एका गरूड पक्षिणीने कोल्ह्याचे पिल्लू पाहिले आणि ते तोंडात धरले. तितक्यात कोल्हीने ते पाहिले व ती म्हणाली, 'कृपा करून माझं हे एकुलतं एक बालक नेऊ नका.' परंतु ती पक्षीण खूप दुष्ट होती. तिने काही न ऐकता आपल्या घरट्यात त्या पिल्लाला नेले व आपल्या पिलांना ते खायला दिले. ते पाहून कोल्ही खूप चिडली व तिने जवळच पेटवलेल्या विस्तवातले एक कोलीत घेतले व तिने आसपासची पाने व काटक्या गोळा करून झाडाला आग लावून दिली. आगीने गरुडाची पिले होरपळून खाली पडली. त्याबरोबर कोल्हीने त्यांच्यावर झडप घालून त्यांना खाऊन टाकले.

तात्पर्य

- स्वतःस फार सामर्थ्यवान कधी समजू नये.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel