एक उंदीर एका बैलाच्या पायाला चावला आणि हळूच बिळात लपून बसला. बैल खूप चिडला आणि शिंग वर करून तो कोण चावले ते पाहू लागला. तेव्हा उंदीर हळूच बिळाच्या तोंडाशी आला व हसून म्हणाला, 'तू एवढा शक्तिमान पण माझ्यासारख्या क्षूद्र प्राण्याचा सुद्धा तुला प्रतिकार करता येत नाही तर तुझ्या शक्तीचा काय उपयोग ?'
तात्पर्य
- एखादा क्षूद्र प्राणीसुद्धा आपल्याला त्रास देऊ शकतो. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.