नामानराहेखेदकरु ॥ केशवठेवीअभयकरु ॥ म्हणेतूदुःखियाथोरु ॥ ज्ञानदेवाकारणे ॥१॥

धन्यधन्यतुम्हीभक्त ॥ नित्यविष्णुचरणीरत ॥ पुण्यशीळभाग्यवंत ॥ ज्ञानदेवनामया ॥२॥

तुमचे निजनहेकृतार्थ ॥ कवित्वेतरेलहेसत्य ॥ मायामोहनिरसेसत्य ॥ नामस्मरणेतुमचेनी ॥३॥

धन्यज्ञानदेवपुण्यशिळ ॥ ज्ञानदेवाऐसासुढाळ ॥ मीनदेखेभूमंडळ ॥ सकळहीपाहता ॥४॥

तूकरसीखेदत्याचा ॥ तरीतोमाझाआत्माहेवाचा ॥ भाषासांडीद्वैताचा ॥ निजरूपेपाहेपा ॥५॥

तुम्हीभक्तआवडते ॥ तुमचेनीसाजिरेपूर्णचित्ते ॥ मजपंढरीसयेणेआवडते ॥ नामेगातितेयेप्रीती ॥६॥

पुंडलीकमाझाभक्तसखा ॥ परीप्रेमळतुम्हीविशेषा ॥ तुमचेनिसर्वदुःखा ॥ हरणेमीहेजाणावे ॥७॥

नामाम्हणेज्ञानदेवाचे ॥ मजदर्शनझालेसाचे ॥ तरीचरंगणीमीनाचे ॥ श्रीहरीकीर्तनीपंढरीसी ॥८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग 1