तवपुसतीहोयमाता ॥ तुम्हीझणेखेदकरिताचिता ॥ तरीज्ञानासारिखाआता ॥ समाधीसीबैसविता ॥१॥

हेसांगावेसविस्तर ॥ याचेकोणकोणअवतार ॥ बंधुत्रिवर्गहेसाचार ॥ आणितेभगिनी ॥२॥

देवम्हणतीब्रह्माहोये ॥ सोपानदेवनेणसीकाय ॥ निवृत्तिशिवज्योतिर्मय ॥ ज्ञानदेव ब्रह्मनिघोट ॥३॥

ऐसेब्रह्माविष्णुहर ॥ मुक्ताईतेमूळमातासाचार ॥ तारावयाचराचर ॥ कलीमाजीअवतरली ॥४॥

रुक्मिणीपुसेदेवासी ॥ काकलीमाजीजनदोषी ॥ हेघातलीदेवापुसी ॥ तेसांगतीमहाविष्णु ॥५॥

तरीऐकेहोसाचार चित्ते ॥ तूकायनेणसीत्याव्यासाते ॥ ग्रंथीसांगीतलेभारते ॥ कलीमाजीजनदोष ॥६॥

कृष्णअवतार झाला ॥ पांडवीनिजठावटाकिला ॥ तेथोनी एकशुकजाहला ॥ जन्मेजयापासून ॥७॥

तयामागेविक्रमशक ॥ पुण्यपवित्रसकळलोक ॥ कलियुगीपुण्यश्लोक ॥ उज्जनीयेनांदत ॥८॥

तेणेएकशतपंचतीस ॥ हरिलेकलिकाळदोष ॥ पुढेशालिवाहनव्हावयास ॥ अवतारजाणपैठणी ॥९॥

तोशालिवाहन ॥ अठराहजारजाण ॥ ते क्षेत्रप्रतिष्ठान ॥ गंगातीरीप्रत्यक्ष ॥१०॥

याशकामाजीप्रथम ॥ राजाभोजउत्तम ॥ मगपुण्यपुरुष जन्म ॥ थोडेघेतीलकलियुगी ॥११॥

राजेभ्रष्टयवनझाले ॥ ठाईठाईदोषघडले ॥ मगयेहीअवतारघेतले ॥ कलिदोषहरावया ॥१२॥

रुक्मिणी म्हणेस्वामी ॥ सत्यसांगीतलेतुम्ही ॥ पुराणप्रसिद्धआम्ही ॥ अवतारचरित्रजाणतसो ॥१३॥

नामाम्हणेपुढेहेजन ॥ यवनसंसर्गेकठिण ॥ होतागातीहरिचेगुण ॥ तेउद्धरतीसर्वथा ॥१४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग 1