ते दोघं उत्तर दिशेने जाऊन जंगलांतून मार्ग काढीत पुढे जाऊ लागला. दुपार झाली. सूर्य डोक्यावर आला. प्रवर्मा अगदी थकून गेला होता. विश्रांतीसाठी तो एका झाडा- खाली मसला, जरा आडवें व्हावे म्हणून तेथेच झाडाखाली तो निजावयास सोईची जागा पाहू लागला. तोच त्याला तेथे एक चार फूट लांबीची लोखंडाची साखळी दिसली. असल्या निर्जन अरण्यांत ती सांखळी पाहून त्याला आश्चर्य वाटले. कुतूहलाने तो निरखून पाहूं लागला. ती गंजलेली असून फार दिवसापासून तेथेंच पडली असावी असे वाटले त्याला. ती सांखळी येथे कशी आली असेल? हा विचार मनात येऊन तो थोडा वेळ स्तब्ध राहिला.
तेवढ्यात त्याला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाच आला. तो भयंकर व कर्णकठोर आवाज ऐकून तो भानावर आला. आपल्या संरक्षणासाठी त्यानें तलवार उपसली आणि पवित्रा साधून सावधगिरीने उभा राहिला. आवाजाच्या रोखाने त्याने नजर वळवली. तेव्हां दुरून एक मोठा कुत्रा धांवत धांवत त्याच्याकडेच येत अलल्याचे त्याला कळले. त्याला पाहतांच हा कुत्रा साधारण नसून कोणीतरी भयंकर राक्षसाने असे रूप घेतले असावे असे त्याला वाटले, जसजसा तो जवळ येऊ लागला तसतसा वर्मा जास्तच सावध होऊन त्याच्याकडे टक लावून पाहूं लागला.
त्याच वेळी तो कुत्रा इतका जवळ आला होता की जवळच्या झाडीतून त्याच्या भूंकण्याचा शब्द ऐकू आला. तो बाणाप्रमाणे आपल्या अंगावर तुटून पडणार ह्या कल्पनेनें, वेळेला हत्याराप्रमाणे उपयोग करता येईल म्हणून ती सांखळी सुद्धा हातात घट्ट धरून कुत्र्याच्या हालचालीवर चंद्रवर्मान नजर रोखली होती.
तो भयंकर कुत्रा जोर जोगने भूंकत पळत आला तो त्याने एकदम चंद्रवर्मावर झडप घातली. चंद्रवर्मानें त्याला मारण्यासाठी तलवार उचलली. पण तेवढयात डाव्या हातांतील ती सांखळी कुत्र्याला लागली. त्या बरोबर तो तीन ताड आकाशात उडून दूर जाऊन पडला. चंद्रवर्मा दोन पावले मागे सरकला आणि हळू हळू कुत्र्याच्या जवळ जाऊ लागला.
कुत्रा उठला. चंद्रवर्माच्या हातांतील ती सांखळी निरखून पाहिली व मागे सरकत सरकत तो जवळपासच्या झाडीपाशी जाऊन उभा राहिला. याचे चंद्रवर्माला आश्चर्य वाटले. त्याने सांखळी निरखून पाहिली. आणि कुत्र्याजवळ पडेल अशी फेकली. त्याने ती हुंगली व तोंडात धरून चंद्रवर्माजवळ येऊन शेपूट हालवू लागला.