मरणाचा दिवस उजाडला. आज वैद्यांना ताप मुळींच दिसून आला नाही. त्यांनी स्नान केलें. व अल्प आहार घेतला. ते आपल्या डॉक्टरास म्हणाले. ‘Doctor, we meet for the last time, we shall never meet again.” सर्व व्यवहार गंभीरपणे  चालले होते. मृत्यूची चर्चा व्यावहरिक गोष्टीप्रमाणें चालली होती. डॉक्टाराचा या बोलण्यावर विश्वास बसला नाही. परंतु तीन तासांचे आंत त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. मरणाच्या आधी दोनच तास आपल्या शेवटल्या निमायीच्या चरित्राच्या  भागाचीं प्रुफें त्यांनी तपासिली व म्हणाले ’Lord, this is my last work in this life” शेवटचे क्षण सुध्दां मनुष्याच्या उन्नतीसाठी त्यांनी दवडिले. त्या. रानडे म्हणत असत' काम करीत असतां मृत्यु येणें ही मोठी भाग्याची गोष्ट. अशा भाग्याचें मरण शिशिरबाबूंस आलें. त्यांच्या जीवनापेक्षा तयांचे मरण सुंदर भासलें. किती शांततेचें हें मरण ! दुपारी दीड वाजतां ते एकदम आपल्या नोकरांस म्हणाले. ''सर्वजणांनी भोजन केलें का?'' 'होय' असें उत्तर आल्यावर ते म्हणाले ''निमाई गौर, मला पदरांत घ्या. '' असे शब्द बोलून ते उशीवर पडले. घशाची घरघर नाही, अशांतता, चळवळ हळूहळू गार पडणें कांही म्हटल्या कांही नाही, मरणाच्या आधी येणा-या या चिन्हांचे कोठेंच दर्शन झालें नाही. दोन तीन आचके आणि हा  महाभाग आपला देह सोडून 'अव्यंग अशा  जधामास निघून गेला.  या देहपंजरांतनू पळून जातांना, तोंडावर शांतता, गंभीरपणा, सुखायांचेच सात्विक तेज विलसत होतें.

शिशिरकुमार घोष हे वृतपत्रकार, ग्रंथकार, सर्वात धर्मशील ईश्वर भक्त म्हणून अजरामर झाले आहेत. ज्या वेळेस देशी वर्तमानपत्रांस मान नव्हता अशा वेळी निर्भीडपणे व जोरदारपणे त्यांनी आपलें पत्र  चालविलें. लोभास ते बळी पडले नाहीत. मोहांत अडकले नाहींत देशसेवेचें काम केलें. त्यासाठी सरकारच्या इतराजीची यत्किंचितही दरकार दाखविली नाही. लो. टिळक १८९० च्या सुमारास कलकत्यास गेले होते. त्यांच्या मनावर शिशिरबाबूंच्या एकंदर चारित्र्याचा फारच परिणाम झाला. 'त्यांच्या पायांशी असून आम्ही दोघांनी धडे घेतले' असे मोतिलालांनी लिहिलें आहे. टिळकांनी आपल्या केसरी पत्रावर झालेल्या  खटल्यांच्या वेळी जें लोकोत्तर धैर्य दाखविलें तें दाखविण्यास त्यांस शिशिरबाबूंनी शिकविले. देशसेवेस कसे लोक पाहिजेत याविषयी ते म्हणत.  “Select for your work only those who are willing to labour without any reward. Make one essential condition of membership self effacement. Allow no member to thrust forward,  expel him who is vain and hankers after prominence. Impart vitality to your people by your own selfless activity. Stick to truths,  God will  bless your labours” या सांगीप्रमाणें ते वागले. ते सत्याला चिकटलेम्हणून सत्यस्वरुपी परमेश्वरानें त्यांस सर्वत्र रक्षिलें. एकदां टिळकांनी काही विचारल्यावर ते म्हणाले ‘Always remember this great truth, God will never bless your work unless you can extinguish self, so far as that is possible, officials and others may tempt you to swerve from your. path of duty. Resist and treat such attempts with scorn’- लो. टिळक यांना शिशिरबाबूंविषयी खरोखरच आदर व भक्ति होती. १९१८ च्या जानेवारी महिन्यांत त्यांची पुण्यतिथी होती. तेव्हा टिळक कलकत्यास आले होते. ते म्हणाले.   ‘I had the pleasure and honour of being personally acquainted with Shishir babu. I have learnt many lessons sitting at his feet. I revered him as my father and I venture again to say that he, in return loved me as his son. I can call to mind many an interview that I had with him at the पत्रिका office some of which lasted for hours. I have distinct recollections of what he told me of his experiences as a journalist with tears in his eyes &sympathy in his words. I then  requested him I remember now to put down those incidents,  at least to leave noted in writing so that they might serve the future historian of the country or even the writer of his life."

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel