तिसरा काळ हा टळलेल्या पाळी पासून पहिले सहा महिने (२८ आठवडे) ते ९ महिने (३८ आठवडे) हा काळ मानला जातो.28 व्या आठवड्यापासून प्रसूतिपर्यंत गर्भावस्थेची तिसरी तिमाही मानण्यात येते. सर्व महत्त्वाचे अवयव आणि इंद्रिये जसे मेंदू, वृक्क, आणि फुफ्फुसे पूर्णपणे विकसित होण्याचा हा काळ आहे. 36व्या आठवड्यात गर्भाचे डोके गर्भाशयमुखाकडे येते. 37 व्या आठवड्यात गर्भाची वाढ पूर्ण झाल्याचे मानण्यात येते. गर्भाचे वजन या सुमारास 3000-3600 ग्रॅम झालेले असते. मातेचे अपुरे पोषण आणि गर्भाशय लहान असणे एकाऐवजी दोन गर्भ गर्भाशयात असण्याने (पहा जुळे) कमी वजनाचा गर्भ विकसित होतो.
गर्भ २९ आठवड्याचा असताना बाळाची वाढ आता झपाटाने होते, तसेच त्याच्या अवयवांना बळकटी येते. बाळाला अंगभर लव (बारीक केस) येते त्यास लॅन्युगो(lanugo) म्हणतात. बाळाच्या त्वचेचे रक्षण करण्याकरिता पांढरा चिकट द्रव संपूर्ण अंगभर पसरलेला असतो. त्यास व्हर्निक्स(vernix) म्हणतात. या काळात बाळाच्या मेंदूची तसेच फुप्फुसांची वाढ झपाट्याने होते. नाळेद्वारे माता जे सेवन करेल ते बाळापर्यंत पोहोचत असते. ३४ आठवडे पूर्ण होताना फुप्फुसांची वाढ पूर्ण झालेली असते. जशी जशी प्रसूती जवळ येते बाळ मोठे झाल्यामुळे गर्भाशयात फिरण्यासाठी जागा कमी असते त्यामुळे बाळाची हालचाल मंदावते. ३८ आठवड्याच्या वाढीचे बाळ पूर्ण वाढीचे मानले जाते.
शेवटच्या मासिक पाळीनंतर साधारण ४० आठवड्यांनी बाळाचा जन्म होतो.