इतिहास साक्षीदार आहे जेंव्हा मराठा अस्वस्थ होतो तेव्हा इतिहास घडतो अशाच एका नव्या इतिहासाची सुरवात झाली दिनांक ०९ ऑगस्ट २०१६ रोजी. कोपर्डी येथे घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण मराठा समाज अस्वस्थ झाला होता. मराठ्याची हीच अस्वस्थता मोर्चांना होणाऱ्या लाखोंच्या गर्दीतून दिसून येत होती. कोपर्डी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि कोपर्डीच्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उताराला होता.
वास्तविकापणे कोपर्डी घटना ही केवळ एक निमित्त होते. मराठा क्रांती मोर्चांना होणाऱ्या प्रंचड गर्दीतून कित्येक वर्षांपासून आपल्या पूर्ण न झालेल्या मागण्या,आपली सामाजिक आणि आर्थिक दुरावस्था,सरकारची चुकीची धोरणे याबद्दलचा मराठ्यांचा असंतोष दिसून येत होता.
कित्येक वर्षांपासून नेतृत्वाचा अभाव आणि विविध राजकीय पक्षांमध्ये विभागलेला मराठा समाज आता एकत्र आला होता. कोपर्डीच्या ताईला न्याय , मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण, शेतमालाला हमीभाव, एबीसी सवलतीच्या अटींच्या तरतुदीत बदल , स्वामी नाथन आयोग लागू करणं आशा प्रमुख मागण्यांसाठी मराठा समाज एका मागून एक मोर्चे काढत होता.
मराठा म्हटलं की टुमदार घर, पाच पन्नास एकर जमीन अस काहीस दृष्य लोकांसमोर उभ राहत. एके काळी आमची अशी आर्थिक सुबत्ता होती देखिल, मात्र पिढ्यानपिढ्या होणार शेतीच तुकडीकरण ,शेतमालाला नसणारा हमीभाव,आम्हाला नसणार आरक्षण यामुळे आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक आशा सर्वाच क्षेत्रात मराठा समाज पिछाडीवर गेला आहे.
आज शेती, कारखान्यात ७ ते ८ हजाराची नोकरी किंवा मुंबईत मोलमजुरी इथपर्यंतच मराठा समाज खितपत पडला आहे. त्यामुळे जर आमची ही स्थिती सुधारायची असेल तर आम्हाला आरक्षण मिळयायलाच हव,तो आमचा हक्कच आहे.
मराठा क्रांती मोर्चांच्या माध्यमातून मराठा समाज एकजूट झाला होता,आपल्या मागण्यांसाठी मराठा समाज लाखोंच्या संख्येने एकत्र आला होता, मोर्चाना होणारी प्रचंड गर्दी ही अनेक राजकारण्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरली होती. काही राजकीय नेत्यांनी या मोर्चांच्या गर्दीचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला पण मराठा समाजाने या राजकीय नेत्यांना काडीचीही किंमत दिली नाही.
मराठा क्रांती मोर्चा हा इतर सर्व मोर्चे आणि आंदोलनांहुन वेगळे होते. हे सर्व मोर्चे शांततेच्या मार्गाने होते मोर्चात कोणत्याही जाती धर्माबद्दल घोषणा नव्हती मोर्चामध्ये स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. मोर्चामध्ये सर्वात पुढे तरुणी व महिला त्याव्हा मागे पुरुषमंडळी व तरुण असा क्रम होता. या मोर्चांमध्ये राजकारण्याना सर्वात शेवटचे स्थान होते. मोर्चामध्ये ठिकठिकाणी स्वयंसेवक ही तैनात होते. मोर्चानंतर कुठेही कचरा दिसत नव्हता. मराठ्यांच्या या मोर्चांतुन मराठ्यांचा संयम, शिस्त त्यांच्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीचा आणि संस्कारांचा प्रभाव दिसून येत होता.आपल्या मागण्यांसाठी लोकशाहीच्या मार्गाने कस लढावं याचा एक आदर्शच मराठा समाजाने जगासमोर ठेवला होता.
एकीकडे मराठ्यांचे हे मोर्चे जगभरात अभ्यासाचा विषय ठरत असताना दुसरीकडे मात्र काही प्रसार माध्यमांनी व समाजकंठकांनी मराठ्यांचे हे मोर्चे काही विशिष्ट समाजाच्या विरुध्द आहेत असा दुषप्रचार केला. यातूनच मराठ्यांच्या मूक मोर्चांच्या विरोधात काही प्रतिमोर्चे निघू लागले, सरकारनेही मोर्चामध्ये फूट पाडण्यासाठी आणि मोर्चापासून लक्ष विचलित करण्यासाठी अनेक खेळी खेळल्या. या सर्व गोष्टी पुरोगामी महाराष्ट्रला न शोभणाऱ्या होत्या. पण या सर्व राजकारणाचा मराठयांच्या एकीवर काहीएक परिणाम झाला नाही.
एका मागून एक असे मराठ्यांचे एकूण ५७ मोर्चे निघाले. प्रत्येक मोर्चाला मराठा बांधव लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. हे सर्व मोर्चे शांततेच्या मार्गाने होते. सर्व मोर्चांच्या मागण्या या सारख्याच सारख्याच होत्या. एकाच मागणी कित्येकदा करून सरकारने मराठ्यांच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाहीत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.
दरम्यानच्या काळात सरकार आणि राजकीय पक्षांचे षड्यंत्र, मोर्चांमध्ये पडलेला खंड यामुळे मराठ्यांचे मोर्चे थंडावले आहेत, मराठ्यांमध्ये फूट पडली आहे अस काहीस वातावरण निर्माण झाल होत.
कित्येक वर्षांनंतर मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी एकत्र आला होता,कोणत्याही राजकीय नेतृत्वाशीवाय मराठा समाज एकजूट झाला होता. आपले सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवत संपूर्ण मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाला होता हा मराठा समाज आता सहजासहजी वेगळा होणार नव्हता.
आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सकल मराठा समाज एकवटला होता. तो आता कोणत्याही राजकीय षड्यंत्रांनी विभक्त होणार नव्हता.
दिनांक ०९ ऑगस्ट २०१७ रोजी सकल मराठा समाजाने मुंबई मध्ये राज्यव्यापी मराठा क्रांती महामोर्चाच आयोजन केल होत. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा या मोर्चाचा मार्ग होता. मराठ्यांच्या या मोर्चाला काहीसा कमी प्रतिसाद मिळेल असा काही लोकांचा समज झाला होता. हे सर्व समज फोल ठरवत मराठ्यांनी मुंबईच्या महामोर्चाला तुफान गर्दी केली. मिळेल त्या गाडीने,ट्रेनने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन मराठा तरुण मुंबईत दाखल होत होता. गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढत मराठा समाज मुंबईत एकवटला होता. मोर्चातून झालेल्या शक्तिप्रदर्शनातुन सरकारवर दबाव आला. सरकारने मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. येणाऱ्या काळात जर सरकारने मराठ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक पाऊले उचलली नाहीत तर भविष्यात होणाऱ्या मराठ्यांच्या असंतोषाच्या उद्रेकाला पूर्णतः सरकारच जबाबदार आसेल!
विरोधी पक्षनेते हे सरकारवर टीका करतात की तुम्ही मराठ्यांना आरक्षण का देत नाही आणि सरकार विरोधी पक्षावर टीका करते की तुम्ही पन्नास वर्षात काय केल? मग आता गेली तीन वर्षापासून केंद्रात आणि राज्यातही तुमची सत्ता आहे मग तुम्ही का आरक्षण देत नाहीत.तुमच घोड तरी कुठ आढलाय?
माझी सरकार आणि विरोधी पक्ष दोघांनाही विनंती आहे की त्यांनी आपापसात भांडत न बसता मराठ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
५८ मोर्चे काढून आम्ही आमच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत त्याही शांततेच्या मार्गाने. आम्ही आमचा हक्क आणि न्याय मागत आहोत. जर तुम्ही आमचा हक्क आम्हाला देत नसाल तर तो हक्क कसा हिसकावून घ्यायचा हेही मराठ्यांना चांगलाच माहीत आहे. तुम्ही इतिहास पहिलाच आसेल की गनिमीकाव्याने मराठ्यांनी कस मुघलांना पळवून लावल होत.
राज्यात एकूण ३२% मराठा आहे. मराठ्यांनी ठरवल तर ते सरकारही बदलू शकतात. त्यामुळे सरकारने डोकं ठिकाणावर ठेऊन मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा मराठ्यांच्या ऱ्होशाला सामोरं जायला तयार व्हावं.
जिजाऊंचे संस्कार आणि महाराजांची शिकवण घेऊन मराठा समाज एक झालाय. मराठ्यांना समजलय की त्यांची ताकद ही त्यांच्या एकीमध्ये आहे.
आता हा संघटित झालेला मराठा कधीच वेगळा होणार नाही. मराठ्यांच हे भगवं वादळ आता कोणीच अडवू शकणार नाही.
मराठा बांधवांनो आपण असेच एकजूट राहुयात आणि आपला हक्क आणि न्याय मिळवूयात.
एक मराठा,लाख मराठा
जय जिजाऊ
जय शिवराय
आशिष अरुण कर्ले.
३२ शिराळा (सांगली)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.