विक्रांत दत्ताऋाय देशमुख
संस्थापक – अध्यक्ष
युवा मोरया सामाजिक संस्था, सातारा
आपण या समाजामध्ये राहत असतो, या समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून काही सामाजिक परिस्थितीची जाणिव असणारे लोक कार्य करित असतात. समाज्यामध्ये खूप सारे विषय आहेत की, त्यांच्यावर आजही मोठ्या प्रमाणावर काम करणे गरजेचे आहे, त्यातीलच एक विषय म्हणजे ’रक्तदान’ आज आपल्याकडे रक्तदानाविषयी पाहिजे तेवढी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे युवा पिढीचा रक्तदानाकडे पाहिजे तेवढ्या प्र्रमाणात कल दिसत नाही, जेव्हा आपल्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील व्यक्तीला रक्ताची गरज भासते, तेव्हा आपल्याला रक्तदानाचे महत्त्व समजते. मग अशा प्रसंगी आपण धावपळ करफन रक्ताची कोठून सोय होते ते बघतो, व असंख्य त्रास सहन करून ते उपलब्ध करून घेतो तेव्हा मात्र रक्ताची किंमत समजते, आणि आपणही रक्तदान करत जावे ही भावना तयार होते.
रक्तदानाविषयी आज आपल्याकडे समज-गैरसमज खूप आहे रक्तदान ही गोष्ट आहे की ते स्वतःच्याच शरीरात तयार होत असते, स्वतःच दान करायचे असते साधे सांगायचे झाले तर आपल्या शेतामधल्या विहरीसारखे असते पाणी आपण उपसले की ते परत आपोआप जमा होते, तसेच रक्ताचेही असते, एकदा रक्तदान केले की २४ तासांमध्ये परत ते आहेत्या परिस्थितीमध्ये जमा होते. आपल्या मानवी शरीरामध्ये रक्ताचे २१ युनिट असतात त्यातील दर ३ महिन्यांनी आपण १ युनिट दान करफ शकतो. रक्तदान हे पूर्णपणे वेदनाविरहित असते. नियमित रक्तदानामुळे, स्वतःला आलेली कमतरता दूर करण्यासाठी शरीरात तत्काळ नविन पेशी तयार होतात आणि आरोग्य चांगले राहते. रक्तदान केल्याने कॅलरी आणि Fat लवकर बर्न होतात आणि लठ्ठपणापासून बचाव होतो. तसेच नियमित रक्तदानामुळे रक्तपुरवठा चांगला राहतो, शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो संशोधनामध्ये असेही सिध्द झाले की रक्तदानामुळे आनंद मिळतो आणि मानसिक स्थिती चांगली राहते. तसेच आपल्या रक्तदानामुळे एखादया रुग्णाचा प्राण वाचविण्यास मोठी मदत हाते.
युवा मोरया सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ६ वर्षामध्ये तब्बल २७ रक्त्दान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून चारशे पेक्षा जास्त गरजूंना वेळप्रसंगी रक्ताची मदत करून रुग्णांचा जीव वाचविण्यात आला आहे. युवा मोरया संस्थेच्या माध्यमातून युवा पिढीने व्यसनाधिनता टाळून रक्तदानाकडे सक्रीय व्हावे यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेतले जातात. तसेच सोशल मिडीयाचा वापर करून रक्तदानाविषयी जनजागृती केली जाते. संस्थेचे काम आज महाराष्ट्रभर विस्तारले असून महाराष्ट्रामधील एखादा गरजू रुग्ण असेल आणि त्याला रक्ताची आवश्यकता असेल तर संस्थेचा रक्तदाता त्या ठिकाणी जावून रक्तदान करतो व गरजू रुग्णाचे प्राण वाचविण्यास मदत करतो. संपूर्ण महाराष्ट्रभर संस्थेचे २ हजारपेक्षा जास्त रक्तदाते कार्यरत आहेत.
आपल्या समाजातील युवकांची आवड काय असू शकेल हे कोण सांगू शकत नाही परंतु युवा मोरया सामाजिक संस्थेच्या सभासदांची आवड कोणत्याही गरजू रुग्णांचे रक्ताविना प्राण जाता कामा नये ही आहे, आणि यासाठी रात्रंदिवस काम चालू असते. रक्तदानाविषयी जनजागृती करणे आणि युवकांचा-युवतींचा रक्तदानात जास्तीत जास्त सहभाग वाढविणे हे आव्हान संस्थेने स्विकारले आहे, त्यासाठी खूप मेहनतीने आणि जिद्दीने काम चालू आहे.
!! वसा समाजकारणाचा वेध भविष्याचा !!