उंदरामुळे जाळ्यातून सुटलेला सिंह खूष होऊन त्या उंदराला म्हणाला, 'अरे, तू माझ्यावर फार उपकार केले आहेस त्यासाठी तुला जे काय हवे असेल ते माझ्याजवळ माग, मी देतो.' ते ऐकून उंदीर गर्वाने फुगला व आपल्या योग्यतेचा विचार न करता म्हणाला, 'महाराज, ज्या अर्थी आपण आनंदाने काय पाहिजे ते माग म्हणता त्या अर्थी काहीही भिती न धरता मी मागतो की तुमची मुलगी मला द्यावी.' हे ऐकताच सिंहाला फार वाईट वाटले, पण तो वचनात गुंतल्यामुळे त्याला नाही म्हणता आले नाही. त्याने आपली मुलगी आणून उंदराच्या स्वाधीन केली. ती तरुण मुलगी मोठ्या डौलाने चालत असता तिचा पाय उंदरावर पडून तो तात्काळ मरण पावला.
तात्पर्य
- जे मागायचे ते विचारपूर्वक व आपल्या योग्यतेला साजेल असे मागावे, नाहीतर भलतेच मागणे मागितल्यामुळे संकट निर्माण होईल. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.