ती एका शाळेची प्राथमिक च्या मुलांना शिकवणारी
शिक्षिका होती.
सकाळीच तिने मुलांची परिक्षा घेतली होती.
उत्तरपत्रिका तपासण्यासाठी तिने घरी आणल्या होत्या.
उत्तरपत्रिका वाचता वाचता तिला रडू कोसळले.
तिचा नवरा तिथेच पडून मोबाईल बघत होता.
त्याने रडण्याचं कारण विचारलं.
ती म्हणाली,
सकाळी मी मुलांना "माझी सर्वात मोठी इच्छा" या विषयावर लिहिण्यास सांगितले होते.
एका मुलाने इच्छा व्यक्त केली आहे की, देवा मला मोबाईल बनव.
हे ऐकून नवरा हसू लागला.
शिक्षिका म्हणाली, पुढे ऐका तर, मुलाने लिहिलय, जर मी मोबाईल बनलो तर.........
घरात माझी एक खास जागा असेल
आणि सगळेजण माझ्या आजूबाजूला असतील.
जेंव्हा मी बोलेन तेंव्हा सगळेजण मला
लक्ष देवून ऐकतील.
मला कुणी उलट बोलणार नाही, प्रश्न विचारणार नाही.
जेंव्हा मी मोबाईल बनेन, तेंव्हा पप्पा ऑफिस मधून आल्यावर थकले असले तरी माझ्यासोबत बसतील.
आई चिडली असली तरी मला रागावणार नाही, उलट माझ्यासोबत राहण्याचा प्रयत्न करेल.
माझ्या मोठ्या भावाच्यात आणि बहिणीच्यात माझ्याजवळ राहण्यावरुन भांडण होईल.
एवढच काय मी (मोबाईल) बंद
असलो तरी माझी चांगली काळजी घेतली जाईल.
आणि हो, मोबाईलच्या रुपात मी सगळ्यांना आनंद सुध्दा देवू शकेन.
हे सगळे ऐकल्यावर नवरा सुध्दा
थोडा गंभीर होवून म्हणाला, हे देवा...
बिचारा मुलगा, त्याच्यावर त्याचे आई-वडील जरासुध्दा लक्ष देत नाहीत.
शिक्षिका पत्नीने पाणावलेल्या
डोळ्याने नव-याकडे पाहिले आणि म्हणाली,
माहित आहे, तो मुलगा कोण आहे, आपल्या स्वतःचा मुलगा सोनू....!
विचार करा, हा सोनू तुमचा तर मुलगा नाही ना?
आजच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांसाठी आपल्याला वेळ मिळत नाही.
आणि जो मिळतो तो सुध्दा आपण टी.व्ही. पाहणे आणि मोबाईल वर खेळण्यात घालवणार असू तर...!
संवाद नाती यांचे महत्व पटवून देण्याचे दिवस ही बदलले आता सगळेच virtual भावनाशून्य एकमेकांशी जोडण्याची...केवळ स्पर्धा, सोय ,गरज ...केवळ...!
*आता या निबंधातील इच्छा थोडीफार पूर्ण होतेय सोनूला मोबाईल होता आलं नसलं तरी सोनूच्या हातात मोबाईल आला .. काळानुसार तत्व ही बदलायला हवीच गरज आहे आजची ..!!*
*आता या कोरोनाने तर मोबाईलच मुलांच्या जगण्याचा अविभाज्य भाग करुन टाकला मोबाईल नको नको म्हणत मोबाईलच हवा आता अशी गरज निर्माण झाली ....शाळा ही online झाली मुलं virtual अन् शिक्षकही..!!*
*या कोरोनाने शिक्षणाची वहिवाटही बदलायला लावली ...कदाचित मग पुढे निबंधाचे विषयही बदलले जातील ....सोनूला खडू किंवा फळा व्हावेसे वाटले तर नवल नाही .!
काळानुसार बदलायला हवंच!!*
©मधुरा धायगुडे