एक गाढवी फार दिवस आजारी पडली होती. ती आता मरेल अशी बातमी पसरली. ती बातमी ऐकून काही लांडगे त्या गाढवीच्या समाचारास आले व लांबूनच विचारू लागले, 'बाईंची प्रकृती कशी आहे ?' हा प्रश्न ऐकून गाढवीजवळील तिचा मुलगा त्यांच्याकडे येऊन म्हणाला, 'अहो, बाईंची प्रकृती अशी व्हावी जशी तुमची इच्छा आहे, तशी ती अद्याप झाली नाही.'
तात्पर्य
- आजारी माणसाच्या समाचारास बरेचजण येतात. पण त्यात स्वार्थासाठीच फार जण येतात. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.