लेखक - ओंकार दिलीप बागल
Gahlot Institute of Pharmacy, Koparkhairne, Navi Mumbai- 400 709
मो. ७५०६५८२३४१
प्राचीन काळापासून भारताने संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे . वास्तुशास्त्रात विविध प्रकारचे स्तूप , घुमट ,स्तंभ, वास्तूसाठी वापरण्यात आलेल्या साधनसामग्री . मोजमापशास्त्रात मोजपट्टी ,वजनमापं इ .शेतीसाठी लागणारे अवजारे , नांगर इ . टिपू सुलतान आणि हैदर अली यांनी अग्निबाण आणि क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये भरीव कार्य केल्याचे इतिहासात आढळून येते . त्याबरोबरच कार्बनपासून बनवण्यात आलेली शाई याचाही वापर झाला आहे . वैद्यकशास्त्रातील आयुर्वेद ,सिद्धा , योगा इ. त्याचबरोबर सुश्रुता संहिता मध्ये सुश्रुता यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया , प्लास्टिक सर्जरी, शरीरात खडे तयार होण्याची क्रिया , हृदयविकाराचे झटके , कुष्ठरोग निदान यावर सांगितले आहे . त्याचप्रमाणे आर्यभट्ट यांचे शून्य आणि ब्रह्मगुप्त यांचे गुरुत्वाकर्षण, शिवाय गणितावरील विविध सिध्दांत सांगितले आहेत .
आपल्या भारताकडे संशोधन क्षेत्रातील इतिहासाचा वारसा आहे. श्रीनिवास रामानुजन यांनी गणितांतील सिध्दांत, विश्लेषण यांत मोलाचे योगदान दिले आहे . प्रफुल्लचन्द्र रॉय यांनी भारतातील औषधनिर्माण (Pharmaceutical)करणारी कंपनी स्थापन केली . डॉ.होमी जहांगीर भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाची पायाभरणी केली. सी.वी.रामन यांना "रामन इफेक्ट्स" साठी नोबेल प्रदान करण्यात आला . डॉ.जगदीशचंद्र बोस यांनी भारतातील "रेडिओ आणि मायक्रोवेव्ह ऑप्टिकसला" चालना दिली .सत्येंद्रनाथ बोस यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन यासोबत "विद्युत प्रहरींचे" गूढ उलगडण्यात सहयोग दिला आहे . मेघनाथ सहा यांनी सहा समीकरणाद्वारे (Saha Equation)अवकाशातील ताऱ्यांच्या भौतिक आणि रासायनिक स्थितीचे शोधकार्य केले आहे .डॉ.विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारताने अवकाशसंशोधनात उज्वल कार्ये केली आहेत. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात भारताने अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे बनवून देशाची ताकद वाढवली आहे .परंतु गेल्या काही दशकांत भारतातील संशोधन आणि संशोधक हे प्रमाणात घट होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोणत्याही राष्ट्राच्या शिक्षण, रोजगार,व्यवसाय,अर्थव्यवस्था,आरोग्य,सक्षमीकरण इ. संशोधन आणि विकास यावर भर दिला जातो . भारत लोकसंख्येत विश्वातील "दुसरे" राष्ट्र आहे . भारताचा विकासदर स्थिर असून भारताचे "संशोधन आणि निर्मिती-२०१५" च्या जागतिक क्रमवारीत "पाचवे" स्थान आहे . भारतात प्रत्येकी १०,००० श्रमिकांमागे केवळ चार संशोधक असे समीकरण आहे . जगातील इतर विकसनशील राष्ट्रांच्या तुलनेत हे अतिशय कमी प्रमाण आहे.
भारताकडे संशोधन क्षेत्रासाठी गरजेचे पूरक मनुष्यबळ आणि उपलब्धता नक्कीच आहे.मग भारत मागे पडण्याची कारणे काय आहेत?
१)शैक्षणिक अभ्यासक्रम- ब्रिटीश कालावधीत आपल्याला व्यावसायिक शिक्षण देण्यास अग्रस्थानी ठेवले गेले मात्र आजही आपण तेच पाढे गिरवताना दिसत आहोत .
२)शैक्षणिक पध्दती- आपण अजूनही जुन्या शिक्षणपद्धतीचा वापर करत आहोत परंतु जगाशी टक्कर देताना आधुनिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक वाटते.
३)तरुण विद्यापीठे- भारतातील अग्रक्रम विद्यापीठे नव्याने उदयास आलेली आहेत. (IIT-1951) तर इतर देशांतील विद्यापीठे खूप जुनी आहेत .
४)शिक्षकांचे अपुरे वेतन- भारतातील शिक्षकांचे वेतन इतर श्रमिकांच्या मानाने फारच कमी आहे .
५) कौशल्यपूर्ण शिक्षणाचा अभाव- विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यास प्राधान्य द्यायला हवे.
६) आर्थिक देणगीचा (Grants) अभाव- संशोधनासाठी लागणारे आर्थिक साहाय्य यावर विचार होणे गरजेचे आहे.
७) तांत्रिक ज्ञानातील त्रुटी- वर्ष २०१६ च्या Infosis च्या जागतिक अहवालानुसार भारतातील ७०% तरुणांमध्ये तांत्रिक ज्ञानात त्रुटी असल्याचे आढळले.
भारतातील मागील काही वर्षातील महत्वपूर्ण संशोधन खालीलप्रमाणे :
१)डॉ.सूर्यासारथी बोस आणि टीम यांनी वर्ष २०१६ मध्ये लहान प्रमाणावर वैशिष्ट्यपूर्ण केलेला जलशुद्धीकरण प्रकल्प.
२)जे.फातिमा बेंझाईर यांनी संशोधनात सुरक्षित वापरण्यायोग्य रंग (stain) निर्मिती केली.
३)एस. अशोकन आणि टीम यांनी हृदयविकाराचा झटकयाची सूचना देणारे यंत्र तयार केले
४)प्रो. सौमित्र आणि टीम यांनी "Hepatitis C" वर प्रभावी लसीकरण तयार केली.
५)डॉ.साई सीवा गोरथी यांनी स्मार्टफोनचा "मलेरिया" हा आजार दर्शवणारे यंत्रात रूपांतरित करण्यात कार्य केले
६)प्रो. जि.मोहन राव यांनी मोतीबिंदू या आजारावर कमी दरात लेन्स (lens) ची निर्मिती केली आहे.
(Source-publicdomainpictures.net pixabay.com)
त्याचबरोबर भारतातील शालेय ते पदवीधर विद्यार्थी विविध उपक्रमाद्वारे नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्याचा प्रयत्न करीत असतात.अगदी शालेय (इ.५वी-इ.१०वी) विद्यार्थी देखील भाग घेत असतात. उदा.जलशुद्धीकरण प्रकल्प, हातमाग यंत्र, सौरऊर्जेचा वापर करून बीजारोपण करणारे यंत्र, गॅस गळतीचे संकेत देणारे यंत्र, कचरा व्यवस्थापन, झाडापासून लाख मिळवणारे यंत्र, डिजिटल लॉक सिस्टीम, धान्यातील कचरा गोळा करणारे यंत्र इ. ही जिद्द मोठ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरू शकते .यावरून सहजरित्या हे सिद्ध होते की भारतात बुद्धिमत्तेची आणि नवनिर्मात्यांची कमी नाही.
"People being not research oriented in India is not because of lack of curiosity or scientific aptitude but more because of social, political and financial reasons "
संशोधन क्षेत्रातील वाढीस चालना देण्यासाठी कार्यरत राहणे आवश्यक आहे. यासाठी सरकारी सेवा पुरवणाऱ्या संस्था आणि उद्योगसमूह यांनी आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. आर्थिक सहाय्य किंवा देणगी पुरवताना कडक नियमांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. देशातील विद्यापीठे ,शैक्षणिक संकुले सहयोगाने एकत्रित कार्यरत राहावे . संशोधक आणि विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण ज्ञान विकसित करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे . शैक्षणिक अभ्यासक्रमातील गुणवत्तावाढीस चालना देण्याचा प्रयत्न करावा.
आपल्या देशात तरुण संशोधकासाठी अनेक शिष्यवृत्ती योजना आणि उपक्रम भारत सरकार, राज्य सरकार आणि स्वयंसेवी संस्था राबवत असतात.त्या योजनांचा सुयोग्य लाभ घेण्याचा प्रयत्न करावा.
उदा. Fast Track Schemes for young scientists, PM's Rural Fellowship, William Clinton fellowship, Azim Premji fellowship, Rajiv Gandhi National fellowship, Bose National fellowship, Ramanujan fellowship etc.
भारतातील तरूणांनी संशोधन क्षेत्रात कार्यरत राहण्याबाबत विचार करायला हवा. संशोधनातील आपल्या कक्षा रुंदावण्याकडे अधिक भर द्यायला हवा.संशोधनाची प्रक्रिया ही खूप वेळखाऊ आणि गुंतागुंतीची असली तरीही त्यावर पर्याय शोधण्यास सक्रिय असायला हवे . संशोधनासाठी आर्थिक आणि सामाजिक साहाय्य यावर अवलंबून असले तरी त्यातूनही मार्ग काढण्याची मानसिकता निर्माण करावी . तरुण विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणाबरोबरच संशोधन क्षेत्राचाही विचार करावा . आपले ज्ञान हे केवळ अधिक नफा मिळवून देण्याऱ्या नोकरीत न वापरता त्याचा आणखी काही सुयोग्य वापर होईल का याचाही विचार करावा . "एक यशस्वी संशोधन हे कित्येक गरजू लोकांसाठी महत्वाचे ठरत असते ". संशोधनात्मक कार्यांचा वापर हा वर्षानुवर्षांसाठी उपयोगाचे ठरत असते . त्याचबरोबर आपल्या बुद्धिमत्तेचा आणि मेहनतीचा वापर हा देशासाठी आणि समाजासाठी वापरण्याची अनोखी संधी आपल्याला प्राप्त होत असते.