"शेवंते, ही सुंदरा सांगतेय ते खरं हाय का???" ढोलकीवाला राम रागात विचारत होता.. 

"होय तात्या खर हाय.", शेवंताने शांतपणे उत्तर दिले..

"तुजा ईचार पक्का हाय का??" रामने कडा सवाल केला..

"व्हयं.. गुलाब जानार..." तितक्याच ठामपणे तिने उत्तर दिले..

"ठीक हाय.. मग ऐक.. मी, कमल आन् सुंदरा हा फड सोडून जातोया. पोरींचा बाजार मांडाय काडशील उद्या..", रागाने राम बोलला.. "कमले, वळकट बांध आपली.. चल सुंदरे..." जरबेने त्याने सांगितले..

त्याच्या हा निर्णय ऐकून शेवंता जागीच कोलमडली.. 

"जायच्या आगुदर एक सांगतो.. शेवंते तुझी आईने मला शपथ घातली होती की हे तुला कळता कामा नये.. पन ती गेली.. शेवंते, तुझी आई तमासगिरीण का झाली ठाव हाय तुला???", राम ने विचारले..

ती काही बोलायच्या आतच तो म्हणाला.. 

"आज सांगतो तुला.. तुझी आई एका गरीब घरातली होती.. आनि तिच्या गावच्या जत्रेत तिला पारगावच्या  देशमुखाचा पोरगा भेटला.. तुझी आई आन तो प्रेमात पडले.. लग्नाच्या आणाभाका पन घेतल्या त्यांनी.. आन ऐन जवानीच्या भरात तुझी आई गरोदर राहिली.. देशमुखाला कळताच तो घाबरला.. तो पसार झाला.. त्याचा पत्या लागंना म्हणून तुझी आई त्याच्या घरी गेली आन तवा तिला कळालं की त्याचं लगीन झालयं.. बायको हाय त्याला.. तुझ्या आईच्या हातात तवा जीव देण्यापलीकडं कायच नव्हतं.. पारगावचा तो देशमुख तुझा बाप हाय पोरी.. तुझ्या आईने खरतर स्वत विहीरीत उडी मारली होती आन् मी तिला वाचवली होती. तिच्या पोटात पोर होतं.. मी तिला बहिण मानली आन तमाशात घेऊन आलो.. आज तू जे करनार त्याने दुसरी मैनाबाई तयार व्हनार हायं.. आन माज्याच्यानं नाय बगवनार.. म्या जातो पोरी.." भरल्या डोळ्याने राम जायला निघाला..  

सगळं ऐकून शेवंता जागीच सुन्न झाली. काय बोलावं तेच कळेना.. पाटलाकडे तर गुलाब येत असल्याचा निरोप धाडलेला होता.. आता माघार पन घेता येनार नव्हती.. काहीच न सूचून ती म्हातारीकडे आली.. म्हातारीच्या कानावर तिने हे सगळं घातलं..

"तू पारगावच्या देशमुखाची पोर???" म्हातारीने रागाने विचारले..

"व्हयं.." 

"म्हंजी त्यादिवशी आलती ती बाई म्हणजे तुझी आई??" म्हातारीला तो दिवस आठवला...

खरतरं ती म्हातारी दुसरी तिसरी कोनी नसून पारगावच्या देशमुखाची पहिली बायको. देशमुख बायकांचा शौकीन होता. त्याने दोन लग्न केली होती आणि बऱ्याच बायका ठेवल्या होत्या.. पहिली ला मूल होत नव्हते म्हणून दुसरी केली आन मग काही वर्षे गेल्यावर म्हातारीने तो.वाडा सोडला होता.. देखमुखाच्यख बाहेरख्यालीपणाला कंटाळून त्याला दोनी बायका सोडून गेल्या होत्या.. 

"काय सांगतियास मावशे??", हतबुद्ध होऊन शेवंता तिच्याकडे बघत राहिली..

"चलं पोरी..आपन गुलाब ला इथून बाहेर काढू.. चलं.., म्हातारी उठत म्हणाली..

त्या दोघी फडाकडे निघाल्या पण त्यांना माहित नव्हते फडावर काय चालू आहे..

फडावर सदा आला होता.. गुलाब शून्यात हरवली होती.. 

"गुलाब.. चल इथून जाऊया आपनं.. उठ.." सदा तडक म्हणाला.. 

"तुमी इथं कवा आलासा??" चमकून गुलाब म्हणाली..

"तुमी जावा जी.. रात व्हायला आलेय. पाटलाची मानसं येतच असत्यालं.. कोनी पाहिल.." गुलाब इकडे तिकडे बगत म्हणाली..

"व्हयं.. त्या आधीच जायच हाय.. तू चल.. " असं म्हणत सदाने तिचा हात धरला आणि तो तिला ओढू लागला..

"आन् काय करु जाऊन? कुठं जायचं मी?" हात सोडवून घ्यायचा प्रयत्न करत गुलाब म्हणाली..

तिच्या हातावरील पकड अजूनच घट्ट करत तिच्या डोळ्यात बघत सदा म्हणाला, "मी नाय.. आपनं.. लगीन करायचं.. हे गाव सोडून जाऊ.. जीव अडकलाय तुझ्यात माझा.. न्हाई म्हनू नगंस.. मी.जलमभर सांभाळिन तुला.. चल..." 

गुलाबच्या डोळ्याला आसवांची धार लागलेली..

"पन अक्काचं काय?? तिला पाटील जिवंत सोडणार नायी..", घाबरून गुलाब म्हनाली.. 

सदा काही बोलायच्या आतच तिथे म्हातारी आणि शेवंता आले.. त्यांच्या लक्षात आला सारा प्रकार..

" जा तू वसू.. ह्या नरकात तू अडकू नगसं.. जा",शेवंता तिच्या जवळ येत म्हणाली..

"अक्का आगं पन.." गुलाब चाचरत बोलली..

शेवंताने तिला आपले काही.डाग आणि पैसे दिले..

"निघ तू पोरी इथून.. निघ.., सदाभाऊ घेऊन जा हिला. आन जपा.. " , भरल्या डोळ्याने शेवंता म्हणाली..

गुलाबने तिला मिठी मारली... आणि दोघी रडायला लागल्या..

"म्हातारे.. तुमी तिघी लगोलगं नदीलर या.. मी आलोचं.., सदा बोलला.. आणि त्यांनी काई विचारायच्या आतच तो गेला..

म्हातारी, शेवंता आणी गुलाब नदीवर जाऊन सदाची वाट बघू लागल्या..

थोड्याच वेळात सदा एक बैलगाडी घेऊन आला..

त्यांनी काही विचारायच्या आतच तो म्हणाला "नामाची हाय.. चला.."

"खाली उतर सदा..".,.म्हातारीने जरबेने सांगितले..

"अगं पन म्हातारे. " त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच म्हातारी ओरडली उतर म्हनाली ना..

" हे घाल तिच्या गळ्यात.." अस म्हणून एक काळ्या मण्यांच डोरलं तिने सदाकडे दिलं..

सदाने प्रसन्न मनाने ते गुलाबच्या गळ्यात घातलं आणि तो हसला.. गुलाब लाजली.. दोघं पाया पडली अक्का आणि म्हातारीच्या..

"चला , आता बसा गाडीत.. चला.." सदाने सांगताच गुलाब बसली.. 

"आता तुमा दोघीस्नी काय उचलून घेऊ का काय? बसा कि गाडीत.." सदा म्हणाला..

"किती दिवस ह्या घाणीत राहणार हायेसा अक्का?? चला आमच्यासंगट.. 

म्हातारे अगं माय हायेस तू माजी. लेकराला सोडून राहणार?? चलं ग माय.. चलं.., भरल्या गळ्याने सदा म्हणाला..

"पोरा".. म्हणत रडत म्हातारी सदा ला बिलगली... 

शेवंताला पण त्याने जवळ घेतले.. दोघी मायेच्या मिठीत रडत होत्या.. दोघींना शांत करून त्याने गाडीत बसवले आणि तो गाडी हाकायला लागला.. आणि नवीन आयुष्याची गाडी पुढे जायला लागलि होती...एका वेगळ्याच बंधनात गुंतून..

समाप्त... 

©सुप्रिया घोडगेरीकर

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel