गोविंदा गेला गाई चराया । राई गेली गौर्‍या वेचाया ।राईनी गौर्‍या वेचिल्या । राईनी तिरड्या रचील्या ।राई - "अर अर गोविंदा देवा । तिरडा उचलूं लागावा ।"गोविंदा धावत पळत । आला राईच्या जवळीं ।तिरडा उचलुन दिला । मोवरी पावा विसरला ।गोविंदा रडत फुंदत । गेला बापाच्या जवळीं ।गोविंदा - " आवो आवो माझ्या बापा । माझा बापची व्हाल ।राईच्या वाड्याला जाल । मोवरी पावा घेउनी याल।"बाप तेथून निघाला । गेला राईच्या वाडयालाअ ।बाप - "अग अग राई बाई । दे गोविंदाचा मोवरी पावा ।"राई - "तुम्ही कशाला आला मामजी ? ज्याचा त्याला धाडून द्यावा ।मोवरी पावा घेऊन जावा ।गोविंदा रडत फुंदत । गेला आईच्या जवळी ।गोविंदा रडत फुंदत । गेला राईच्या वाड्याला । उभा अंगणीं राहिला । गोविंदा बोलतो राईला ।गोविंदा - " दे माझा मोवरी पावा ।"राई - एवढं अंगण चढेल तवा । मग मी देईन मोवरी पावा ।"गोविंदा - " एवढं अंगण चढलों ग राई ।  दे माझा मोवरी पावा ।"राई - "एक पायरी चढेल तवा । मग मी देईन मोवरी पावा ।"गोविंदा - " एक पायरी चढलों ग राई । दे माझा मोवरी पावा ।"राई - " एवढी अंधूळ कराल तवा । मग मी देईन मोवरी पावा ।"गोविंदा - " एवढी आंघोळ केली राई । दे माझा मोवरी पावा ।"राई - " केशरी गंध ल्याल  तवा । मग मी देईनमोवरी पावा ।"गोविंदा - "केशरी गंध ल्यालो ग राई । दे माझा मोवरी पावा ।"राई - " एवढं जेवण जेवाल तवा । मग मी देईन मोवरी पावा ।"गोविंदा - "एवढं जेवण जेवलों ग राई । दे माझा मोवरी पावा ।"राई - " एवढा विडा खाल तवा । मग मी देईन मोवरी पावा ।"गोविंदा - " एवढा विडा खाल्ला ग राई । दे माझामोवरी पावा ।"राई - " एवढा पलग चढाल तवा । मग मी देईन मोवरी पावा ।"गोविंदा - " एवढा पलंग चढलो ग राई । दे माझा मोवरी पावा ।"
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel