श्रीकृष्ण, जनक, वगैरे मोक्षार्थींनी निर्मम बुध्दीने युध्दे केली. परंतु महात्माजींनी सुरू केलेले सत्याग्रही युध्द, त्यांनी आरंभिलेली ही क्रांन्ति राजकारणात अपूर्व आहे. राजकारणांत महात्माजींनी दिव्य आध्यात्मिकता आज आणली आहे. ही पुढची पायरी आहे. हे नवीन दर्शन आहे. अधात्मांतील हा नवीन अनुभव आहे. महात्माजी जरी आले. आणि  म्हणून ते राजकारणाच्या रंगणांत आले. धर्मासाठी, राजकारण, सत्याच्या संपूर्ण दर्शनासाठी राजकारण, हा महात्माजींच्या दृष्टिकोनाचा विशेष बिंदु आहे. ज्याला मोक्षप्राप्ति करून घ्यावयाची आहे त्याला राजकारणापासून अलिप्त राहता येणार नाही असे ते म्हणतात. आणि मोक्षप्राप्ति म्हणजे तरी काय? मोक्षप्राप्ति म्हणजे 'संपूर्ण सत्याचे दर्शन' असे ते म्हणतात. सत्याचे हे दर्शन प्रेम व अहिंसा यांच्या द्वारा होऊ शकते अशी त्यांची श्रध्दा आहे. या सत्यदर्शनाच्या ध्येयप्राप्तीसाठी महात्माजींना राजकारणांत भाग घेणे का अवश्य वाटले याचा आपण विचार केला पाहिजे. एखाद्या मोक्षार्थीला, सत्यदर्शनार्थ तहानलेल्याला त्यासाठी राजकारणांत पडण्याची अपरिहार्य आवश्यकता वाटली असे उदाहरण इतिहासांत नाही. महात्माजींना असे दिसून आले की प्रत्येकाच्या जीवनांत राजकारण हे घुसलेले आहे. समुद्रांत ज्याप्रमाणे भूशिर शिरलेले असते त्याप्रमाणे हे राजकारण म्हणजे सत्ताधा-यांचे वर्तन एवढया संकुचित अर्थाने ते त्याच्याकडे बघत नाहीत. सत्ताधा-यांच्या पापपुण्यांत प्रत्येक प्रजानन भागीदार होत असतो. न्याय व अन्याय यासाठी प्रत्येक व्यक्ति जबाबदार आहे. जोपर्यंत राज्यसंस्था न्यायाने वागत आहे तोपर्यंत तिच्याशी सहकार करणे धर्म्य आहे. परंतु जर राज्यसंस्था अन्याय करीत असेल तर तिच्याशी असहकार करणे हेहि सत्यार्थी मनुष्याचे कर्तव्य आहे. सहकार व असहकार ही दोन्ही आपली कर्तव्ये ठरतात. आपण हरघडी सरकारला पाठिंबा देत असतो. सरकारला कर देऊन, सरकारचे कायदे पाळून, सरकारची नोकरी करून आपण पाठिंबा देत असतो. ज्यांना काही कर द्यावा लागत नाही, अशांनाहि स्वसंरक्षणासाठी राज्यसंस्थेवर अवलंबून राहावे लागते. म्हणून आपण राज्यकर्त्यांना त्यांच्या सर्व व्यवहारांत उचलून धरतो. त्यांना आपण साथ देतो, त्यांच्याशी सहकार्य करतो, मदत करतो. आपण सरकारला साहाय्य करतो; सरकारचे साहाय्य आपण घेतो. असा हा अन्योन्य संबंध आहे. प्रत्येक नागरिकाच्या जीवनांत याप्रमाणे राजकारणाचा कमी अधिक अंश आहे. महात्माजी राजकारण अशा व्यापक अर्थाने घेतात. राजकारणाचे धागेदोरे आपल्या जीवनात विणले जात असतात. त्यापासून दूर राहता येणार नाही. राज्यसत्तेला साहाय्य देण्याचा प्रश्न जेथे जेथे येतो तेथे तेथे राजकारण येतेच. राजकारण म्हणजे सरकारी नोकरी करणे व नेतृत्व करणे एवढाच नाही. राजकारणांत पडायचे म्हणजे 'पुढारी होण्यासाठी' असा अर्थ ते करीत नाहीत. ज्याला ज्याला म्हणून पापापासून मुक्त व्हावयाचे आहे त्याने अन्यायी राज्यसंस्थेशी असहकार केला पाहिजे. नाही तर त्या राज्यसत्तेच्या पापांत तो भागीदार होईल. मी अन्यायी राज्यांत असेन व मी जर मोक्षार्थी असेन तर त्या राज्यांतील कायद्यांचा भंग करणे माझा धर्म होतो. असहकार, कायदेभंग, या गोष्टींचा मला स्वीकार करावाच लागतो. मीच असहकार करावा एवढेच नाही; सर्व जनतेसहि मी बरोबर घेतले पाहिजे. जनतेची नैतिक उन्नति व्हावयास हवी असेल तर तिलाहि अन्यायी राज्यसत्तेशी असहकार करण्यास मी उद्युक्त केले पाहिजे. जितक्या मारून, अशा अनेक मार्गांनी आपण आपले गेलेले घरदार, हिरावून घेतलेले हक्क, यांना परत मिळवू पाहतो. परंतु विनवणीने मिळालेले घर, कोर्टकचेरीच्या द्वारा मिळालेले घर, थपडा मारून मिळालेले घर, ही तिन्ही घरे एकरूप नाहीत. जे घर विनवणीने मिळाले, त्यापेक्षा कोर्टाच्या मार्गाने मिळाले ते घर निराळे आहे; थपडा मारून मिळालेले घर, आत्मक्लेशाच्या मार्गाने मिळणा-या घराहून वेगळे आहे. महात्माजी म्हणतात, ''मी जे घर मिळवणार आहे ते तुमच्या घरांहून निराळे आहे. मी जे स्वराज्य आणून देणार आहे ते तुमच्या स्वराज्याहून निराळे आहे.'' ज्या प्रकारचे साधन असेल, त्या प्रकारचे साध्य शेवटी पदरांत पडते. साधनांची परिणति म्हणजेच साध्य. साधनांचे गुणदोष साध्यांत येतात. म्हणून निर्दोष साधने वापरावी म्हणजे निर्दोष ध्येय पदरांत पडेल. महात्माजी खडकावर बांधलेले भक्कम घर मिळवू पहात आहेत. वाळूवरचे, कोलमडणारे, क्षणभंगुर घर काय कामाचे?

साध्यासाठी साधनेंहि शुद्व व उच्च वापरा, अशी उच्च दृष्टि महात्माजींनी दिली आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel