त्यांनी ज्या कक्षात प्रवेश केला तो कक्ष १५ फूट उंच होता आणि प्रचंड हायटेक उपकरणांनी सज्ज होता.कक्षात मधोमध एक स्टीलची खुर्ची ठेवली होती, बसल्यावर पाय ठेवण्यासाठी खाली एक फळी होती. कमरेला आधार देण्यासाठी दोन लोखंडी रॉड होते. काळ्या चामड्याचे आसन आणि खुर्चीचे हातकड्या बसवलेले दोन हात संपूर्ण खोलीचे स्वरूप वर्णन करत होते. तो कक्ष एखाद्या  प्रयोगशाळेसारखा दिसत होता.

त्या खुर्चीच्या भोवती पॉलिश केलेली शिसवी लाकडाची टेबलं ठेवली होती. प्रत्येक टेबलावर एक संगणक होता. छताला एक प्रोजेक्टरही बसवलेला होता आणि त्याच्या समोर भिंतीवर एक पांढरा पडदा लावला होता. कैदी मध्यभागी खुर्चीवर बसेल आणि प्रश्नकर्ता त्याच्याकडून प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करेल.

रक्षकांनी त्या माणसाला खेचले आणि त्याला मध्यभागी असलेल्या त्या लोखंडी खुर्चीवर ढकलले. आणि नंतर खुर्चीला जोडलेल्या हातकड्यांनी त्याचे हात बांधले. त्याची कंबर, डोके आणि पायही चामड्याच्या बेल्टच्या साहाय्याने खुर्चीला बांधले गेले होते. आता फक्त त्याची बोटे त्याच्या शरीराचा एकमेव हलणारा अवयव होता.

यावेळी रणधीर शांतपणे कॅमेऱ्याकडे बघत बसले  होते. केवळ कैदीच नाही तर खोलीतील इतर सर्वांवर कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

सकाळचे ११ वाजले होते, तेव्हा त्या व्यक्तीला शुद्ध येऊ लागली. त्याचे डोळे मिटले होते, पण त्याला जाणवत होते की कोणीतरी ओल्या कपड्याने त्याच्या चेहऱ्यावरील पांढरा रंग साफ करत आहे. कोणीतरी त्याच्याबद्दल बोलताना त्याने ऐकलं. तो अघोरी असल्याबद्दलची चर्चा सुरु  होती.

“किती विचित्र दिसतंय हे ध्यान! काय विक्षिप्त स्वरूप आहे?" एक मुलगी म्हणाली.

"मला माहित आहे हा कोण आहे!" एकाने आत्मविश्वासाने उत्तर दिले. आवाज पुरुषाचा होता.

"आम्ही तुमची या विचित्र व्यक्तीशी ओळख करून देण्यापूर्वी, तुम्ही कोण आहात हे सांगू शकाल का?" मुलीने विचारले.

"अभिषेक ." त्या माणसाने लगेच उत्तर दिले.

"आणि मिस्टर अभिषेक, तू ह्यांना कसा ओळखतोस?" मुलीने विचारले.

“मी त्याला ओळखत नाही. तो कोण आहे हे मला माहीत नाही; पण तो एक अघोरी आहे हे मला माहीत आहे.”

"अघोरी?" मुलीने आश्चर्याने विचारले, जणू काही तिने हा शब्द कधीच ऐकला नव्हता!

“‘अघोरी.’ थरकाप उडवण्यासाठी हा शब्दच पुरेसा आहे. भारत आणि नेपाळमधील प्रत्येक गावात किंवा शहरात अघोरींच्या कथा आहेत. त्यांच्याकडे निसर्गावर नियंत्रण ठेवण्याची अमर्याद शक्ती असल्याचे म्हटले जाते; जसे की मृत्यूवर विजय मिळवणे, भौतिक गोष्टींचे प्रकटीकरण, मानवी मांस आणि विष्ठा खाणे आणि अत्यंत अशुद्धतेमध्ये जगणे आणि कधीकधी पूर्णपणे नग्न असणे.

अघोरी सुद्धा अनेक भयानक प्रथा करतात; शुद्ध आणि अपवित्र यातील द्वैत दूर करण्यासाठी आणि अद्वैत मनाची स्थिती प्राप्त करण्यासाठी मृत शरीराशी संभोग करणे. त्यांना स्वतःचा शोध घेण्याचे इतके वेड आहे की ते अनेक कुरूप, अपवित्र आणि सामाजिकदृष्ट्या वर्ज्य कृतींमध्ये ते  गुंततात. ते दारू पितात, मादक पदार्थांचे सेवन करतात आणि मांस खातात. त्यांच्यात कोणतीही गोष्ट निषिद्ध मानली जात नाही.

पण त्यांच्या प्राचीन परंपरा विचित्र बनवतात ते म्हणजे त्यांची मंदिरे स्मशानभूमी आहेत. त्यांचे कपडे मृतदेहांपासून, अंत्यसंस्कारातील लाकडे आणि नदीतून त्यांना अन्न मिळते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची चिता पेटवली जाते, तेव्हा ते मृतांची राख अंगाला फासून घेतात आणि त्यावर बसतात आणि ध्यान करतात. मानवी कवटीपासून बनवलेल्या भिक्षा पात्रात भिक्षा मागून ते जगतात.

पण तरीही अघोरी लोकांच्या जीवनातील सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे त्यांची नरभक्षक प्रवृत्ती . एकतर नदीतून उदा.गंगा नदीतून ओढून आणलेले किंवा स्मशानभूमीतून आणलेले प्रेत कच्चे आणि शिजवलेले दोन्ही ते खातात; अघोरी लोकांचा असा विश्वास आहे की इतर ज्याला मृत व्यक्ती मानतात ती प्रत्यक्षात एक नैसर्गिक अवस्था आहे, कि आता त्या व्यक्तीजवळ जीवन ऊर्जा शिल्लक नाही. त्यामुळे नरभक्षण म्हणजे सामान्य लोकांसाठी असभ्य, जंगली आणि अपवित्र असले तरी, अघोरी लोकांसाठी ते एक जगण्याचे साधन आहे आणि रूढीवादी मानसिकतेला आध्यात्मिक अनुभूतीत बदलण्याचे एक साधन आहे की या जगात काहीही अपवित्र किंवा देवापासून वेगळे नाही. किंबहुना, ते त्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहतात की एखादे तत्त्व एका रूपातून दुसऱ्या रूपात कसे परिवर्तीत होते!

अनेक अघोरी हातात मानवी कवटीचे भिक्षापात्र घेऊन भारतातील रस्त्यावर फिरताना दिसतात. त्यांना केस कापण्याची गरज कधीच वाटत नाही. ते भय आणि पूर्वकल्पित कल्पनांवर मात करण्यासाठी, सत्य आणि भेदाच्या मार्गावर चालण्यासाठी आणि अंतिम स्थिती प्राप्त करण्यासाठी त्यांच्या शरीराचा वापर करतात. शतकानुशतके ते त्यांच्या विचित्र आणि रहस्यमय जीवनशैलीने जगभरातील लोकांना मंत्रमुग्ध करत आहेत.आपण अघोरींचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येते की, भावी अघोरींच्या जीवनाचा पाया रचणाऱ्या पहिल्या अघोरींचे नाव ‘कीणा राम’ होते. असे मानले जाते की ते १५० वर्षे जगले आणि १८ व्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांचा मृत्यू झाला.अघोरी लोक मानतात की शिव सर्वोच्च, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ आहे. त्यांच्या मते या विश्वात जे काही घडते ते शिवाच्या इच्छेनेच घडते. त्यांच्यासाठी देवीच्या विविध रूपांमध्ये   कालीका मातेचं रूप सर्वात पवित्र आहे.”

इतक्यात दुसऱ्या एका आवाजाने संभाषणात व्यत्यय आला. यावेळी आवाज त्या माणसाच्या अगदी जवळून येत होता. डॉ. मेहता देखील या संभाषणात सामील झाले आणि म्हणाले,

“अघोरी दावा करतात की त्यांच्याकडे आजच्या सर्वात घातक आजारांवर अगदी एड्स आणि कर्करोग यावरही औषधे आहेत. ही औषधे, ज्याला ते ‘मानवी तेल’ असं म्हणतात. ते तेल  मृत शरीरावर अंत्यसंस्कार केल्यानंतर जळणाऱ्या आगीतून गोळा केले जाते. जरी त्याची अद्याप वैज्ञानिकदृष्ट्या चाचणी झाली नसली तरी, अघोरींच्या मते, ते तेल अत्यंत प्रभावी आहे."

अघोरींविषयी माहिती देत असताना डॉ. मेहता आपल्या हातामध्ये सिरिंज टोचत असल्याचे कैद्याला व्यवस्थित जाणवले.

"हिमाच्छादित पर्वतांपासून ते उष्ण वाळवंट आणि वाघांचा सूळसुळाट असलेल्या जंगलांपर्यंत, ते अशा ठिकाणी राहण्यासाठी ओळखले जातात जिथे इतर कोणीही जगू शकत नाही."

अभिषेकने विषय पुढे नेला आणि म्हणाला,

“अघोरींसाठी अशुद्ध, वाईट किंवा घृणास्पद काहीही नाही. त्यांच्या मते, जर तुम्ही अत्यंत विकृत गोष्टी करत असतानाही देवावर लक्ष केंद्रित करू शकलात तर तुम्ही देवाशी एकरूप व्हाल. स्मशानभूमीत प्रेतावर बसून ध्यान करण्याचे धाडस बहुतेक लोकसंख्येला नसते.प्रत्येकजण अघोरी जन्माला येतो, असे अघोरी मानतात. नवजात बाळाला स्वतःची विष्ठा, घाण आणि खेळणी यात फरक करत नाही; उलट तो या सगळ्यांशी खेळतो. आई-वडील आणि समाजाने सांगितल्यावरच तो त्यांच्यात फरक करू लागतो. मूल जसजसे मोठे होते आणि भौतिक आधारावर निवड करू लागते, तेव्हाच ते अघोरी होण्याचे गुण गमावून बसते. आपण मुलांना देवाचे रूप मानतो."

"अघोरी लोकांचा असा विश्वास आहे की मृतदेहांमध्ये लैंगिक संबंध ठेवल्यामुळे अलौकिक शक्तींचा जन्म होतो. महिला साथीदारांच्या शरीराला देखील मृतांची राख फसली जाते. संभोगाच्या वेळी ढोल वाजवले जातात आणि मंत्रांचा उच्चार केला जातो. ते हे सुनिश्चित करतात की कोणत्याही स्त्रीला त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जाणार नाही आणि समागम करताना स्त्रियांना मासिक पाळी आली पाहिजे हे देखील ते आवश्यक मानतात."

आता, जर तुम्ही बनारस सारख्या शहरात नरभक्षक आहार घेत आहात, जिथे मांसाहारी अन्न देखील वर्ज्य मानले जाते, तर तुम्ही स्वतःसाठी संकट निर्माण करत आहात असे तुम्हाला वाटेल मात्र आश्चर्याची बाब म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मानवी मांस भक्षण करूनही त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही! याचे कारण असे असावे की ते मेलेले मानवी मांस खातात आणि ते खाण्यासाठी कोणाला मारत नाहीत.

खरे अघोरी हे निष्पाप, प्रेमळ आणि दयाळू आहेत आणि जेव्हा तुम्ही त्यांना भेटता तेव्हा नेहमीच तुम्हाला आशीर्वाद देतात. तो आपला बहुतेक वेळ ध्यान आणि ‘ओम नमः शिवाय’ जप करण्यात घालवतो.”

‘ओम्’ हा शब्द त्या  बेशुद्ध अघोरीच्या कानावर पडला मात्र, त्याने हळूहळू आपले डोळे उघडले  

क्रमश:

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel