तवतेथेनवलवर्तले ॥ आकाश असेविमानीदाटले ॥ म्हणतीमूळपीठवैकुंठदेखिले ॥ पुंडलिकासगट ॥१॥

पंढरीहून आलेकैसे ॥ पुंडलिकदेवसरसे ॥ ज्ञानदेवासवेनामाअसे ॥ विष्णुभक्तहीअपार ॥२॥

राहीरखुमाईसत्यभामा ॥ गाईगोपाळमेघश्यामा ॥ म्हणतीपहामहिमा ॥ याविष्णुभक्तांचा ॥३॥

सवेध्रुवप्रर्‍हाद अंबऋषी ॥ रुकमांगदसूर्यवंशी ॥ आनऋषीमुनीतापसी ॥ ऐसासहितवनमाळी ॥४॥

बळीभीष्मनारद ॥ आणिबिभीषणसुबुद्ध ॥ उद्धवअक्रूरविद्वद ॥ हनुमंतादिकरूनी ॥५॥

हाहाहूहूगंधर्वगाती ॥ रुणझुणरुणझुणपावेवाजती ॥ देवांगनाआरतीओवाळिती ॥ देवभक्तांसहित ॥६॥

ऐसाशुभकाळसमयो ॥ जालाभाग्याचाउदयो ॥ ज्ञानदेवनामदेवयाहो ॥ धन्यधन्यधरातळी ॥७॥

नामानुघडीदृष्टीसी ॥ विष्णुमूर्तीसीलीनजाहाले ॥८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग 1