काही काही नाती, व्यक्ती मन दुखावून जातात कसे वागावे हा प्रश्न पडतो कुटू आठवणी समोर येतात अलिप्त detach होणं हाच उपाय

कुणाचा ही स्वभाव बदलू शकण्याचे औषध अजून तरी सापडले नाहीच तो बदलणे अवघड तो बदलूही नाहीच मग स्वीकारणे किंवा अलिप्त होणे च योग्य..

.अलिप्त होण्यात सुख आहे.... पाऊस पडल्यानंतर नीरभ्र आकाशासारखं मन स्वच्छ होईल.अलिप्तता 

प्रारब्धात ठरल्याप्रमाणे व आपल्या पूर्व कर्मानुसारच काही घेणे असेल किंवा आपण कोणाचं देणे लागत असू तेव्हांच त्या जीवाच्या भेटीचे प्रयोजन असते. ऋणानुबंध याबद्दल आपण बोललोच अनुभव हेच गुरु हा नियम... काळ हे उत्तर हा साधा सिद्धांत गृहीत धरला तर 

काही वर्षांपूर्वी कोणाच्याही आयुष्यात आपण डोकावणे, स्वाभाविक होतं, कारण व्यक्ती वेगळ्या होत्या, सगळं स्वच्छ मोकळ्या आकाशासारखं होतं.... आज परिस्थिती बदलली आहे.

विचार पटत नाहीत कोणी सल्ला मागत नाही, न मागता तो देऊही नाहीच काही न पटणाऱ्या गोष्टी विचारता येत नाही.... अलिप्तता 

रिक्त होण्यात सुख आहे...हे ही मी मागे बोलले 

दुःखाला delete करायला यायला पाहिजे, खूप कठीण आहे मान्य, मग पुढे  नाही जाऊ शकत .......पण पुढे जाताना सुखाच्या वळणावर  भूतकाळात दुःख देणारे वाटसरू डोकावताना त्यांचा ही सन्मान करत अलिप्त होता येणे गरजेचे....

 आणि
 
अशा वेळी कृष्णाचे चिंतन करावे...त्याने कधीही मागे वळून बघितलं नाही.... कधी वाटलं नसेल का कृष्णाला की देवकीला घट्ट मिठी मारावी आणि चार क्षण तिच्या कुशीत घालवावे...कधी गोकुळात जाऊन गोपिकांच्या घागरी फोडाव्या, मनसोक्त बासरीच्या मंद आवाजात सगळं विसरून जावं........मान्य आहे, कृष्ण परम परमेश्वर होता ... आपण कृष्ण होऊ शकत नाही.. अशक्य... आयुष्यात जर कधी अलिप्त व्हायचं असेल तर कृष्ण आठवा.... तो स्फूर्ती देईल........

कोणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही म्हणून कोणत्या तरी कारणाने काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर एखादे कारण घडते अन् जीव अलग होतात. अशी नाती खरंच अद्भुत असतात पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी. नात्यांमध्ये आस्था असावी पण आसक्ती नसावी कारण कोणीही कोणालाही सोबत घेवून जन्माला येत नसतं. आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार हे कायम लक्षात असू द्यावं तरच आसक्तीही निर्माण होत नाही.अलिप्त राहता येते यात नुकसान मात्र नक्कीच नाही.

आयुष्यात वेळ आली की अलिप्त होणंच  योग्य........
बघा विचार करून..!!

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel