एका मुसलमानाच्या घरचा स्वैपाकी एकदा एक जिवंत मासा तेलात तळत असता, त्या उष्णतेने त्या माशाला इतक्या वेदना होऊ लागल्या की ते टाळण्यासाठी त्याने चुलीत उडी मारली. पण त्यामुळे त्याची अशी स्थिति झाली की पूर्वीची बरी होती, असे त्याला वाटू लागले.
तात्पर्य
- कधीतरी एखादे औषध प्रकृतीला इतके अपायकारण होते की त्यापेक्षा मूळचा रोग बरा असे म्हणण्याची पाळी येते. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.