प्रश्न --मन कशामध्ये गुंतलेले असते ?

उत्तर--जे काही आहे व  जे काही असले पाहिजे यातून विरोध  कसा निर्माण केला जातो त्याचे हे उत्तम उदाहरण आहे .प्रथम अापण काय असले पाहिजे त्या ध्येयाची कल्पनेची स्थापना करतो .मग त्याबरहुकूम होण्यासाठी धडपड खटपट सुरू करतो .आपण म्हणतो मन उदात्त ध्येयानी भरलेले असले पाहिजे .प्रेम उदारता दया निस्वार्थीपणा इत्यादी अंगी असलेच पाहिजेत.अशाप्रकारे ध्येय स्थापन करून मग आपण त्याप्रमाणे होण्यासाठी प्रयत्न सुरू करतो .अशा प्रकारे जे काही आहे व जे काही ठरविले आहे त्यामुळे विरोध  निर्माण होतो .या विरोधातून आपण बदलाची इच्छा करतो .जोपर्यंत आपण "झालेच पाहिजे" याच्याशी झगडत असतो, तोपर्यंत आपल्याला सद्गुणी वाटत असते .उदात्त भव्य दिव्य श्रेष्ठ असे वाटत असते .परंतु महत्त्वाचे काय आहे ?जे झाले पाहिजे ते,कि जे काही आहे ते ?आपले मन कशानेतरी भरलेले असावे यापेक्षा कशाने भरलेले असावे हे महत्त्वाचे नाही काय ?एक पाऊल पुढे जाऊन ते कशाने भरलेले असावे यापेक्षा ते मुळात कशानेच भरलेले नसावे हे महत्त्वाचे नाही काय ?आपली मने कसल्या क्षुद्रतेने भरलेली आहेत ते पाहणे महत्त्वाचे नाही काय?आपली मने क्षुद्रतेने भरलेली नाहीत काय? आपण कसे दिसतो, निरनिराळी ध्येये, निरनिराळ्या आपल्याला असलेल्या भुका,मत्सर 'द्वेष, लालसा, हावरटपणा, आधाशीपणा, क्रूरता, टवाळकी, यानी आपली मने भरलेली नाहीत काय ?मन नेहमी क्षुद्र जगात राहात असते व अतिभव्य निर्माण करणारे क्षुद्र   मन अजुनही क्षुद्रच असते .मन कशाने भरलेले असावे हा प्रश्नच निर्माण होत नाही ?मन या सर्व क्षुद्रतेपासून कसे स्वतंत्र होईल हा खरा प्रश्न आहे .ते तसे होऊ शकेल काय? हा खरा प्रश्न आहे .जर आपण खरोखरच जागृत असू ,जर आपण खरोखरच चवकशी करीत असू,  तर आपल्याला स्वतःची क्षुद्रता माहीत असली पाहिजे. न थांबणारी बडबड,मनाची सारखी चाललेली लगबग, याबद्दल किंवा त्याबद्दल कसली ना कसली सतत काळजी, लोक काय करीत आहेत व काय करीत नाहीत याबद्दलची चवकशी ,फलप्राप्तीसाठी चाललेले प्रयत्न,आंधळेपणाने सत्ता व संपत्ती मिळवण्यासाठी चाललेली धडपड ,या सर्वांनी आपण ओतप्रोत भरलेले आहोत .हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना चांगलेच माहित आहे .यात बदल घडवून आणता येईल का ?हा खरा प्रश्न आहे .मन कशाने भरलेले असले पाहिजे ,असे विचारणे हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे  .

माझे मन क्षुद्र आहे.ते अनेक क्षुद्र गोष्टींनी भरलेले आहे.या सर्वांबद्दल जागृत राहून या विशिष्ट धारणेपासून स्वतंत्र होता येईल का ?मनाची प्रकृतीच,मनाची घटनाच,मुळात क्षुद्र नाही काय ?स्ममरणाशिवाय मनात दुसरे काय असते ?आणि हे स्मरण कसले?स्वतःलाच स्वतःच्या क्रियांनी बद्ध करून घेऊन मानसिक व शारिरीक  दृष्ट्या जिवंत कसे राहावे म्हणजेच स्मरण नव्हे काय ?हे सर्व क्षुद्र  नाही काय ?स्मरण परिणाम असे मन,काल परिणाम असे मन, हे मुळातच क्षुद्र आहे. क्षुद्रतेपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ते काय प्रयत्न करणार ?ते काही करू शकते काय ?कृपाकरून याचे महत्त्व लक्षात घ्या .मन म्हणजेच स्वयंकेंद्रित क्रिया .या क्रियेपासून ते स्वतःला मुक्त करून घेऊ शकेल काय़ ?अर्थातच हे अशक्य आहे .कारण मन जे काही करते ते मुळातच क्षुद्र असते .ते परमेश्वराला निर्माण करील. काही राजकीय प्रणाली काढील.ते निरनिराळ्या श्रद्धांचा शोध लावील .परंतु ते अजूनही कालाच्या क्षेत्रातच असते .त्यातील बदल हा स्मरणाकडून स्मरणाकडे असतो .ते अजूनही स्वतःच्याच मर्यादांनी बद्ध असते.या मर्यादा मन तोडू शकेल काय ?जेव्हा मन शांत असते,जेव्हा ते कार्यरत नसते , जेव्हा ते स्वतःच निर्माण केलेल्या क्षुद्र गोष्टी, क्षुद्र  म्हणून ओळखते,(मग त्याने कितीही तथाकथित उच्च गोष्टींची निर्मिती केलेली असो)तेव्हा मर्यादा आपोआपच गळून पडतात .जेव्हा मन स्वतःची क्षुद्रता पाहते, त्याच्याबद्दल संपूर्ण जागृत असते,व अशा प्रकारे स्तब्ध बनते ,तेव्हाच अनंत क्षुद्रता गळून पडण्याचा संभव आहे .जो पर्यंत तुम्ही मन कशाने भरलेले असावे याची चवकशी चालविलेली आहे, तोपर्यंत ते क्षुद्रतेनेच भरलेले असेल .मग ते चर्च बांधो,देऊळ बांधो ,मशीद बांधो, गुरुद्वारा बांधो, मठात जावो ,प्रार्थना करो, तथाकथित पवित्र स्थानी जावो, किंवा आणखी कुठे जावो ,ते क्षुद्रतेनेच भरलेले राहणार .मन हेच मुळात क्षुद्र आहे. छोटे आहे. ते क्षुद्र  आहे असे म्हणून तुम्ही क्षुद्रता वितळविलेली नाही .ती क्षुद्रता तुम्हाला समजली पाहिजे. मनाला स्वतःच्या हालचाली समजल्या पाहिजेत .या समज प्रक्रियेमध्ये,या क्षुद्रता जागृतता प्रक्रियेमध्ये(ज्या क्षुद्रता मनाने सुप्त किंवा प्रगट रित्या निर्माण केलेल्या आहेत),मन निस्तरंग, शांत, स्तब्ध ,होते .त्या स्तब्धतेमध्ये सृजनशील स्थिती असते.  सृजनशीलता बदल घडवून आणते .

++++++++++++++++++

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel