एक भुकेलेला कोल्हा फिरत फिरत एका द्राक्षाच्या मांडवाखाली आला. वर पाहतो तर सुंदर पिकलेले द्राक्षांचे घड लागले आहेत. पण मांडव उंच असल्यामुळे ते त्याला हाती लागेनात. त्याने खूप उड्या मारल्या. पण एकही द्राक्ष त्याला मिळाले नाही. मग थोडे दूर जाऊन द्राक्षाकडे बघत तो म्हणाला, 'ही द्राक्षे ज्याला कोणाला हवीत त्याने घ्यावी. पण ती हिरवी अन् आंबट आहेत म्हणून मी सोडून जातो.'
तात्पर्य
- एखादी वस्तु आपल्याला मिळाली नाही म्हणजे आपला कमीपणा लपवून त्या वस्तूलाच दोष देणारे बरेचजण असतात. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.