आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!!
कोरोनाचे महामारी चे संकट लवकर दूर व्हावे!!
                           
                        *विठ्ठल*
                    *विठ्ठलविठ्ठल*
                *विठ्ठलविठ्ठलविठ्ठल*
            *विठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठल*
        *विठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठल*
*विठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठल*
    *विठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठल*
        *विठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठल*
        *विठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठल*
        *विठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठल*
        *विठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठलविठ्ठल*

आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या चार मासांच्या काळास 'चातुर्मास', असे म्हणतात.

मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. 
 दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. कर्क संक्रांतीस उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनास प्रारंभ होतो, म्हणजेच देवांची रात्र चालू होते. कर्क संक्रांत आषाढ मासात येते; म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस 'शयनी एकादशी' म्हटले आहे; कारण 'त्या दिवशी
देव झोपी जातात', अशी समजूत आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन उठतात; म्हणून तिला 'प्रबोधिनी (बोधिनी, देवोत्थानी) एकादशी' असे म्हणतात.' 'नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असतांना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो.' प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे', शास्त्र सांगते ....

*वार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः ।*
*व्रतेन न चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् ।।*

 .....मग जरा वेगळा विचार सद्यपरिस्थित  काही वेगळ देवून जाईल का असा विचार आला ..

 चातुर्मास कसा पाळावा?

तर आपल्यातला एक दुर्गुण पकडायचा

तो चार महिने सोडण्याचा प्रयत्न करायचा. समजा,आपण खूप रागावतोय. तर चार महिने रागावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करायचा. बरं...
आपण  कुठे नोकरीत वरच्या पदावर असाल, तर आपल्या हाताखालच्या लोकावर रागवावं लागत असेल .!
आई वडील असाल तर मुलांवर रागवावं लागत असेल अशा प्रसंगी किंवा इतर  जगताना वाट्याला व्यक्ती विषयी
 रागवताना राग फक्त चेहऱ्यावर असू दे,मनातून  नको ! आतून मन शांत असावे, राग हा सोंगाचा राग असावा 
पण एखाद्या च्या चुकीची जाणीवही त्याला देण्याइतपत असावा चंचल वा-यासारखा ....
जसे चातुर्मासात लोकांकडे गेल्यावर त्यांनी काही खायला दिले तर आपण म्हणतो नां? 
या पदार्थात कांदा नाही नां? माझा चातुर्मास आहे! जसा कांदा,लसूण अध्यात्मानं वज्र्य ठरवला आहे, असं मानतात
तसेच, जेव्हा जेव्हा  रागाचा प्रसंग येईल , तेव्हा तेव्हा  आपल्या  मनाला आठवण करून द्यावी की आपला चातुर्मास आहे ! राग आपल्यासाठी वर्ज्य आहे ! आपल्याला रागवायचं नाही ! असा नियम करून प्रथम पहिले चार महिने राग सोडावा ,
मग जर असा दुर्गुण पहिले चार महिने सोडता आला, तर तो....
 वर्षभर सोडण्याचा प्रयत्न केला तर 
वर्षभर साधलं तर जन्मभर सोडला जाईल 
असे इतर ही काही दुर्गुण..माणूस म्हटले कि काही न्यूनता आलीच .... रागाबरोबरच अहंकार पण हो पण  राग आणि अहंकार यात पुसटशी रेषा आहे ,  अहंकार आत्मकेंद्रित तर राग मनाची अवस्था परिस्थिती नुसार सापेक्ष तर काही अशा व्यसन , किंवा इतर सवयी अशा घातक गोष्टी सोडायचा प्रघात पाडला या चातुर्मासात..

चांगुलपणा टिकवून ठेवण्याचा कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न करणं स्वतः लाच समजावत  तर नकळत बदल होईल असा ही चातुर्मास पाळला गेला तर ....या महामारीमधे  काय करायला हवे न काय नको हे आपण शिकत आहोतच फक्त स्वतः त एखाद्या बदल घडवणं एखाद्या दुर्गुण मोडणे  
थोडक्यात स्वतः ची demerits वर विचार करणं अन् दरवर्षी या demerits मधून शिकून तोच दुवा घेत हे स्वाःचे संशोधन merits पर्यत पोहोचवून एखाद्या सिद्धांता सारखे आपण व्यक्ती म्हणून उठून दिसू  असा नियम चातुर्मासात उत्तम फल देवू शकतोच ....!!

चातुर्मासाचे पौराणिक महत्व नियम  जोपासता जोपासता  स्वतः त ही बदल करण्याचा प्रघात पडेल ....!!

व्यक्ती सापेक्षता आहेच...

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel