अंग नाही, रंग नाही

विचित्र हा वारा

घर नाही, दार नाही

नाही कोठे थारा ॥

नभातून अवतरे

धरेवर धावे

धर्म याचा धावण्याचा

थांबणे ना ठावे ॥

दांडगा हा जंगलाच्या

निबिडात घुसे

फांदी फांदी वाकवून

झोका घेत बसे ॥

सागराच्या, सरितेच्या

लाटांवर खेळे

गोंजारित गवताला

माळावर पळे ॥

देवळात शिरे कधी

घुमे गाभार्‍यात

भयभीत कापतसे

दिव्यातील वात ॥

कधी येता क्रोध त्याला

धावे पिशापरी

वनातून, जनातून

मोडतोड करी ॥

उन्हाळ्यात वारा पण

देवदूत होतो

अमृताचा स्पर्श सार्‍या

जगताला देतो ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel