प्रश्न ---जेव्हा राष्ट्राभिमान जातो तेव्हा काय होते ?

कृष्णमूर्ती ---अर्थातच शहाणपणा येतो .मला असे वाटते की या प्रश्नातील गर्भितार्थ  असा नाही .गर्भितार्थ असा आहे की राष्ट्राभिमानाच्या जागी आपल्याला दुसऱ्या कशाची स्थापना करता येईल.एकाच्या ठिकाणी दुसरे काही आणणे म्हणजे बदली क्रिया .ही कधीही शहाणपणाची नसते  .ती कधीही शहाणपणा, शुद्ध बुद्धी,आणित नसते.जर एका धर्माचा त्याग केला व दुसर्‍या धर्माचा स्वीकार केला किंवा एका राजकीय पक्षाचा त्याग केला व दुसऱ्या राजकीय पक्षाचा स्वीकार केला तर ही सतत बदली प्रक्रिया शहाणपणा नसल्याचे दर्शविते .

राष्ट्राभिमान केव्हा जाईल? राष्ट्राभिमान कसा जातो? अापण जेव्हा राष्ट्राभिमानात सूचित असलेल्या सर्व सूचना, गर्भितार्थासह लक्षात घेतो, त्याची पाहणी करतो, त्याच्या महत्त्वाबद्दल आतील व बाहेरील क्रियांबद्दल जागृत असतो, तेव्हाच राष्ट्राभिमान आपोआप विरघळतो.राष्ट्राभिमानाच्या खऱ्या समजुतीतूनच राष्ट्राभिमान नष्ट होतो .राष्ट्राभिमानामुळे बाह्यवर्ती लोक दुभंगले जातात .युद्ध आणि विनाश होतो .ही गोष्ट कोणाही निरीक्षण करणार्‍यांच्या लक्षात येण्यासारखी अाहे. अंतर्गतरित्या मानसिकदृष्ट्या कोणत्या तरी भव्य वस्तूशी, देशाशी,कल्पनेशी,असलेली समरसता म्हणजे केवळ स्वविस्तारप्रक्रिया आहे .एखाद्या लहान खेड्यात किंवा शहरात रहात असताना, मला मी काहीच नाही असे वाटते .परंतु जर मी मला काहीतरी मोठ्या बरोबर पाहिन,त्या भव्य वस्तूशी समरस होईन, जर मी मला हिंदू अमेरिकन वगैरे काहीतरी म्हणेन,तर माझा पोकळपणा त्यामुळे सुखावतो.त्यामुळे मला एक आंतरिक समाधान प्राप्त होते . मला स्वतःला त्यामुळे सन्मान झाल्यासारखे वाटते.एक प्रकारची सुख स्थिती मला प्राप्त होते. स्वविस्तार ही एक मानसिक गरज आहे .असे काही जणांना वाटते .परंतु त्यामुळे युद्धे झगडे भांडणे वगैरे निर्माण होतात.राष्ट्राभिमानामुळे केवळ बाह्यवर्ती झगडे निर्माण होतात. एवढेच नव्हे तर अंतर्यामी सुद्धा निष्फळता येते .जेव्हा एखादा खरोखरच राष्ट्राभिमान समजून घेतो, तेव्हा आपोआपच राष्ट्राभिमान गळून पडतो .कारण राष्ट्राभिमान प्रक्रिया लक्षात आल्यामुळे ती आपोआपच गळून पडलेली असते .शहाणपणातूनच, शुद्धबुद्धीतूनच, राष्ट्राभिमान देशाभिमान  म्हणजे काय हे पाहूनच, या सर्व प्रक्रियेचे अवलोकन करूनच, राष्ट्राभिमान म्हणजे  काय ते समजू शकते.या सर्व चौकशीतून या सर्व तपासणीतून शहाणपणा येतो .नंतर राष्ट्राभिमानाच्या ठिकाणी दुसरी कसली स्थापना होत नाही . राष्ट्राभिमान जातो परंतु दुसरे काही तिथे येत नाही.त्या ठिकाणी दुसरे काही आरूढ होत नाही.ज्या क्षणी तुम्ही धर्माची राष्ट्राभिमानाच्या ठिकाणी स्थापना करता, त्यावेळी धर्म हे तुमचे स्वविस्तारीकरणाचे साधन बनते.श्रद्धे मार्फत स्वतःला पुष्ट करण्याचे ते साधन बनते. मानसिक उतावळेपणा व आकर्षण यांचे ते स्थान बनते .त्यामुळे कुठल्याही प्रकारची बदली, ती कितीही भव्य दिव्य उच्च श्रेष्ठ असो, केवळ अज्ञान आहे.धूम्रपानाच्या ठिकाणी सुपारी चुइंगम वगैरे काहीतरी आणण्यासारखे ते आहे .जर एखादा संपूर्ण धूम्रपान क्रिया समजून घेईल, त्यामागची कारणे जाणून घेईल,सर्वप्रकारची चिकित्सा व मीमांसा करील, सवयी व्यसन संवेदना त्यामागील सर्व मागण्या हे सर्व काही संपूर्णपणे  समजून घेईल, तर धूम्रपान आपोआपच थांबेल व त्या ठिकाणी दुसरे काही येणार नाही .शहाणपणा असेल तेव्हाच तुम्हाला समजते व तुम्हाला समजते तेव्हांच  शहाणपणा येतो .जेव्हा शहाणपणा कार्यवाहीत असतो तेव्हा समज येते.जर तो कार्यवाहीत नसेल तर फक्त बदली होते .स्वतःला हे करण्यासाठी किंवा ते न करण्यासाठी दिलेली लाच म्हणजे  बदली प्रक्रिया होय .राष्ट्राभिमान त्याच्या विषासकट, झगडे भांडणे क्लेश  यांच्यासकट नष्ट  होईल, जेव्हा शहाणपणा असेल.केवळ पुस्तके वाचून व परीक्षा उत्तीर्ण होऊन शहाणपणा येत नाही.समस्या जश्या निर्माण होतात तश्या त्या जेव्हा आपण समजून घेतो तेव्हाच शहाणपणा येतो .जेव्हा समस्या तिच्या  निराळ्या पातळ्यांवर समजून घेतली जाते, बाह्यवर्तीच नव्हे तर अंतर्गतही, त्या समस्येच्या सर्व मानसिक गर्भितार्थासह  समजून घेतली जाते, तेव्हा या प्रक्रियेत शहाणपणा येतो .अश्या प्रकारे जेव्हा शहाणपणा असतो तेव्हा एकाच्या  ठिकाणी दुसरे काहीही आणले जात नाही. बदली प्रक्रिया संपूर्णपणे थांबते.बदली प्रक्रियेतून बदल होत नाही. असा बदल हा केवळ उथळ असतो .एकाच्या ठिकाणी भव्यदिव्य असे दुसरे काही तरी आणले जाते .जेव्हा शहाणपणा असतो तेव्हा महामूर्खत्वाचा एक प्रकार असा राष्ट्राभिमान देशाभिमान अंतर्धान पावतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel