काळ्या गाईचं दूध चांगलं । जेव तूं कृष्ण जेव तूं बाळ ।कृष्ण गवळ्याची राई । देग कृष्णाची चेंडूफळी ।चेंडुफळी झुगारली । जाऊन पडली कडम डहाळी ।चेंडूफळी उचलली । गोविंदा धावत पळत ।आला मातेच्या महालांत । दिली राईनें चेंडूफळी ।गेला गोविंदा खेळाया । चेंडूफळी या घेउनी ।डाव मांडिला खेळण्याचा । राई धावत पळत ।राई -  आम्हाला घ्या हो खेळांत । गोविंदा बाळ बोलत ।" नाही घेत खेळांत ।" "मी नाहीं दियाची खेळूनी।"आला बापाच्या महालाला । बापा धावत पळत ।राई बोलती झाली या । सांगू लागली बापाला ।बाप बोलाया लागला । "घेरे राईला खेळांत ।""नको आमुच्या खेळांत ।"हातांतली अंगुठी । देत झाली गोविंदाला ।"आतां येते मी खेळांत "। "ये ग अमुच्या खेळांत ।"दोघे लागले खेळायला । दोघे निघाले खेळूनी ।आले आपल्या वाडयाला । खेळ खल्लास झाला ।हारतुरा आणुन दिला ।राईच्या हातांत ।
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel