डॉ. चंदावरकर अनंतच्या पाठीमागे खुर्चीवर बसले.

“अण्णा, कृपया असे करू नका. तुम्ही मला काहीही विचारा, मी सहकार्य करायला तयार आहे.” अनंत महाकाल याने  विनंती केली.

त्याची नजर डॉ. चंदावरकरांच्या दिशेने वळली होती. डॉ.चंदावरकरांनी डॉ.सोनाली पर्रीकर आणि डॉ.मेहता यांच्याकडे पाहिले. दोघांच्या चेहऱ्यावरही तेच भाव उमटले होते.

"कृपया सुरू करा."

डॉ.चंदावरकर यांनी असहमतीयुक्त नाराजीने करून आदेश दिला. 'अण्णा' हा शब्द ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर चीड स्पष्ट दिसत होती. अनंतला पुन्हा औषध देण्यात आले आणि त्याची पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली.

पहिला प्रश्न रोहिदासने लक्ष देऊन त्याचा अर्थ इतरांना समजावून सांगण्यासाठी होता.

“तुम्ही विष्णूगुप्त म्हणून काय सल्ला दिला होता?”

डॉ. सोनाली पर्रीकर यांनी बेशुद्ध अनंतला विचारले. अनंतने संस्कृत श्लोकाची पुनरावृत्ती केली

व्याघ्रीव तिष्ठति जरा परितर्जयन्ती

रोगाश्च शत्रव इव प्रहरन्ति देहम्।

आयुश्च परस्वितभिन्नघटादिवाम्भः

लोकस्तथाप्यहितमाचरतीति चित्रम्॥

डॉ.सोनाली पर्रीकर रोहिदासकडे पाहत होत्या. अंगठ्याच्या इशाऱ्याने त्यांनी काम पूर्ण झाल्याचे सूचित केले.

"तू विष्णूगुप्त म्हणून कोणाला सल्ला देत होतास?"

"चंद्रगुप्त मौर्य याला ."

"तू अनंत महाकाल का झालास?"

"माझी खरी ओळख लपवून ठेवण्यासाठी."

"कोणापासून ?"

"या जगापासून."

“तुझी खरी ओळख काय आहे?” डॉ. सोनाली पर्रीकर यांनी दडलेली उत्तरे खोदून काढायचा प्रयत्न केला.  

"माझ्या सर्व ओळखी खऱ्या आहेत."

सोनाली पर्रीकर यांनी मानसिकदृष्ट्या हे लक्षात घेतले - 'माझ्या सर्व ओळखी खऱ्या आहेत.'

“अनंत महाकाल म्हणून तू नाशिकमध्ये काय करत होतास?”

"शोध घेत आहे."

"शोध! कोणाचा?"

"सुभाषचंद्र बोस."

सगळे सहकारी एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागले. सोनाली पर्रीकर यांना पुढे काय विचारावे किंवा काय बोलावे हेच कळेना? 'हे खरोखरच विचित्र आहे', असा विचार त्यांनी केला. शेवटी त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाल्या

"नेताजी तर मरण पावले आहेत."

“नाही, नाही ते मेलेले नाहीत. ते फक्त दुसऱ्या नावाने जगत आहेत.”  अनंत ठामपणे म्हणाला.

"ते मेले नाही आणि दुसऱ्या नावाने जगत आहेत असे तुम्हाला का वाटते?"

“मला फक्त असं वाटत नाही तर मला पक्कं ठाऊक आहे."

"तुला याबद्दल इतका विश्वास कसा आहे?" असा सवाल सोनाली पर्रीकर यांनी केला.

कारण मी त्यांना महाभारत काळापासून ओळखतो.

डॉ. सोनाली पर्रीकर यांनी डोळे मिटून विचार केला की याला काही अर्थ नाही.

"तू त्यांना का शोधत आहेस?"

"कारण ते अश्वत्थामा आहेत."

या प्रश्नाच्या उत्तराने अभिषेक हादरला.

"काSSSय?" सोनाली पर्रीकर यांना समजले नाही.

अभिषेक अश्वत्थामाचे नाव ऐकून लक्षपूर्वक ऐकू लागला आणि सोनाली पर्रीकर यांच्या जवळ आला.

"अश्वत्थामा." अनंतने पुनरावृत्ती केली.

"त्याला विचारा की तो कोणत्या अश्वत्थाम्याविषयी बोलतोय?" अभिषेक डॉ. सोनाली पर्रीकरच्या यांना हळू आवाजात म्हणाला.

"अश्वत्थामा, द्रोणाचार्यांचा पुत्र, जो कृष्णाने दिलेल्या शापामुळे अमर आहे." अनंतने डॉ.सोनाली पर्रीकर काहीही न विचारता उत्तर दिले.

अभिषेक डॉ. मेहता यांच्याकडे वळला आणि म्हणाला, "याच्या बोलण्यात काही फारसा अर्थ नाही."

डॉ सोनाली पर्रीकर यांनी विचारले, “तुम्ही आणखी कोणाला शोधत आहात?”

गंभीर आवाजात तो म्हणाला, "परशुराम."

हे सर्व वायफळ समजून त्यांनी चौकशी सुरू ठेवली.

"विष्णुगुप्त हे कोड नेम आहे असे दिसते." डॉ.मेहेता गंभीरपणे विचार करत म्हणाले, "किंवा कदाचित हा मानसिकदृष्ट्या आजारी आहे किंवा दुहेरी व्यक्तिमत्व आहे किंवा थोडासा वेडसर आहे!"

"हे एखादे पुनर्जन्माचे प्रकरण हि असू शकते." पौराणिक दृष्टीकोनातून अभिषेक म्हणाला.

पण त्याच्या बोलण्याकडे डॉ.मेहता यांनी लक्ष दिले नाही.

"अनंतच्या आधी तू आणखी कोणती नावे वापरली आहेस?" असा सवाल डॉ.सोनाली पर्रीकर यांनी केला.

“बांकेलाल द्विवेदी, भारत जखार, सिद्धरामय्या मुद्दापूर, पंचमदादा मोंडल, सतपाल सिंह अरोरा, विदुर,  दिलावरसिंग काझी, सैबल राजू दास, विष्णु गुप्त, कबीर, सुषेण, जयशंकर प्रसाद, केशवअण्णा धीवरन।”

अनंतने पाठांतर केल्यासारखं सांगितलं. प्रत्येक नावासोबत त्याचे उच्चार, स्वर आणि चेहऱ्यावरील हावभाव बदलत होते. भारत जखार, दिलावरसिंग काझी, सतपालसिंह अरोरा आणि सिद्धरामय्या मुद्दापूर यांचि नावं घेताना आवाजात ताकद आणि शौर्य होतं. पंचमदादा मोंडल बंगाली लहेजात तर कबीर आणि सुषेण शांत स्वरात सांगितले.

खोलीतील प्रत्येकजण त्याच्या नैसर्गिक प्रतिक्रियेने आश्चर्यचकित झाला होता. उत्तमातील उत्तम अभिनेत्यांना एकाच वाक्यात इतके व्हेरिएशन्स देणे फारसे जमले नसते.

डॉ.सोनाली पर्रीकरने यांना तणाव आला होता. त्यांनी डोके धरले. डॉ.चंदावरकरांनाही प्रथमच इतके आश्चर्य वाटले. KGB ने अनंतने सांगितलेली सर्व नावे लिहून घेतली होती. सोनाली पर्रीकर यांनी लिहिलेल्या नोट्स रोहिदास वाचत होता. रोहिदासच्या मनात अचानक काहीतरी सुचलं आणि तो डॉ.मेहता यांच्याकडे गेला. यावेळी अनंत अर्ध बेशुद्ध अवस्थेत नावं घेत होता.  

“सर जेव्हा अनंतने विष्णूगुप्त हे नाव घेतलं, तेव्हा मला खात्री होती की तो इसवी सनपूर्व ३०० च्या काळाबद्दल बोलत आहे; कारण चाणाक्याचे खरे नाव विष्णुगुप्त हे होते आणि तो चंद्रगुप्त मौर्याचा प्रमुख सल्लागार होता. तुम्हाला कदाचित वाटेल मी वेडा आहे पण...”

रोहिदास त्याच्या नेहमीच्या अनिश्चित स्वरात म्हणाला. KGB रोहिदासकडे आली ती खूप एक्सायटेड दिसत होती.

"मी तुझे म्हणणे ऐकले ईसवी सन पूर्व ३०० म्हणजे २३१७ वर्षांपूर्वी. बरोबर?" KGB बोटांवर हिशोब करता करता ती म्हणाली.

"म्हणजे हा टाईम ट्रैव्हल करू शकत असेल का?" KGB च्या अतिउत्साही म्हणण्यामुळे रोहिदासचे डोळे विस्फारले होते.

या विचाराने रोहिदासला राग आला आणि तो चिडून म्हणाला, "असं काही नाहीये तो फक्त एक भामटा आहे."

“एक्स्क्यूज मी...”

असं म्हणून  डॉ. मेहता बाहेर निघून गेले आणि लगोलग रणधीर धावत आत आले ते धापा टाकत होता, ज्यावरून तो धावत आल्याचे लक्षात येत होते.

त्याने एकदा अनंत महाकाळकडे पाहिले आणि लांब पावले टाकत आत निघून गेला.

"काय झालं?" चंदावरकर यांनी विचारले. रणधीरचे भाव पाहून सर्वांना संभाषणात समाविष्ट करणे योग्य वाटले नाही.

"पाऊस पडतोय! घाबरलेल्या रणधीरने उत्तर दिले.

"मग काय?

डॉ.चंदावरकरांना आधीच अनंत महाकाळची फार काळजी वाटत होती, त्यांना नवीन नाटक नको होते.

"हे काही तासांपूर्वी त्याला कसं कळलं?" रणधीरने अनंतकडे बोट दाखवत विचारले.

यावर अनंतने बोलायला सुरुवात केली.

“तापमान २ अंशांनी खाली आले होते, त्यानंतर आणखी ५ अंशांनी. वारे ताशी ४० किलोमीटर वेगाने वाहू लागले. मला हवेतील आर्द्रता आणि ओल्या मातीचा वासही जाणवत होता. त्यामुळे पाऊस पडेल असा अंदाज मला होता.”

अनंतने निश्चितपणे उत्तर दिले.

“तुम्ही सगळे कशाबद्दल बोलताय?” मेहता दालनात शिरताना म्हणाले.

बाकी सगळे सुद्धा आतुरतेने उत्तराची वाट पाहत होते. रणधीरने डॉ.मेहता आणि इतरांना समजावण्यास सुरुवात केली.पण मध्येच त्याला अडवत डॉ चंदावरकर म्हणाले,

“नाही नाही काही नाही.”

यावर मग पुढे कोणी काही म्हणाले नाही.

अनंतला  पुढे काय विचारायचे या विचाराने डॉ.सोनाली पर्रीकर पुन्हा एकदा चिंतेत होत्या आणि म्हणून त्यांनी पुढील ऑर्डरसाठी त्यांच्या बॉसकडे पाहिले. एक तास पूर्ण होत आला होता आणि डॉ. मेहता यांच्या अपेक्षेप्रमाणे अनंत महाकाल पुन्हा शुद्धीवर येण्याची चिन्हे दिसली. इंट्रोगेशन संपले होते. संध्याकाळ होत आली होती. योजनेनुसार काहीही झाले नाही. जुन्या प्रश्नांची जागा आता नवीन प्रश्नांनी घेतली होती. यापैकी बहुतेक प्रश्नांची उत्तरे काही लोकांकडे होती जी ते जाणूनबुजून लपवत होते.

क्रमश:

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel