मंजुषा सोनार

शेयर बाजारात ज्या किमतीला शेयरची खरेदी विक्री करतो या किमतीला बाजारभाव असे  किंवा मार्केट प्राईस असे म्हणतात.

कंपनीच्या शेयर सर्टिफिकेट वर जी छापलेली किंमत असते तिला दर्शनी किंमत किंवा फेस व्हॅल्यू म्हणतात. ती एक रुपये, दोन रुपये, पाच रुपये अशी असते. कंपनी जेव्हा पहिल्यांदा शेयर विक्रीसाठी बाजारात आणते तेव्हा तिला ते आय. पी. ओ. द्वारे आणावे लागतात. त्याला इनिशियल पब्लिक ऑफर असे म्हणतात. त्यासाठी कंपनी ला सेबी (सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) ची परवानगी घ्यावी लागते.

कंपनी प्रथम आपल्या फेस व्हॅल्यू नुसार विशिष्ट किमतीचा पट्टा निश्चित करून तेवढे भाग भांडवल विक्रीस आणते. उदाहरणार्थ : दहा लाख भाग भांडवलासाठी कंपनी पाचशे - सहाशे किमतीचा पट्टा निश्चित करते. त्यानुसार एका लॉट मध्ये जेवढे शेयर मावतील तेवढे दिले जातात. एक लॉट तेरा ते पंधरा हजाराच्या दरम्यान असतो.

आय. पी. ओ. शेयर ची विक्री दोन प्रकारे होते.

पहिला प्रकार - फिक्स्ड प्राईज (निश्चित मूल्य)

दुसरा प्रकार - अधिकतम प्रतिसादा नुसार म्हणजे बुक बिल्डिंग नुसार होतो.

फिक्स्ड प्राईज (निश्चीत मूल्य) नुसार शेयर ची किंमत प्रीमियर सह अगोदर ठरलेली असते. ती किंमत ज्यांना मान्य असते ते अर्ज करतात.

अधिकतम प्रतिसादा नुसार म्हणजे बुक बिल्डिंग नुसार एकच ठराविक किंमत ठरवता किमान ते कमाल अशा किमतीचा एक पट्टा जाहीर केला जातो. त्यांचे चार पाच टप्पे व पायऱ्या पडतात. गुंतवणूकदाराने त्यातील हवा तो टप्पा निवडून अर्ज करावा लागतो.

मागणी पुरवठा प्रमाणात शेयर दिले जातात.

समजा एखाद्या कंपनीने पाच लाख शेयरसाठी 200 ते 300 किमतीचा पट्टा जाहीर केला.

गुंतवणूकदारांनी तीन लाख शेयर साठी 220 रुपये किंमत भरली.

काहींनी तीन लाख शेयर साठी 240 रुपये किंमत भरली.

काही गुंतवणूक दारानी दोन लाखसाठी 260 किंमत भरली, दोन लाख शेयर साठी 280 किंमत भरली आणि एक लाखासाठी 300 किंमत भरली.

तर 220 ते 240 या पट्ट्यातील लोकांना वगळून बाकी उरलेल्या तीन पट्ट्यातील म्हणजे 260 ते 300 मिळून पाच लाख शेयर त्या सर्वांना प्रत्येकी 260 प्रमाणे देऊ केले जातील.

(क्रमशः)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel