रांगोळी किंवा रंगवल्ली भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला......

रांगोळीची ही विशेषता तिला विविधता देते आणि तिच्या विभिन्न आयामांनाही प्रदर्शित करते. रांगोळीला सामान्यतः सण, व्रत, पूजा, उत्सव विवाह इत्यादी शुभ कार्यांत  प्राकृतिक रंगांपासून बनवले जाते. यामध्ये साधारण भूमितीय आकार असू शकतो किंवा देवी देवतांच्या आकृत्या. याचे प्रयोजन सजावट आणि सुमंगल आहे.घरातील स्त्रिया पहाटे दरवाजासमोर रांगोळी काढत किंवा अजूनही काढतात

कालच्या नकारात्मकतेला घालवून दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करायला शिकवणारी ही रांगोळी ....

सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले ....

रांगोळी म्हणजे रंगांच्या सहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला बरेच महत्व आहे.  

भारतीय संस्कृतीनुसार रांगोळी काढणे ही एक कला आहे

रांगोळीच्या रंगाप्रमाणेच तिला काढण्याचे प्रकार देखील वेगवेगळे आहे. पण सर्वत्र उठून दिसणारी अशी संस्कार भारतीची रांगोळी ही आपण जाणतोच.

संस्कारांनीयुक्त अशी बोटाने रेखाटलेली रांगोळी ....

हाताच्या  सर्व पाच बोटांना वेगवेगळ्या तत्वांशी जोडले गेले आहे अशा संपूर्ण पाच बोटांनी रांगोळी काढली की, पंचतत्वांचा समावेश होऊन ते चित्र पूर्ण होते.असेच असावे

रांगोळीतील विविध चिन्हांना देखील धार्मिक अनन्य साधारण महत्व आहे.
बिंदूपासून सुरु होवून  अनंतापर्यत...रेषा आकार चे प्रकटीकरण रांगोळीच्या माध्यमातून होते यामधे

*बिंदू : बिंदू हे बीजाचे प्रतिक आहे. बीजामध्ये पुनर्निर्मितीचे  बिंदू म्हणजे मातृत्वाचे प्रतिक
*सरळ रेषा : सरळ रेषा ही सरळ स्वभाव,चे प्रतिक आहे.
*स्वस्तिक : विश्वातील विविध हालचाली ज्या शक्तीमध्ये बनविल्या गेल्या आहेतयात अष्टदिशांचे दृढीकरण त्या महाशक्तीच्या रुपाचे  प्रतिक
*ओमित्येकारं किंवा ॐ : ब्रम्हाचे अक्षर आणि ध्वनिरूप प्रकटीकरण, ऋषीमुनींना विश्वातील आदी रूपाचा साक्षात्कार या चिन्हामध्ये झाला.
*शंख : शंख आणि त्यामधून निर्माण होणारा ध्वनी ओमकाराप्रमाणे असतो आणि तो द्विगुणीत असतो.
*चक्र : चक्र हे काळाचे प्रतिक आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ यांच्या परिवर्तनशील गतीचे हे प्रतिक आहे.
*पद्म : पद्म हे सौंदर्य, कोमलता, विमलता आणि पुनर्निर्माण करणाऱ्या शक्ती व स्वतः भगवती यांचे आसन आहे.
*सर्परेषा : सर्परेषा हे वळणाचे प्रतिक आहे. वायू आणि पाणी यांच्या वळणाचे रूप आहे. भौतिक ज्ञान-विज्ञान, सुसंस्कृतता, सभ्यता यांच्या मूळ विचारधारेत जी शांतता आणि समाधान आहे त्या धारणांच्या संक्रमणाचे हे प्रतिक आहे.
*कलश : कलश हे पंचमहाभूतांचे मूर्त स्वरूप आहे. म्हणूनच कलशाला विश्वाच्या रचनेचे प्रतिक मानल्या जाते.
*अर्धवर्तुळ : अर्धावर्तुळ हे धारणा शक्तीचे प्रतिक आहे.
*पूर्णवर्तुळ : पूर्णवर्तुळ हे पूर्णत्वाचे प्रतिक आहे.
*केंद्रवर्धनी : केंद्रवर्धनी हे विश्वातील अनंततेचे प्रतिक आहे.
*गोपद्म : हे सर्वकर्म समृद्धीचे प्रतिक आहे.
*शृंखला :भारतीय संस्कृतीचे मूळतत्व, सुसंस्कार तसेच धरणांची मालिका याचे प्रतिक म्हणजे शृंखला.

ही सर्व चिन्हे बोटाने रेखाटलेल्या रांगोळीत बघायला मिळतात मांग्लयाचे प्रतिक संस्कृती चे सादरीकरण मानवी मनाच्या आनंदमयी स्थिती चे दर्शन घडवणारी वास्तूतील नकारात्मकता दूर सारणारी अशी   रांगोळी ...संस्कृती चे मानवी मनाचे दर्पण.प्रत्येक प्रसंगाला आनंदी करणारी संस्काराची ओघ ळवती लकेर....रांगेत हातात हात पकडून जायला शिकवणारी   बिंदूची ओळ , आयुष्याच्या निर्मिती चे मूळ सांगणारी एक "प्रतिभा" व्यक्ती सापेक्ष असणारी  ...रांगोळी .... मानवी मनात रंगाची उधळण करणारी रंगवल्ली.. !!!

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel