ऐसेदेखीलेवैष्णवी ॥ वैकुंठनगरीचिरंजीवी ॥ आणिज्ञानदेवगोसावी ॥ विष्णुमूर्तिचतुर्भुज ॥१॥

तलालोरीवातिपावा ॥ समाधानहोतसेजीवा ॥ नामाविनवितोकेशवा ॥ तुझ्यादरुशनेनिवालो ॥२॥

तवरुक्मिणीनेविनविले ॥ यासीभोजनसाराकावहिले ॥ तव अक्रुरेपाचारिले ॥ समस्तासीदेखा ॥३॥

उद्धवघालित आसने ॥ ताटेविस्तारिलीवोणे ॥ राहीरुक्मिणीविचक्षणे ॥ पंचामृतेवाढिली ॥४॥

समस्तभक्तदाटले ॥ पांथीकरयेकवटले ॥ नानापरीभातविस्तारिले ॥ परीमळीतमगमगा ॥५॥

वरीमिरवेमुगाचेवरण ॥ कथिकावाढिलीसंपूर्ण ॥ नानाकोरिकेविस्तीर्ण ॥ रुक्मिणी वाढीतसे ॥६॥

कामधेनुचेघृत ॥ पयोदधिक्षीरवाढित ॥ नानापत्रशाखाशोभत ॥ वैष्णवांचेताटी ॥७॥

ऐसेसमस्तासंपूर्ण ॥ भोजनाबैसविले प्रीतीकरून ॥ तवदेवबोलतीआपण ॥ ज्ञानदेवासी ॥८॥

निवृत्तीसोपानबोलावा ॥ मुक्ताइसीआणवा ॥ पांथिकारासीरिघावा ॥ ताटीबैसवासमस्तासी ॥९॥

विष्णुमूर्तीचतुर्भुज ॥ तुळसीमंजिरीकेशिराज ॥ त्यांचेमस्तकीवहातसे ॥१०॥

चरणतीर्थघेतले ॥ तेणेसमस्तमंदिराशिंपिले ॥ आपणमुखीघातले ॥ म्हणेकृत्यझालोमी ॥११॥

नामातिष्ठतउभाद्वारी ॥ त्यासीहीरुक्मिणीताटकरी ॥ ऐसीभोजनेपरोपरी ॥ वैष्णवांचीझाली ॥१२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग 1