गर्भधारणा सुरु झाल्याची वेळ हा शेवटच्या मासिक पाळीपासूनचा गृहीत धरतात. आणि तेच गर्भाचे वय म्हणून गृहीत धरतात. योग्य वेळी समागम झाल्यावर स्त्री आणि पुरुष बीजाचा संयोग होऊन हा हा गर्भ नैसर्गिकरीत्या होतो किंवा कृतीमरीत्या बीजांड आणि शुक्रजंतूंचा संयोग घडवून आणला जातो.
अंडाशयातील अपक्व स्त्रीबीज किंवा ओव्हम भरपाई + 14 दिवस अशा प्रकारे गर्भधारणेचे वय दिवस करून मोजले जाते.
स्त्रीच्या ओटीपोटीत खास बीजपेशी (स्त्रीबीज) तयार करणा-या दोन बीजांडकोष असतात. मुलगी वयात आल्यापासून ते पाळी बंद होण्याच्या वयापर्यंत दर महिन्याला स्त्रीबीज तयार होते. दर महिन्याला दोन्ही पैकी एक बिजांडातुन एक स्त्रीबीज पक्व होऊन बाहेर पडून ते उदरपोकळीत येते, ते गर्भनलिकेने ग्रहन करून फलन उपयोगासाठी वापरले जाते. या बीजांडांमध्ये मात्र २३ म्हणजे (२२+‘X’) ही गुणसूत्रे असतात. या बीजामध्ये फलित होण्याची क्षमता साधारण २४ तासांपर्यंत असते. या कालावधीत जर शुक्रजंतू उपलब्ध झाले तर गर्भधारणा होण्याचा संभव असतो. शारीरिक संबंधांनंतर शुक्रजंतू गर्भाशयातून बीजनलिकेत शिरतात. या गर्भनलिकेत स्त्रीबीजाच्या चारही बाजूंनी शुक्रजंतू चिकटतात. शुक्रजंतूंच्या टोपीतील रासायनिक प्रक्रियेमुळे स्त्रीबीजाच्या सभोवताली असलेल्या आवरणामध्ये छेद निर्माण होतो व शुक्रजंतूमधील केंद्रक म्हणजे गुणसूत्र असलेला भाग स्त्रीबीजाच्या आत शिरतो. त्याच वेळी असे काही बदल होतात की ज्यामुळे एकापेक्षा जास्त शुक्रजंतू स्त्रीबीजाच्या आत शिरू शकत नाहीत.