बाळाच्या जन्मानंतर मातांना पुन्हा शक्ती मिळवण्यासाठी आणि प्रसव वेदना तसंच प्रसुतिमधून बरं होण्यासाठी चांगला आहार घेण्याची गरज असते. प्रसुतिदरम्यान त्यांचे रक्त वाया गेलेलं असल्यानं त्यांनी अशक्तता टाळण्यासाठी लोहाच्या गोळ्या घेणे चालूच ठेवावे. एखादी महिला स्तनपान करवत असेल तर तिच्या आहारात अतिरीक्त अन्न आणि पेयांचा समावेश असला पाहिजे. स्तनपान करवण्यामुळं शरीरातील पोषणाच्या साठ्यावरील मागणी वाढते त्यामुळं स्तनदा मातांना त्या गर्भवती असताना लागायचा त्यापेक्षा अधिक आहार त्यांना घ्यावा लागतो.
उष्मांक, प्रथिनं, लोह, जीवनसत्वं आणि अन्य पोषक घटकांनी समृध्द आहार घ्यावा. उदाहरणार्थ, कडधान्यं, दूध आणि दुधाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि अन्य भाज्या, फळे, मांस, अंडे आणि मासे. प्रसुतिपश्चात् लगेच आणि स्तनपान करवण्याच्या दरम्यान अन्नाबाबतचे निर्बंध सामान्यतः दृढ असतात आणि गर्भधारणेच्या वेळेपेक्षा संख्येनं अधिक असतात. असे निर्बंध टाळावेत. त्यानी भरपूर प्रमाणात पेयंपदार्थ घेण्याची देखील खात्री करावी. संबंधित महिलेला तिची शक्ती परत मिळवण्यासाठी प्रसुतिपश्चात् कामात पुरेशी विश्रांती मिळण्याची देखील गरज आहे. तिनं स्वतःची काळजी घेण्याव्यतिरीक्त अन्य कोणतेही अवजड काम करण्याची तिला परवानगी देऊ नये असा सल्ला तिचे पती आणि अन्य कुटुंबियांना देण्यात यावा.