गर्भावस्था ही गरोदरपणा किंवा गर्भधारणा म्हणून देखील ओळखली जाते. गर्भावस्थेच्या काळात स्त्रीच्या शरीरात एक किंवा अनेकविध जीव विकसित होत असतात. अनेकाविध गर्भावस्था म्हणजे एकापेक्षा जास्त गर्भ राहणे. उदा. जुळी मुलं. ही अवस्था संभोग किंवा वैज्ञानिक पध्दतीनुसार धारन होते. ही बहूदा 40 आठवडे (जवळपास 10 महिने) असते. शेवटच्या मासिक पाळीपासून ते मुल जन्माला येईपर्यंत गर्भवती स्त्रीची लक्षणे म्हणजे तोंडाला सतत पाणी सुटने, अस्वस्थ वाटने, उलट्या होणे, भुक लागने, सतत शौचास होणे होय. गर्भनिदान चिकित्सेद्वारे देखील गर्भावस्था तपासता येते.
गर्भावस्था तीन टप्प्यांमध्ये विभागली जाते. पहिला टप्पा म्हणजे पहिल्या आठवड्यापासून ते 12 व्या आठवड्यापर्यंतच्या टप्प्याला धारणा (गर्भधारणा) होय. ज्यामध्ये प्रजनन होणारे बीज फेलोपियन ट्युबमधून गर्भाशयाच्या आत जाते, जिथे गर्भ आणि नाळ एकमेकांशी जोडले जाते. येथूनच जीव आकार घेण्यास सुरुवात करतो. पहिल्या टप्प्यामध्ये मिस्करेजचे (नैसर्गिक मृत्यूचे) प्रमाण जास्त असते. दुसरा टप्पा 13व्या आठवड्यापासून ते 28 व्या आठवड्यापर्यंत असतो. गर्भावस्थेच्या दुसर्या टप्प्यामध्ये गर्भाची हालचाल जाणवते. जर उच्च प्रमाणात औषधांचा वापर केला तर 28व्या आठवड्यात जीव गर्भाशयाच्या बाहेर 90 टक्के पेक्षा जास्त वावरु शकतात. तिसरा टप्पा हा 29व्या आठवड्यापासून ते 40 व्या आठवड्यापर्यंतचा असतो.
जीव जन्मापुर्वी घेतलेली काळजी बाळाचे स्वास्थ्य सुधरवते. यामध्ये फॉलिक अॅसिडच्या गोळ्या घेणे, नशा आणि व्यसनं टाळणे, नियमित व्यायाम, रक्त तपासणी आणि नियमित तपासणी करणे या गोष्टींचा समावेश असतो. उच्च रक्तदाब, गर्भधारणेच्या वेळी मधूमेह असल्यास, लोहाची कमतरता आणि तिव्र मळमळ तसेच सतत उलट्या होणे अशा प्रकारच्या गोष्टी गर्भावस्थेमध्ये अडचणी निर्माण करु शकतात. गर्भावस्थेचा काळ हा 37 आडवड्यांपासून ते 41 व्या आडवड्यांपर्यंतचा असतो, यामध्ये लवकर होणार्या प्रसुतीचा काळ हा 37 आणि 38 आठवड्यांचा, योग्य प्रसुतीचा काळ 39 आणि 40 आठवड्यांचा, आणि उशीराने होणार्या प्रसुतीचा काळ हा 41 आठवड्यांचा असतो. 41 आठवड्यांनंतर होणार्या प्रसुतीला दिर्घ प्रसुती म्हणतात. 37व्या आठवड्यापुर्वी बाळ जन्माला येण्याच्या प्रक्रियेला पुर्वप्रसुती म्हणतात आणि यामध्ये कॅरबेरल पॅल्सी सारख्या शारीरिक आजारांच्या अनुशंगाने बाळाला मोठ्या प्रमाणावर धोका असतो. त्यामुळे हे आधीच सतर्क करण्यात येते की कोणत्याही तथ्य कारणाशिवाय 39 आठवडयाच्या आधी सिझेरियन पध्दतीने किंवा अन्य कोणत्याही कृत्रिम पध्दतीने प्रसुती करु नये.
2012 मध्ये 213 लक्ष स्त्रीया गर्भवती होत्या ज्यांपैकी 190 लक्ष स्त्रीया विकसनशील देशांमध्ये होत्या आणि 23 लक्ष स्त्रीया विकसित देशांमध्ये होत्या. पैकी 1000 स्त्रीयांमागे सरासरी 133 स्त्रीया 15 आणि 44 वर्षांच्या होत्या. 10 ते 15 टक्के स्त्रीयांचा गर्भपात झाला. 1990 मध्ये 3,77,000 गर्भावस्थेतील मृत्यूच्या तुलनेत 2013 मध्ये अशा 2,93,000 मृत्यू गर्भावस्थेत झाले.