून उत्तरे द्यायला विरोध होणार नाही.”
“ थोडक्यात तिचे देहभान , मन  हे औषधाच्या सहाय्याने माफक प्रमाणात कमकुवत केले गेले होते.?”
“ बरोबर”
आणि हे औषध तुम्ही तिच्यावरील उपचाराचा भाग म्हणून तज्ज्ञ डॉक्टर म्हणून दिलेत?”
“ हो,बरोबर.”
‘’ आणि तुम्ही तिला प्रश्न विचारणे, तिने तुम्हाला उत्तरे देणे हे सर्व तुम्ही तज्ज्ञ डॉक्टर म्हणून तिचे  रोग निदान करण्या करता आणि तुमच्यातील संवाद गुप्त राहण्याचे दृष्टीनेच केलेत ? “
“ हो”
“ तुम्ही अशा खूप चाचण्या घेतल्यात?” काय हेतू असतो अशा चाचण्यांचा?”
“ खूप घेतल्या अशा चाचण्या.मिळणाऱ्या उत्तरामधून भावनिक गुंतागुंत समजते, त्याचे मूल्य मापन करता येते.”
“मिळणारी उत्तरे ही नेहमी सोपी आणि सहज समाजातील अशी असतात?”
“ अजिबात नाही.”
“ नेहेमी बरोबरच असतात?”
“ सकृत दर्शनी नसतात.”
“म्हणजे असे म्हणता येईल का की तुम्हाला अशा चाचण्यामधून जी उत्तरे मिळतात ती बरोबर नसण्याची शक्यता असते?”
“ तशी कायमच शक्यता असते.”
“  एखाद्याला झोपेत बोलण्याची सवय  असते तुम्हाला माहीत असेलच,आरोपीची अवस्था औषध दिल्या नंतर तशीच झाली होती का?”
“ खूपच तशी अवस्था होती. आपण म्हणू शकतो की कृत्रिम रित्या झोपेत बडबडल्या सारखी अवस्था केली होती.”
पाणिनी पाणिनी पटवर्धन  समाधानी दिसला.” झाले माझे प्रश्न.”
खांडेकर उठून म्हणाले, “ जरा थांबा, जर या परीक्षे मधून रुग्णाकडून मिळणारी उत्तरे ही चुकीची असतील तर अशी चाचणी घेण्यात काय अर्थ आहे?”
“ मी अस म्हणालो नाही की उत्तरे चुकीची होती, मी म्हणालो की चुकीची असण्याची शक्यता होती.”
“ चुकीच्या शक्यतेचे प्रमाण एवढे मोठे आहे का , की त्या चाचणी ची किंमतच रहात नाही? दुसऱ्या शब्दात, ज्या चाचणीला काही किंमतच नाही ती घेऊन तुम्ही रुग्णाच्या पैशाचा आणि वेळेचा अपव्यय करत होता?”
“ अजिबात नाही. मिळणाऱ्या उत्तरांच मूल्य मापन कसे करायचे हे समजले पाहिजे. काही वेळेला उत्तरे चुकीची असली तरी रुग्णाची मानसिकता तपासता येते.”
“ म्हणजे या चाचणीला तुमच्या लेखी , रोग निदान करण्यासाठी थोडाफार तरी अर्थ आहे?”
“ नक्कीच आहे.”
“ आणि ह्या चाचणीच्या सहाय्याने आरोपी च्या मनात अपराधी  भावना का निर्माण झाली होती याचे कारण शोधण्याची अपेक्षा होती?”
पाणिनी पाणिनी पटवर्धन उठला. ‘’ बरोबर नाही हा प्रश्न. याच प्रश्नाला यापूर्वी मी हरकत घेतली होती आणि ती न्यायाधीशांनी मान्य केली होती, तोच प्रश्न पुन्हा विचारला गेलाय. पुराव्यात ज्या गोष्टी आलेल्याच नाहीत त्या संबंधी हा प्रश्न आहे.
न्यायाधीश हिरण्यगर्भ म्हणाले,” खांडेकर, मला वाटत तुम्ही टेप रेकॉर्डिंग ओळख पटवून घेतलच आहे. त्यावेळेची रुग्णाची मानसिक स्थिती कशी होती या बद्दलच्या प्रश्नांचा अपवाद वगळता तुम्ही अन्य प्रश्न कमी केले पाहिजेत. हा टेप रेकॉर्डर पुरावा म्हणून स्वीकारायचा की नाही असा  मुख्य सवाल कोर्टाच्या समोर आहे.”
“ तो स्वीकारण्यात यावा अशी माझी विनंती आहे “खांडेकर म्हणाले.
“ माझी जोरदार हरकत आहे, विरोध आहे.” पाणिनी कडाडला.” या कारणास्तव की हे रुग्ण आणि डॉक्टरांच्या मधील संवादाबद्दल असल्याने गोपनीय आहे. या कारणास्तव की तेव्हा आरोपी ही औषधाच्या अंमलाखाली होती.तो चांगला पुरावा म्हणून समजलाजाऊ शकत नाही. याशिवाय गुन्हा घडल्याचे सिध्द झालेले नाही.हर्षल मिरगल ला नैसर्गिक व्यतीरिक्त अन्य कारणाने मृत्यू आला याचा पुरावा नाही.आणि जो पर्यंत मिरगलच्या मृत्यू संदर्भात काही गुन्हेगारी स्वरुपाची घटना घडली असल्याचा ठोस पुरावा नाही तो पर्यंत आरोपीने केलेल्या कोणत्याही विधानाचा पुरावा म्हणून उपयोग करता येणार नाही.”
“  या हरकतीवर कोर्ट विचार करते आहे तो पर्यंत न्यायाधीश ना थोडावेळ मुक्त करण्यात याव. या कालावधीत ज्युरींनी या खटल्य बद्दल चर्चा करू नये.किंवा पाणिनी पटवर्धन च्या हरकतीवर भाष्य करू नये.तसेच आरोपी दिशी आहे वा नाही यावरही आपले मत व्यक्त करू नये. कृपया सर्वांनी बाहेर जावे.”-न्यायाधीश हिरण्यगर्भ यांनी हुकुम केला.
खांडेकर थोडावेळ थांबले, न्यायाधीश बाहेर गेल्यावर म्हणाले, ”या टेप रेकॉर्डर वर आरोपीने , तिच्या आवाजात केलेले ठोस असे विधान आहे की तिने हर्षल मिरगल वर विष प्रयोग केला. मला अस वाटत की आम्ही हर्षल मिरगल  हा विष प्रयोगामुळे मेल्याचं जरी अद्याप  सिध्द केले नसले तरी त्याला नैसर्गिक मृत्यू आला नाही हे सिध्द केले आहे.त्यामुळे तेथे काहीतरी गुन्हा घडल्याचे दिसतंय हे नक्की. त्याचा मृत्यू विष प्रयोगाने झाल्याचे गृहीतक आम्ही धरून पुढे चाललोय त्यामुळे त्यासाठी तिचे विधान पुरावा म्हणून घेण्यात यावे.”
न्यायाधीश हिरण्यगर्भ म्हणाले,” यावर तुमचे म्हणणे काय आहे पाणिनी पटवर्धन  मला ऐकायला आवडेल.”
“ हे गोपनीय संवाद आहेत.औषधाच्या अंमलाखाली असताना दिलेली उत्तरे आहेत. त्या अवस्थेत असताना आरोपीला साक्षीदार म्हणून कोर्टात यायला आणि साक्ष द्यायला परवानगी दिली गेली असती का? नाही. त्या मुळे त्याच अवस्थेतील तिचा टेप रेकॉर्डर वरचा संवाद ग्राह्य धरू नये. “
“सरकार विरुध्द रिषभ देव १९/४० या खटल्यात हा नियम प्रथम निर्देशित करण्यात आला. त्यात नमूद आहे की आरोपीने पूर्ण शुद्धीत नसताना जे काही विधान केले असेल ते पुरावा म्हणून गृहित धरू नये. झोपेत केलेली विधाने सुध्दा पुरावा म्हणून गृहित धरू नयेत.”
न्यायाधीश हसले.मला आश्चर्य वाटत होत पाणिनी पटवर्धन  की तुम्ही मगाशी झोपेत बडबड केल्या बद्दल प्रश्न का विचारला ! आता मला कळलं की तुमच्या मनात ठोस असा हेतू होता.त्या प्रकरणात  हा निर्णय घेणारे कोर्ट हे सक्षम असल्याचं दिसतंय. “ त्यांनी खांडेकर कडे पाहिलं.
“ पाणिनी पटवर्धन ने उल्लेखलेले निकष कालबाह्य झाले आहेत.सरकार विरुध्द रुकेरी.११/६०९/५४ या खटल्यात असा निवाडा देण्यात आलाय की आरोपी कबुली जबाब देताना मानसिक दृष्टया सक्षम नव्हता असे दाखवणारा पुरावा असला तरी कबुली स्वीकृत करून घेण्यासाठी तो पुरावा अडचण ठरणार नाही. पण त्याला किती महत्व द्यायचं हे न्यायाधीश नी ठरवावं .म्हणून माझा आग्रह आहे की ज्युरींनी तो कबुली जबाब ऐकावा.त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी, त्यांच्या अशीलाची, कबुली जबाब देतानाची  मानसिक अवस्था दाखवण्यासाठी त्यांना हवा तो पुरावा सादर करावा.न्यायाधीश त्या नंतर ठरवतील की कबुली जबाब खरा आहे की नाही. मात्र सर्व भौतिक गोष्टी सिध्द करतात की तो जबाब खरा आहे.”
“ कायद्या नुसार कबुली जबाब , मग तो कोणत्याही मार्गाने मिळालेला असो, स्वीकृत करून घेतला जातो, जर तो खरा असल्याचा पूरक पुरावा मिळाला तर. आम्ही दाखवू इच्छितो की या प्रकरणात सुध्दा तिचा कबुली जबाब खरा असल्याचे दाखणाऱ्या अनेक पूरक गोष्टी आहेत. उदा तिच्या जबाबात तिने सांगितलं आहे की ती हर्षल मिरगल च्या बंदुकीच्या खोलीत ती गेली तेथून शिशाच्या गोळ्या घेऊन  तिने विषाच्या बाटलीत टाकल्या आणि ती बाटली तळ्यात टाकली.त्यानुसारच प्रत्यक्ष घडले आहे, आम्ही दाखवू की ती बाटली आम्ही तळ्यातून मिळवली आहे आणि तिने शिशाच्या गोळ्या जेथून उचकटून काढल्या असे ती म्हणते, त्याचे कवच ही आम्हाला तिने सांगितलेल्या जागी मिळाले आहे.”
एवढे बोलून खांडेकर पाणिनी पाणिनी पटवर्धन कडे सहेतुक बघून नाटकी पणाने कमरेत वाकून म्हणाले,” कोणीतरी, साध्या गोळ्यांची शिशाचे तुकडे घातलेली  एक वेगळी बाटली तळ्यात टाकून गोंधळ निर्माण करायचा प्रयत्न केलाय. आणि हा खटला संपण्यापूर्वी आम्ही सिध्द करू इच्छितो की पाणिनी पाणिनी पटवर्धन तळ्याकाठी जाताना आणि तळ्यात काहीतरी फेकताना काही जणांनी बघितलाय ! “काही मुलांना पैसे देऊन त्यांच्या करवी तीच बाटली पुन्हा मिळवण्यापूर्वी काही काळ आधीच त्याने हे केलंय.”
न्यायाधीश हिरण्यगर्भ यांच्या कपाळाला आठ्या पडल्या. “ ही फार गंभीर परिस्थिती आहे. कोर्ट तुम्हाला  शिशा च्या  गोळ्या आणि  विषाच्या बाटली  या संदर्भात पुरावा सादर करायला परवानगी देईल.आणि तुम्ही म्हणता त्या प्रमाणे या गोष्टी तिच्या जबाबाशी सुसंगत आहेत असे वाटले तर टेप रेकॉर्डिंग ज्युरींना ऐकवायचे का आणि बाटली व शिशाच्या गोळ्या याचा पुरावा ज्युरींसमोर आणायचा का या बद्दलचा निर्णय घेईल. “
 “ छान ! “ खांडेकर म्हणाले. “ मी या शिशाच्या गोळ्या चे कवच कोर्टासमोर हजर करतो पुरावा म्हणून आणि एक अधिकारी या नात्याने सांगतो की हे कवच गुळवणी ने तिच्या जबाबात सांगितलेल्या ठिकाणीच सापडलले आहे.” त्यांच्या सहाय्यकाने ते कवच कोर्टासमोर आणले. पाणिनी ने त्याची तपासणी केली.
 “ आतले अस्तर ओढून काढलेले दिसतंय. एका कवच्यामधून सर्व आणि दुसऱ्या मधून काही गोळ्या बाहेर काढल्या आहेत.शिशाच्या गोळ्या ने  बरोब्बर कुपी भरते आणि कुपीत सायनाईड च्या गोळ्या आहेत.” खांडेकर यांनी माहिती दिली.
“ अन्य  बाटलीचे काय?” न्यायाधीशांनी विचारले.
“त्यात साध्या गोड गोळ्या आहेत आणि तशाच शिशाच्या गोळ्या आहेत. त्या दोन्ही बाटल्या माझ्याकडे आहेत , एक पुरावा क्र अ  आणि दुसरी क्र.ब “  असे म्हणून खांडेकर नी दोन्ही बाटल्या सादर केल्या.
न्यायाधीशांनी पाणिनी पाणिनी पटवर्धन कडे आरोप केल्या सारखे रोखून पाहिले.” ही फार महत्वाची गोष्ट आहे की आरोपीने जिथे विषाची  बाटली फेकली असे म्हटले आहे त्या ठिकाणाहून दोन बाटल्या मिळवण्यात आल्या आहेत.त्यातील एकातआरोपीने वर्णन केल्यानुसारच विष आहे.दुसऱ्यात साध्या बिन विषारी गोळ्या आहेत. बरोबर आहे नं मी म्हणतोय ते खांडेकर ?”
“ बरोबर आहे “ खांडेकर पाणिनीकडे विजयी मुद्रेने पाहत म्हणाले.”
“ जर कोर्टाची परवानगी असेल तर , “ पाणिनी म्हणाला,” ज्या बाटलीत साध्या गोड गोळ्या होत्या त्याचा हिशोब मी देऊ शकतो. आणि ती बाटली मी तिथे टाकल्याचे जे सूचित केल जातंय,त्या संदर्भात मी अत्ता एका साक्षीदाराला बोलावू इच्छितो जो या स्थितीवर साक्ष देऊन प्रकाश टाकू शकेल.”
न्यायाधीश म्हणाले, ” कोर्ट परवानगी देईल. पुरावा मान्य करून घ्यायचा किंवा नाही या बद्दल जी चर्चा झाली आहे,त्याच संदर्भात ही साक्ष असेल .”
“ हे बरोबर आहे’’ पाणिनी म्हणाला.” मी मिलिंद बुद्धीसागर  बुद्धीसागर  याला पुढे येउंन शपथ घ्यायला सांगणार आहे.”
पाणिनी ने तपासणी चालू केली.” तुझं नाव मिलिंद बुद्धीसागर  आहे आणि तू लीना  बुद्धीसागर शी लग्न केलं आहेस? आणि ती हर्षल मिरगल ची हयात असलेली पुतणी आहे.?”
“ बरोबर”
तुला या नात्या मुळे, आणि संबंधांमुळे हर्षल मिरगल च्या घरी ये-जा करण्याचा अधिकार होता आणि तिथे तू वारंवार जायचास?”
“ बरोबर.”मिरगल गेला त्या दिवशी तू  तिथे होतास?”
“ होतो.”
आणि त्याच्या मृत्यू नंतर तुला समजलं की आरोपीने असे विधान केले आहे की ज्या गोळ्या तिला साखरेला पर्यायी गोळ्या वाटत होत्या,त्या तिने नेहेमीच्या जागी ठेवलेल्या बाटलीतून घेतल्या,आणि हर्षल ला त्या दिल्या नंतर त्याने तिच्यावर विष प्रयोग केल्याचा आरोप केला. आणि थोड्याच वेळात तो गेला. बरोबर आहे की नाही हे?”
“ हो, बरोबर.”
तुझे आरोपी बरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते?”
“ मैत्री असे नाही म्हणता येणार,त्यावेळी मला तिची दया येत असे.”
“ तू ‘ त्या वेळी ‘  असा शब्द प्रयोग वापरलास?
“ हो. त्यावेळी मला वाटत होत की ती हर्षल मिरगल च्या जाचात आहे.त्यावेळी मालकही गोष्टी माहीत नव्हत्या पण नंतर समजल्या की ती मिरगलला ब्लॅक मेल करत होती.”
“ तुझी पत्नी तुलनेने तरुण आहे?”
“ तिशीच्या मध्यावर.”
“ ती शारीरिक दृष्टया चांगली आहे?”
“ मला वाटत खूप चांगली.”
“ त्यासाठी ती काळजी पूर्वक आहार घेते?”
“ हो”
“ त्याचाच एक भाग म्हणून तुमच्या घरी साखरेला पर्यायी गोळ्या आहेत?”
“ हो सर.”
“ तिच्याच शिफारशी वरून  हर्षल मिरगल ने त्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली?”
“ होय”
“ सायनाईड च्या गोळ्याची बाटली  साध्या गोळ्यांच्या बाटलीच्या जागी ठेवल्यामुळे काकांना विषारी गोळ्या दिल्या गेल्या असाव्यात म्हणून घाबरून तिने त्या विषाच्या गोळ्या तळ्यात टाकल्या, असे विधान  आरोपीने केल्याचे जेव्हा तुला कळले तेव्हा तू तिला संरक्षण देण्यासाठी म्हणून स्वतःच्या घरातील गोड गोळ्यांची बाटली, त्यात शिसे भरून त्याच तळ्यात टाकलीस?”
“ मी असे काहीही केले नाही.”
“ का s s s य ? “ पाणिनी उद्गारला.
“ तू मला हे सांगितलस. नाही सांगितलस का?”
“ मी नाही सांगितलं तुम्हाला.”
मी जेव्हा तुला भेटायला क्लब मधे आलो होतो तेव्हा त्या कोपऱ्यावरच्या कमानीपाशी आपण बोलत होतो तेव्हा हे सर्व तू मला सांगितलस की ! “
“ नाही.”
परी उग्र पणे म्हणाला, “ मला अशा स्थितीला तोंड द्यावं लागतंय की साक्षीदार जाणून बुजून खोटी साक्ष देतोय., मी वकील म्हणून अत्यंत प्रामाणिक पणे सांगू इच्छितो की याने माझ्या समोर असे विधान केले आहे.”
“ हे खरं नाहीये., मी अस काहीही बोललो नाही.”
खांडेकर हसले.” एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोपीच्या वकिलावर आरोप आहे की त्याने साध्या गोळ्यांची बाटली तळ्यात टाकली.तोच आरोप, आरोपीचा वकील, साक्षीदारावर करतोय. साक्षीदार तो नाकारतोय.दोघांपैकी एक कोणीतरी खोटे बोलतोय. कोर्टालाच ठरवू दे की कोणाला खोट बोलण्याचा फायदा आहे आणि खोट बोलल्यामुळे कोणाची प्रतिष्ठा वाचणार आहे.
”आता थांबा जरा “ कठोर चेहेऱ्याने न्यायाधीश म्हणाले.”  बुद्धीसागर मी तुम्हाला विचारतोय,तुम्ही पाणिनी पटवर्धन ना असे सांगितले का?”
“ मी नाही सांगितले.”
“ मी दाखवू इच्छितो की त्याने मला हे सांगितले.” पाणिनी म्हणाला.
“ तुमच्या स्वतःच्या साक्षीने?” न्यायाधीशांनी विचारले.
“ हो.”
“समर्थनार्थ काही पुरावा?” न्यायाधीशांनी विचारले
पाणिनी थोडावेळ घुटमळला. नंतर मानेने नकार दिला.” पुरावा देता येईल असे समर्थन नाहीये, माझी सेक्रेटरी तेव्हा गाडीत बसली होती.मी मिलिंद बुद्धीसागर  बुद्धीसागर शी बोलून गाडीत परत आलो तेव्हा तिला मी सांगितलं होत की त्याने माझ्या जवळ बाटली टाकल्याचे कबूल केले.”
“हा काही पुरावा नाही,केवळ स्वतः केलेले जाहीर निवेदन आहे.” खांडेकर म्हणाले.
“ मला वाटतं की कोर्ट मला बरेच वर्षं चांगले ओळखते. खरी परिस्थिती समोर येण्याकरता , खटल्याचे दरम्यान मी जरी  कधी कधी अपारंपारिक पद्धती वापरत असलो, तरी खोटे विधान करून मी स्वतःला धोक्यात आणणार नाही किंवा आरोपीला सोडवण्यासाठी आणि पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी खोटा पुरावा सुध्दा निर्माण करणार नाही.”
“ हा एक वादाचा मुद्दा आहे.” खांडेकर म्हणाले. “ तुझी  स्वतःची वेगळी तत्वे आहेत. आणि मला ती उघड करायची नाहीत.”
“ एकीकडे मिलिंद बुद्धीसागर  असे बोलल्याचे नाकारतोय, आणि दुसरीकडे, पाणिनी पाणिनी पटवर्धन शपथेवर सांगतोय की तो तसे बोललाय. काय हेतू आहे त्यामागे? केवळ साक्षीदारा विरुध्द खोटा आरोप ठेवण्यासाठी. त्याने वस्तुस्थिती बदलणार नाही.” खांडेकर पुढे म्हणाले.
“ या खटल्यात बचाव पक्ष तांत्रिक बाबींवर अवलंबून राहील असे सांगण्यात आले होते.  पण त्यात दोन्ही बाजूना सारखेच संरक्षण मिळेल.” न्यायाधीश म्हणाले.
“ मला आपणाला विनंती करायची आहे की उद्या सकाळ पर्यंत कोर्टाने कामकाज स्थगित करावे. मला या घटनेच्या मुलाशी जाऊन सत्य बाहेर आणायचं आहे. माझ्याकडे असलेल्या माहितीच्या  सत्यते बद्दल मला पूर्ण खात्री आहे. मी कोर्टाला सांगितलं त्यानुसार या साक्षीदाराने खरोखरच मला सांगितलं आहे.”
न्यायाधीशांनी विचार केला आणि म्हणाले, “ पाणिनी पाणिनी पटवर्धन जी विधाने करतो ती अत्यंत योग्य आणि बऱ्या वाईटच विचार करून केलेली असतात असच अत्ता पर्यंत कोर्टाच्या निदर्शनास आलंय.”
खांडेकर खवचट पणे म्हणाले,” या माणसाने अत्ता पर्यंत अत्यंत कल्पकता पूर्वक युक्त्या लढवल्या आहेत.आता तो अडकलाय, त्याची पूर्ण प्रतिष्ठा पणाला लागल्ये. मला वाईट वाटतंय अस बोलायला पण कोर्टाने पाणिनी पटवर्धन च्या मागणी मागचा नीच हेतू लक्षात घ्यावा. “
पाणिनी त्यावेळी सादर झालेले पुरावे तपासत होता.खांडेकररांकडे वळून तो म्हणाला.” तुम्हाला तो टेप रेकॉर्डरवरचा तिचा कबुली जबाब पुरावा म्हणून सादर करायचा आहे ना , कारण त्यात तिने म्हंटल्यानुसार त्याच जागी बरोबर शिशाचे कवच सापडले आणि तिच्या म्हणण्याला बळकटी आली म्हणून?”
“ एकदम बरोबर” खांडेकर म्हणाले.
“ मी तुम्हाला याचे कायदेशीर दृष्टीकोनातून समाधान करून देतो.” पाणिनी म्हणाला.,” टेप रेकॉर्डरवरचा तिचा कबुली जबाब या विषयावरील मी घेतलेल्या सर्व हरकती मी मागे घेतो ! “
“ अरे ,अरे  नाही, नाही  थांबा पाणिनी पटवर्धन.” न्यायाधीश एकदम दचकून म्हणाले.” तुम्ही अस नाही  करू शकत.तुम्हाला आरोपीचे हक्क सुरक्षित ठेवायचे आहेत.त्यावर अशी बाधा आणू नका.इथे आपण दोन प्रकारचे  फार गंभीर प्रश्न हाताळतोय की, औषधाच्या अंमलाखाली दिलेला कबुली जबाब ग्राह्य धरता येतो का आणि ही चर्चा रुग्ण आणि डॉक्टर यांच्या मधली चर्चा ही कायद्याने ठरवल्या नुसार  गोपनीय ठरेल का. बचाव पक्षाच्या या  विषयावरील हरकती संदर्भात या कोर्टाची अजून निर्णय देण्याची तयारी झालेली नाही.परंतू बचाव पक्षाने म्हणजे पाणिनी पटवर्धन यांनी घेतलेल्या हरकती फार महत्वाच्या आणि आरोपीच्या महत्वाच्या हक्कांवर परिणाम करणाऱ्या आहेत.”
“ सरकारी वकिलांनी उल्लेख केल्या नुसार त्यांना त्याच पद्धतीने पुढे जायचे असेल तर मी या हरकती मागे घेतो. मी त्यांचे आव्हान स्वीकारायला तयार आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांना कायदेशीर भाषेतच उत्तरे देतो.” पाणिनी ने बॉम्ब च टाकला.
सारवा सारव करण्याच्या प्रयत्नात न्यायाधीश हिरण्यगर्भ म्हणाले,” मी हे लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करतोय पाणिनी पटवर्धन , की तुम्ही अशा प्रकारे आरोपीच्या हक्कावर गदा नाही आणू शकत , हरकती मागे घेऊन.तुमचा काहीतरी हेतू असणारच पण हे कोर्ट तो हेतू ओळखू शकत नाही हे प्रामाणिक पणे मान्य करतो मी. पण कोर्टाला हे समजतंय की तुम्ही नोंदवलेली हरकत ही  तांत्रिक दृष्टया खूप महत्वाची आणि दम असलेली आहे !  या हरकती संदर्भात तुमच्या बाजूने मी जर निर्णय दिला तर पूर्ण खटलाच रद्द बदल होईल परंतू आरोपीच्या मनात जाचतराहील की खुनी असूनही मी केवळ तांत्रिक बाबीमुळे सुटले.”
“ नाही , न्यायाधीश महाराज. मी आरोपीचे प्रतिनिधित्व करतोय तिचं भवितव्य माझ्या हातात आहे. मी हरकती मागे घेतो, चालू दे खटला पुढे.” पाणिनी म्हणाला.
“ न्यायाधीश नं बोलवा आत पुन्हा. सरकारी वकिलांना त्यांच्या म्हणण्याला पुष्टी देणारे मुद्दे सादर करू दे ,नंतरच ज्युरीं ना ध्वनिमुद्रण ऐकवा.” हिरण्यगर्भ म्हणाले.
“ मला हे चालणार आहे “ खांडेकर विजयी मुद्रेने म्हणाले.
“ तरी पण मला वाटत पाणिनी पटवर्धन तुम्हाला हे करण्याचा अधिकार नाही.” न्यायाधीश म्हणाले.
“ आरोपीचा वकील या नात्याने हा खटला कसा चालवायचा हे ठरवायचा अधिकार मला आहे.” पाणिनी म्हणाला.
“ पण पाणिनी पटवर्धन , या खटल्यात तुम्ही स्वतः थेट गुंतलेले आहात. स्वतःची कातडी वाचवायचा मोह होणे स्वाभाविक आहे  ...” न्यायाधीश बोलत असतानाच पाणिनी त्यांना तोडत म्हणाला.” आता काय असेल ते असो. समजा अगदी मी माझी कातडी वाचवतोय, तरी हा मुद्दा मला अत्ता च्या अत्ता सोडवायचाय.”

खांडेकर म्हणाले,” पाणिनी पटवर्धन यांनी यापूर्वी घेतलेल्या हरकती रद्द केल्या आहेत त्यामुळे कोर्टाला त्यावर निर्णय घेण्याजोगे काही राहिले नाही.”
“ तुम्ही शिशाच्या गोळ्या असलेले कवच आणि ती विषाची बाटली हजर करणार आहात ,तेवढया विषय पुरतीच मी माही हरकत मागे घेतोय.” पाणिनी ने स्पष्ट केले.
“ बरोबर आहे “ खांडेकर म्हणाले.
पाणिनी मागे फिरून त्याच्या टेबला पाशी जाऊन बसला. हिरण्यगर्भ यांनी विचारात पडून  बोटांनी आपली हनुवटी थोपटल्या सारखी केली आणि पाणिनी पटवर्धन कडे हेतू पुरस्सर पाहिले. खांडेकर नी पुन्हा आठवण करून दिली की बचाव पक्षाने हरकत मागे घेतली आहे, कोर्टासमोर निर्णयाला काहीच मुद्दा नाहीये ! न्यायाधीश म्हणाले.” काय घडलंय त्याची अधिकृत नोंद होवू दे. अनन्या गुळवणी तू उभी राहशील का?” तुझ्या वकिलाने काय सांगितलंय ते तू ऐकलस ना?”
“ हो सर ऐकलंय.”
“ कोर्टाने दुसरा वकील नेमावा का तुझ्यासाठी? ”
“नाही साहेब.”
तुझ्या वकिलाने अचानक जी भूमिका घेतली आहे त्या बद्दल तू समाधानी आहेस?”
“पाणिनी पटवर्धन जे जे म्हणतील ते मला मान्य आहे.”
हिरण्यगर्भ यांनी आपली मान  संशयाने हलवली.” या सगळ्या प्रकरणात कोर्टाला अजूनही सगळ काही ठाक ठीक  वाटत नाही.कोर्ट आपले कामकाज स्थगित करत आहे. औषधाच्या अंमलाखाली दिलेला कबुली जबाब ग्राह्य धरता येतो का आणि ही चर्चा रुग्ण आणि डॉक्टर यांच्या मधली चर्चा ही कायद्याने ठरवल्या नुसार  गोपनीय ठरेल का हे विषय फारच गंभीर तांत्रिक परिस्थिती निर्माण करणाऱ्या आहेत.”
“ माझ्याकडे या बाबत इतर कोर्टाचे  पण निर्णय आहेत.” खांडेकर म्हणाले.” जेव्हा रुग्ण एखाद्या डॉक्टर समोर गुन्हा कबूल करतो. तेव्हा रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील चर्चा  संबंधित डॉक्टर गोपनीय ठरवू शकत नाहीत.”
“ पण हे डॉक्टर हे मानसोपचार तज्ज्ञ आहेत” न्यायाधीश हिरण्यगर्भ म्हणाले. “ जे त्या रुग्णा कडून त्याला वाटणाऱ्या अपराधी भावनेला बाहेर काढायचा प्रयत्न करत होते.”
“ तुम्हाला जे काय हवंय ते तुम्हाला थोडक्यात, मोजक्या शब्दात सांगू शकतो.” पाणिनी म्हणाला. “ मी हे अत्ता आणि इथेच सिध्द करू शकतो की आरोपी गुळवणी ने ती विषाची बाटली कधीच तळ्यात टाकली नाही.” 
“ कसं सिध्द करणार तुम्ही?” खांडेकर नी  तिरकस पणाने विचारले. “  हा अजून एक कांगावा करायचा आणि पेपर वाल्यांवर छाप पाडण्याचा प्रयत्न तू....”
“ ठीक आहे, खांडेकर.” न्यायाधीश हिरण्यगर्भ  मधेच म्हणाले.” तुम्हाला कोर्टाच्या नजरेला काही खास अस आणून द्यायचं आहे ?”
“ काडतुसाकरता वापरलेले अस्तर बघा. पाच असा अंक लिहिलेल्या  शिशाच्या गोळ्यांची  सोळा कवचे राहतील एवढया मापाचे हे अस्तर आहे. आता विष असलेल्या बाटली चा पुरावा क्र.अ पहा.त्यातल्या शिशाच्या गोळ्या पहा. त्यावरचा अंक  पहा तो  साडे सात आहे. किंवा आठ आहे पण   पाच नाही. आणि अजूनही तुम्हाला  पाच हा अंक कोरलेल्या काही शिशाच्या गोळ्या, त्याच्या कवचात शिल्लक असल्याचे दिसेल आणि ते कवच अर्धे रिकामे आहे.”  पाणिनी ने खुलासा केला.
“ दुसऱ्या शब्दात सांगायचे तर साध्या गोड गोळ्या असलेली बाटली  पुरावा क्र .ब  या मधे पाच हा अंक कोरलेल्या शिशाच्या गोळ्या आहेत. पुरावा क्र अ म्हणजे विषाची बाटली,त्यातील शिशाच्या गोळीवरील  कोरलेला क्रमांक आठ किंवा नऊ  आहे. या गोळ्या नेमबाजीच्या सरावासाठी किंवा माळरानावर वगैरे होणाऱ्या नेमबाजीच्या खेळात वापरल्या जातात. टेप रेकॉर्डिंग मधे उल्लेख असलेल्या ठिकाणी सापडलेल्या गोळ्या या बदक वगैरे मारण्यासाठी वापरल्या जातात.” 
पाणिनी पुढे म्हणाला, “ मी अशी मागणी करतो की आपण अत्ता च्या अत्ता इथे तराजू आणू, आणि त्या पुराव्याशी कोणीतरी लुडबूड करायच्या आतचदोन्ही बाटल्या मधे ज्या शिशाच्या गोळ्या आहेत त्याचे वजन करू.आपल्याला आढळेल की साध्या गोड गोळ्या असलेल्या बाटलीत ज्या शिशाच्या गोळ्या आहेत,त्याचे वजन, बंदुका ठेवलेल्या खोलीत मिळलेल्या दोन  कवचातून काढलेल्या शिशाच्या गोळ्या एवढेच असेल  याचा अर्थ, विषाच्या गोळ्या असलेल्या बाटलीतील शिशाच्या गोळ्या नक्कीच दुसऱ्या ठिकाणाहून आल्या आहेत.”
न्यायाधीशांनी, दोन्ही बाटल्या उचलल्या आणि हेरंब खांडेकरांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.
“ ओह, न्यायमूर्ती महाराज ! हा आणखी एक मोठा कांगावा.” खांडेकर म्हणाले.” मला हे समजायला काय मार्ग आहे? पाणिनी पटवर्धन  यांनाच त्या बाटल्यांची अडला बदल करायची संधी होती. दोन पैकी एक बाटली तळ्यात फेकल्याचा मीच त्यांच्यावर आरोप करतो.”
“ कोणती बाटली?” पाणिनी ने विचारले.
“ पुरावा  क्र.  ब - साध्या गोड गोळ्या असलेली बाटली  “
“म्हणजे  तुमचं म्हणणे आहे की पुरावा क्र. अ  विषाच्या गोळ्यांची बाटली आरोपीने टाकली.?”
“ हो.”
“ तर मग तिच्या कबुली जबाबाला पुष्टी मिळत नाही कारण पुरावा क्र. अ  मधल्या शिशाच्या गोळ्या त्या घरातून न येता बाहेरील मार्गाने आल्या आहेत. खांडेकर,तुम्ही असं म्हणाला होतात की तुम्ही हा खटला या आधारावर चालवत आहात की कोणत्याही मार्गाने कबुली जबाब मिळवला असला तरी त्याला पुष्टी देणारा पुरावा असला तर तो कबुली जबाब ग्राह्य धरावा.”
खांडेकर यांनी दोन्ही बाटल्यांकडे बघितले. आपले डोके खाजवले.” मला नक्की सांगता येणार नाही पण बाटल्या वरील लेबले बदलली गेली असतील.”
“ म्हणजे आता असे म्हणायचय तुम्हाला की आरोपीने साध्या गोड गोळ्यांची बाटली फेकली आणि मी विषाच्या गोळ्यांची फेकली?”
खांडेकर पुरते गोंधळले.काहीतरी बोलायला गेले तेवढ्यात वर्तमान पत्र वाल्यांकडे त्यांचे लक्ष गेले.ते गर्दी करून पुढे पुढे येत होते. “ कोर्टाचे कामकाज स्थगित करुया.आपल्या समोर नवीनच गोष्टी समोर येताहेत.”
“नाही , अजिबात स्थगिती नको. बंदुकीच्या गोळ्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणसाला बोलवा.त्याला तराजू आणू दे.आणि शिशाच्या गोळ्यांचे वजन करूदे.” पाणिनी म्हणाला.
हिरण्यगर्भ कोर्टातल्या व्यवस्थापकाला म्हणाले,” पाणिनी पटवर्धन सांगताहेत त्याची तातडीने व्यवस्था करा.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel