वैज्ञानिक परिभाषेत गर्भावस्थेला ग्रॅविडिटी अशी एक संज्ञा आहे. ती लॅटिन भाषेतील "जड" या अर्थाच्या धातूवरून आलेली आहे. गरोदर स्त्रीला इंग्रजीत ग्रॅविडा असेही म्हटले जाते. पॅरिटी (प्रजकता) ही संज्ञा (लघुरूप पॅरा) स्त्रीने जितक्या वेळा अपत्याला जन्म दिलेला आहे त्या संख्येसाठी वापरली जाते. प्रजकता मोजताना एकाहून अधिक गर्भांची गर्भावस्थाही "एक" म्हणूनच मोजली जाते आणि सामान्यतः प्रजकतेतत मृतगर्भजन्मांचाही समावेश असतो. वैद्यकीय परिभाषेत कधीही गरोदर न झालेल्या स्त्रीला नलिग्रॅविडा (अगर्भा) असे आणि पहिल्यांदाच गरोदर असलेल्या स्त्रीला प्रायमिग्रॅविडा (पहिलटकरीण) असे म्हणतात. ज्या स्त्रीमध्ये गर्भावस्था कधीही २० आठवड्यांपलीकडे गेलेली नाही तिला नलिपॅरा (अप्रजका) असे म्हणतात.
अलीकडच्या वैद्यकिय काळात पुर्वप्रसुती आणि दिर्घप्रसुतीला महत्व दिले आहे. या गोष्टी गरोदरपणाच्या टप्प्यांवर अवलंबून नसून त्या गर्भाच्या आकारावर अवलंबून आहे असा ऐतिहासिक अनुभव आहे.