चंद्रवर्माला हि वाटले की धीरमल्लाच्या मदतीला गेले पाहिजे. इतक्यांत इशारे झाले आणि सर्व सेना एका मैदानांत जमली आणि लगोच किल्लाच्या बाहेर पडून उत्तरेकडे निघाली. चंद्रवर्मानें अश्वसेनेचे अधिपत्य आपल्याकडे घेतले. रात्रभर सारे सैन्य कूच करीत राहिले, आणि पहाटेच्या सुमाराला डोंगराच्या एका वळणाजवळ येऊन पोहोचले. तेथे त्यांना घोड्यांच्या टापा आवाज ऐकू आला.

ते पण तें सैन्य शत्रुचें आहे की मित्राचे कळण्यास काही मार्ग नव्हता. म्हणून ते पाहाण्यासाठी चंद्रवर्मा व सुबाहू निवडक दहा घोडेस्वरांना घेऊन वायुवेगाने पुढे निघून गेले. अगदी वळणाजवळ त्यांना चार घोडेस्वार दिसले. सुबाहूला पाहिल्या बरोबर त्यांनी आपले घोडे थांबविले. आणि म्हणाले

"सेनापति ! आम्हांला राजप्रतिनिधीने पाठविले आहे. आम्ही इकडे येत असतां. सर्पकेतू नावाच्या राजाच्या सैन्याने जवळच्या पाऊलवाटेने येऊन अडविले. तेथे आमची चकमक उडाली. आमच्या सैन्यांतील बरेचसे शिपाई मारले गेले. राजप्रतिनिधी आपल्या थोडयाशा घोडदलासह त्यांचा सामना करीत आहे. परंतु ते हळू हळू मागे हटत आहेत."

ते सैनिक पुढे बोलत होते. तेवढ्यांत काही घोडेस्वार पळत त्यांच्या रोखानेच येत असलेले त्यांना दिसले. त्यांत स्वत: धीरमल्ला हि होता. जवळ येतांच तो म्हणाला

“आपल्याला अगोदर आपल्या नगराच्या रक्षणासाठी थांबले पाहिजे. सर्पकेतू...."

असे काही तरी तो सांगत होता. तोच त्याची नजर चंद्रवर्मावर पडली. त्याला आश्चर्य वाटले. तो लगबगीने पुढे आला.

“महाराज" म्हणून चंद्रवर्माला आणि नमस्कार केला.

“धीरमल!" चंद्रवर्माने कुतुहल प्रगट केले.

“मला वाटले नव्हते की पुन्हां आपली कधी भेट होईल म्हणून, बरें पण आता आपल्याला बोलत बसावयास वेळ नाही. चल आपण नगराच्या रक्षणाची व्यवस्था करं." चंद्रवर्मा म्हणाला. धीरमल्लाने मागून पाठलाग करीत येणाऱ्या सैन्याकडे पाहिले. आणि म्हणाला

“महाराज, आपण आल्यामुळे परिस्थिति एकदम बदलणार. सर्पकेतूशी आता हे शेवटचेच युद्ध म्हणावयाचें. अफाट सेना घेऊन तो येत आहे. घोडदल तो इकडे घेऊन येत आहे. आणि पायदळाला त्याने डोंगराच्या पलीकडे ठेविले आहे. नगराच्या ऐवजी आपल्याला येथेच त्याला तोंड द्यावे लागणार आहे. आपल्याला सैन्य रचना केली पाहिजे."

असे म्हणून तो सुबाहूकडे वळला,

“सैन्याला त्या घाटीत घेऊन ये. घाटीतून लढण्यास सैन्य थोडे कमी असले तरी चालेल, पण निवडक लोकांना तेथे पाहाऱ्यावर ठेव."

असे सांगून तो चंद्रवर्माला घेऊन घाटीच्या तोंडाशी गेला. वाटेंत वीरपूर सोडल्यापासून काय काय झालें, ते चंद्रवर्माने धीरमल्लला थोडक्यांत सांगितले. धीरमल्लाने लक्ष देऊन तें सारें ऐकले आणि मोठ्या अदबीने म्हणाला

"महाराज, सुबाहूनें आपल्याला सर्व हकीगत सांगितलीच आहे. आम्हाला खरोखरच तऱ्हेतऱ्हेच्या संकटांना तोंड द्यावे लागले. मोठ्या पराकष्टाने एक एक संकट पार पडले. नंतर आम्ही राजा शिवसिंहाकडे नोकरी धरली. त्याने मला येथील राजप्रतिनिधि केलें आणि आम्हांला येथे पाठवून दिले. त्यांत आज अचानकपणणेच सर्पकेतूशी मुठभेड होत आहे. ते एका प्रकारे बरेंच म्हणावयाचे, कारण केव्हां ना केव्हां तरी आपल्याला त्या दुष्ट सर्प केतूशी युद्ध हे करावे लागणारच. मग ते आजच केले म्हणून काय झाले??”

“एकादा काय तो सोक्ष मोक्ष होऊन जाऊं दे. विजय मिळाला तर वाहवा आहेच. आणि जर मिळाला तर वीरगति तरी मिळेल? या शिवाय दुसरा मार्गच नाही.” 

"तुझे म्हणणे बरोबर आहे. आपण आपला देश आपला गांव सोडून किती तरी दिवस झाले. आणि अशाच त-हेने अजून उगाच किती दिवस भटकणार? तेव्हा होऊनच जाऊं दे एकदाचा काय तो निकाल. येऊं दे तुझी सारी सेना."

चंद्रवर्मान सम्मति दिली.

या दोषांचे बोलणे चाललेच होते इतक्यांत खिंडीच्या तोंडाजवळ कोलाहल ऐकू आले. तिकडे नजर फेंकतांच त्यांनी पाहिले की ह्यांचे शिपाई शत्रुवर बाण रोखून आहेत. आणि घोडेस्वार आपापले भाले घेऊन तुटून पडत आहेत.

"महाराज..! सर्पकेतू आपल्या सैन्यासह खिंडीत घुसण्याचा प्रयत्न करीत आहे. मला वाटते या अरुंद खिंडीत आपण जर त्याच्या वर दोन्ही तिन्ही बाजूंनी हल्ला चढाविला तर त्याचा जास्त उपयोग होईल. चला आपण दोघे दोन्ही बाजूंनी जाऊं."

म्हणत धीरमल्लाने आपल्या घोडयावर उडी मारली. त्याच्या पाठोपाठ चंद्रवर्माने देखील आपल्या घोड्यावर टांग मारली. धीरमल्लाने आपले सैन्य दोन ठिकाणी वाटून खिंडीत दुतर्फा उभे केले. सुबाहू तर तोडांशी शत्रूची वाट पाहात तयार होताच. अगदी डोळ्यांत तेल घालुन. त्याची दृष्टि चौफेर फिरत होती. इकडे सर्पकेतु खिंडीत घुसण्याचा प्रयत्न करीत होता. त्या प्रयत्नांत त्याचे सैनिक शत्रूच्या भाल्याला बळी पडत होते. त्यांच्या हातून सुटून जर कोणी आंत घुसला तर तो चंद्रवर्माच्या बाणाचा बळी होई आणि त्यातून सुटल्यांस धीरमल्ल हि दुसऱ्या बाजूने होताच, अशा त-हेनें फार भयंकर युद्ध सुरू झाले होते.

सगळे सैनिक या झटापटीत पडू लागल्यामुळे त्याला काळजी वाटू लागली. कारण शत्रु जवळ अफाट सैन्य होते आणि ह्याच्या जवळ जे थोडेसें होतें तें हि कमी होत चालले होते. जर सर्पकेतून आपली मोठी तुकडी आंत पाठविली असती तर चंद्रवर्माच्या सैन्याची धडगत नव्हती. ते दोघे विचारमश होते. इतक्यांत सर्पकेतूने उच्चारलेले हे शब्द त्यांच्या कानावर पडले.

"जो कोणी धीरमल्ल आणि चंद्रवर्मा यांचे डोके तोडून आणील त्याला एक लाख मोहोरा बक्षीस देईन. या प्रांताचा संपूर्ण अधिकार त्याला देईन. चला उत्साहाने पुढे चला. करा युद्ध."

अशा त-हेनें तो आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देत होता. बस. क्षणार्धात सर्व सैनिक खिंडीच्या तोंडाशी येऊन निकराने लढू लागले. प्रत्येक सैनिक आपल्याला इनाम मिळावे म्हणून आपापल्या परीने प्रयत्न करीत होता. एकमेकांना धकेबुके देत पुढे घुसण्याचा त्यांचा प्रयत्न चालु होता. चंद्रवर्मा, सुबाहूच्या मदतीला काही सैन्य पाठवून दिले परंतु तेवढ्याशा सैन्याने काय होणार होते.

सर्पकेतूचे अफाट सैन्य पुढे गेलेल्या सैनिकांना तुडवून पुढे चालले होते. चंद्रवर्मा आणि धीरमल्ल दोघेहि विचारांत पडले. त्यांच्या पुढे फार बिकट परिस्थिति उत्पन्न झालेली होती. चंद्रवर्माच्या मनात एक विचार आला. त्याने घोड्यावर टांग मारली आणि धीरमल्लाजवळ आला. म्हणाला

"आपण डोंगरावर चढून जाऊन सर्पकेतूच्या सैन्यावर पाठीमागून हल्ला करूं या आणि समजा खाली उतरणे शक्य झाले नाही तर वरूनच दगडांच्या आडून त्याच्यावर बाण सोई. अर्थातच सकेतूच्या काही सैन्याला मागे फिरावे लागेल. आपल्याला काही तरी करणे फार जरूरी आहे. कारण जर का सर्पकेतूचे सैन्य खिंडीत शिरले तर आपल्याला पळणे सुद्धा शक्य होणार नाही. मग फारच पंचाइत पडेल." धीरमल्ल म्हणाला.

चंद्रवर्मा काही तीरंदाजांना घेऊन सरपटत सरपटत मोठमोठ्या दगडांमधून वाट काढीत काढीत हळू हळू डोंगरावर चढला. तेथून त्यानें पलीकडच्या बाजूस आपली नजर फेकली. त्याची छातीच दडवून गेली समोर पाहिल्यावर त्याचा चेहेरा एकदम फिक्का पडला. एवढ्या अफाट सैन्याबरोबर आपला काय निभाव लागणार म्हणून लो मटकन खालीच बसला. प्रथम त्याचा धीर खचला. तो मनांत म्हणाला एवढ्या सैन्यांतून पळ काढण्याशिवाय आता गत्यंतर नाही. जाता जातां धीरमल्ल, सुबाहू आणि देव (त्या म्हाताच्या मांत्रिकाचा मुलगा) त्यांना बरोबर घेऊन जाऊन जंगलांत लपून राहणे एवढेच करणे शक्य आहे. त्या पुढील प्रश्न पुढे. असल्या विचारांनी त्याचे मन स्वत होऊ लागले. निराशा पूर्ण दृष्टीने त्याने समोर

त्याला पूर्वी ची आठवण झाली आणि एका एक त्याच्या मनात काही तरी विचार आला. क्षणभरांत तो उठून उभा राहिला. मनांतील सर्व धैर्य एकवटून जवळच असलेल्या एका उंच दगडावर उभा राहिला. अर्थातच खालील सैन्याची दृष्टि त्याच्याकडे वळली. ते आपसांत कुजबुजू लागले. इतक्यांत चंद्रवर्मा त्यांना उद्देश्यून म्हणाला.

“सैनिका, मी वीरपुरच्या राजा सूर्यवर्माचा मुलगा चंद्रवर्मा आहे. तुम्हाला माहीतच आहे की सर्पकेतूनें कशा निर्दयपणाने आमच्या वंशाचा नाश केला आणि गादीवर बसला. आता मला वाटतें आहे की माहिष्मती राजाच्या गादीवर यशोवर्धन राजाच्या मुलापैकी जगल्या वाचलेल्या तपोवर्धनाला बसवावे. जर त्याने हे मान्य केले नाही तर तुम्ही ज्याचे नांव सुचवाल त्याला बसवू. पण या कामी मला तुम्हा सर्वांची मदत पाहिजे. आपल्याला सर्वात अगोदर त्या कपटी, दुष्ट व क्रूर सर्पकेतूला संपविले पाहिजे. आणि हे काम मी मुख्यत्वे करून त्यांच्यावर सोपवितो जे बीरपुरचे अभिमानी आणि सच्चे हितचिंतक असतील. त्यांनी पुढे यावे आणि आपले काम करावे. सैन्यांतील बऱ्याच लोकांनी चंद्रवर्माचा आवाज ओळखला. ते चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले. ओळख पटतांच सैन्यांतून जयजयकार ध्वनि उमटला. ते गर्जना करूं लागले

“वीरपुरच्या महाराजांचा जयजयकार असो."

ताबडतोब युद्धाचा नूर पालटला सैन्यांत धक्काबुकी आणि पळापळ सुरू झाली. आणि पाहता पाहतां बरेच सैन्य चंद्रवर्माला येऊन मिळाले. तितक्यांत चंद्रवर्माच्या जय जय काराचे शब्द त्या सैनिकांच्या कानावर आले. ते तेथूनच उलट्या पावली परतले आणि त्यांच्यावर धावून गेले. ही संधि पाहून चंद्रवर्मा धीरमल्लाला म्हणाला

"मित्रा, ही वेळ गमावू नकोस. आत्तांच्या आत्तां तूं आपल्या सैन्यानिशी खिंडीच्या द्वारांतून हल्ला चढवीत मैदानांत जा. सर्पकेतूच्या सैन्यापैकी अर्धे अधिक सैन्य आपल्या बाजूने लढत आहे. या वेळीच सर्पकेतू आपत्या तावडीत सांपडू शकेल. नाही तर निदान त्याला मारून तरी टाकता येईल.”

सर्पकेतूला हे सर्व कळण्यास वेळ लागला नाही. धीरमल्लाचे सैन्य येण्या पूर्वीच त्याने आपल्या सैन्याला घाटीच्या प्रवेशद्वारा पाशी बोलाविले आणि आपण त्यांतील काही विश्वासू सैनिकांना बरोबर घेऊन तेथून पळ काढला. त्याचे सर्व सैन्य त्याच्या मागोमाग पळू लागले. चंद्रवर्माचे सैन्य पाठलाग करीत निघाले. सर्प केतूचे सैन्य वाट फुटेल तिकडे जंगलांत घुसले. त्यांतील काही सैनिक चंद्रवर्माच्या हाती लागले त्यांना त्यानें कैद केलें, पण सर्पकेतू मात्र त्याच्या हाती सापडला नाही. तो आपल्या सैन्यासह जंगलांत नाहीसा झाला.

सर्व सैनिक थकलेले होते. म्हणून चंद्रवर्मानें धीरमल्ल आणि सुबाहू याच्या सल्ल्याने युद्ध थांबविले. आणि त्यांच्याच विचाराने सर्पकेतूच्या शोधार्थ उत्तम अशा दहा सैनिकांना पाठविले. याला म्हणतात नशिबाचा फेर सर्पकेतू यशाच्या शिखरावर घेऊन कोसळला आणि चंद्रवर्माला यशाच्या शिखरावर चढावयास तीच संधि लागली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel