एकदा एक कासव जमिनीवर चालून चालून कंटाळले. आकाशातून पृथ्वी कशी दिसते ते पहावे असे त्याला वाटू लागले. मग ते पक्ष्याकडे जाऊन म्हणाले की, 'जो कोणी मला आकाशातून फिरवील व सृष्टीचे वर्णन करून सांगेल त्याला मी पृथ्वीच्या पोटातील रत्नांच्या खाणी दाखवीन.' गरुडाने ही गोष्ट कबूल केली व आकाशातून पृथ्वीवरील सर्व आश्चर्ये दाखविली. मग खाली उतरल्यावर तो कासवाला म्हणाला, 'अरे, तुझ्या रत्नाच्या खाणी कुठे आहेत ते दाखव.' त्यावेळी त्या कासवाने वेड्याचे सोंग घेऊन गरुडाला फसविण्याचे ठरविले. ती त्याची लबाडी पाहून गरुडाला फार राग आला व त्याने कासवाच्या नाजूक ठिकाणी आपली नखे रोवून त्याला मारून टाकले.
तात्पर्य
- बोलल्याप्रमाणे वागले नाही तर लोक त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.