शेतातला कडबा कापताना हाताला जी जखम होते ती होऊ नये म्हणून एका शेतकर्याने देवाला विनंती केली की, 'त्या कडब्याची धार तू नाहीशी केलीस तर बरं होईल.' देवाने ते ऐकले व त्याच्या शेतातल्या पिकांची धार नाहीशी करून टाकली. परंतु, त्यामुळे पूर्वी त्या धारेला घाबरून पक्षी शेतात येत नसत ते आता खुशाल येऊन पीक खाऊ लागले. त्यांनी हा हा म्हणता सगळ्या पिकांची नासाडी केली. तेव्हा शेतकरी आपल्या अविचारीपणाचा पश्चात्ताप करीत बसला.
तात्पर्य
- ईश्वराने जे दिले आहे त्यातच समाधानी असावे. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.