श्री मद्भगवतगीता एक पवित्र ग्रंथ महाभारतातल्या भीष्म पर्वानुसार भगवान श्रीकृष्णाला सांगितलेला संदेश या उपनिषदात बघायला मिळतो याची पार्श्वभूमी महाभारताचे युद्ध साधारण 3137इ.पूर्व महाभारत घडले असे वाचनात आहे. साधारण या गीतेच्या उपदेशानंतर 35वर्षांनी भगवान श्रीकृष्णाने आपला देह सोडला अन् कलियुगाला सुरुवात झाली 

.हरियाणातील कुरुक्षेत्रावर सुमारे पंचेचाळिस मिनीटे मार्गशीर्ष शुक्ल एकादशी ला जिला मोक्षदा एकादशी म्हणून ही संबोधले जाते हा गीताउपदेश केला ती ही गीता जयंती म्हणून ओळखली जाते. 

आपल्या कर्तव्यापासून अर्जुन भटकतोय हे कळल्यावर श्रीकृष्णानं त्याला हे ज्ञान दिले ती भगवद्गीता..
आपल्या सारख्या सामान्य माणसाला ती आजही मार्गदर्शन करत राहते.

आत्मसंयमयोग, कर्मयोग , ज्ञानविज्ञानयोगाचे विवेचन आपल्या दैनंदिन मनुष्य लक्षणांना समृद्ध करत मार्गदर्शक ठरते. एकूण १८ अध्यायात ७००श्लोक भक्तीयोगाचे ही मार्गदर्शन करतात.शरीरातील मागील आत्म्याचे दर्शन घडवत कर्मसिद्धांताची जाणीव करुन देतात.

पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार देखील - आठ प्रकारे विभागलेला हा मनुष्य  स्वभाव आहे. हे आठ प्रकारचे भेद , तेच मूळ स्वरूप परमेश्वर आहे  भगवान या शब्दाचा अर्थ  हिंदीत बोलायचे तर भगवान म्हणजे देखील भ- भूमी ग- गगन व- वायू न- मन असा ही करता येईल प्रत्येक गोष्टी ला काहीतरी संदर्भ अर्थ हे गीता शिकवते. 

सामान्य माणूस निराशेतून समस्येतून कर्तव्य कसूरतेतून बाजूला होत असेल तर या गीतेचे मार्गदर्शन सजगता आणते.ऋषीमुनींनी हे ज्ञान प्राप्त करुन त्याला वेद असे नाव दिले त्याचा अंतिम भाग म्हणजे उपनिषद भगद्गीता आजही मानवाला या उपनिषदाच्या रुपात समृद्ध करते.

बुद्धी च्या वरदानामुळे मानवाला यातील ज्ञान मिळते ते महर्षि वेद व्यासांनी या गीतेला संक्षिप्तरुपातून कारण बुद्धी ला ही मर्यादा आहेतच हे गृहीत धरुन सोप्या रुपात ते समजावे. पुढे मराठीत संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरांनी भावार्थदिपीका रुपात ते सुलभ केले.

आधुनिककाळात समानता हा शब्द जातीवर्णव्यवस्था असे शब्द आपण वापरतो पण भगवान श्रीकृष्णाने गीतेत ती याआधीच मांडली हे बघायला मिळते.

उदाहरणच द्यायचे तर छोटा प्राणी आणि बलाढ्य हत्ती यात ही समानता बघायला हवी हे गीता शिकवते कोकिळा सुंदर गाते म्हणून चिमणीच्या चिवचिवाटाला कमी लेखून चालणार नाहीच आसा आधार गीतेतून बघायला मिळतो.

एखाद्या भुकेलेल्यांना आपण अन्नदान करतो तेव्हा ते परमेश्वर चरणीच अर्पण करतो. असा विचार गीता देते.
कुणाला दुखावणे हे ईश्वराला दुखावण्यासारखेच आहे असा आधार गीता देते .उदाहरणच द्यायचे तर या आजच्या कोरोना महामारीचे ...कोरोनाग्रस्त रुग्णाकडे एका वेगळ्या मानसिकतेकडून बघितले जाते असे आपण मधे वाचत होतो तिथे ही या गीतेचा हा उपदेश लागू पडेल.

गीतेच्या सहाव्या अध्यायात आत्मसंयमयोगाचा उल्लेख मनुष्याच्या विविध लक्षणांचा अंतर्भाव प्रामाणिकपणा ...शत्रू -मित्रातील समानता जोपसण्याचा प्रयत्न मत्सराला जागा नसावी. दिव्यांग , आजारी , वृद्ध लोकांमधे ईश्वरीस्वरुपच बघण्याची शिकवण मिळते सर्वजातीधर्मात समानता हा विचार जोपासला गेला .
मदर तेरेसा हे त्याचे मूर्तिमंत उदाहरणच ...स्वामी विवेकानंद ..अगदी महात्मा गांधी ही या गीतेचा आधार घेत असे वाचनात आहे.

गीतेत अहंकाराला जागा नाही या अहंकाराचा नाश करण्यासाठी तर परमेश्वराला अवतार घ्यावा लागला असेच म्हणावे लागेल ,

गीतेच्या प्रत्येक अध्यायाला प्रत्येकाने  स्वतः शी जोडून बघितले तर कोणत्याही क्षणी मानाला उभारी मिळेल आत्मज्ञान वाढीस लागून आत्मविश्वास वाढीस लागेल.

यामधे अनेक विषयांचे आत्मज्ञान मिळते यात इतिहासाबरोबरच एकूण साठ विषयाचे आकलन सामान्य माणसाला जगण्यासाठी चे बळ देते , २ गरीबी , ३ श्रीकृष्णास शरण, ४ आत्मप्रबोधन, ५ स्वधर्मपालन, ६ बुद्धियोग, ७ स्थितप्रज्ञता, ८ कर्मयोग, ९ नित्यकर्म, १० लोकसंग्रह, ११ शासनपालन, १२ शत्रुसंहार, १३ जन्मकर्म, १४ कर्म-अकर्म, १५ प्राज्ञमुखें ज्ञान, १६ सांख्ययोग, १७ सदामुक्तता, १८ योगारुढ होणें, १९ समाधि अभ्यास, २० शाश्वत योग, २१ एकसूत्रता, २२ शरणता, २३ मोह त्यागून ज्ञानविज्ञान साधन, २४ संतत स्मरण, २५ भूत लय-उत्पत्ति, २६ बोधक्षयोदय, २७ ईश्वरी सत्त, २८ हरिभावना, २९ निष्काम भक्ति, ३० ईशस्मरण, ३१ विभूतिसंक्षेप, ३२ विभूतिविस्तार, ३३ ईश्वरी रूप, ३४ ईश्वरी रूपावलोकन, ३५ क्षमापनस्तोत्र, ३६ रूपविसर्जन, ३७ भक्ततुलना, ३८ सुलमसाधन, ३९ ईश्वरगुणगान, ४० क्षेत्राक्षेत्रशोधन, ४१ प्रकृतित्याग, ४२ निर्लिप्त आत्मता, ४३ त्रिगुण संसार, ४४ गुणमुक्तता, ४५ वृक्ष (अश्वत्थ) छेन्न, ४६ जीवात्मादर्शन, ४७ जीवनव्याघ्र, ४८ पुरुषोत्तम, ४९ दोन संपदा, ५० असुरवर्णन, ५१ शास्त्रीय संयमानें नरकद्वार टाळणें, ५२ श्रद्धाविभाग, ५३ स्वाभाविक गुण, ५४ आहार यज्ञाचारण, ५५ ॐ तत्सदर्पण, ५६ त्यागमीमांसा, ५७ कर्मनिर्णय, ५८ त्रिधावृत्ति, ५९ पूर्णसाधना व ६० अर्जुनबोध,या साठ आंगाचा समावेश
अठरा अध्यायातून विवीध योगाच्या माध्यमातून होत राहतो ते अठरा अध्याय ...

अध्याय १ - अर्जुनविषादयोग
अध्याय २ - सांख्ययोग(गीतेचे सार)
अध्याय ३ - कर्मयोग
अध्याय ४ - ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान)
अध्याय ५ - कर्मसंन्यासयोग
अध्याय ६ - ध्यानयोग
अध्याय ७ - ज्ञानविज्ञानयोग
अध्याय ८ - अक्षरब्रह्मयोग
अध्याय ९ -राजविद्याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान)
अध्याय १० - विभूतियोग(भगवंताचे ऐश्वर्य)
अध्याय ११ - विश्वरूप दर्शनयोग
अध्याय १२ - भक्तियोग(श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा)
अध्याय १३ - क्षेत्रक्षेज्ञविभागयोग
अध्याय १४ - गुणत्रयविभागयोग
अध्याय १५ - पुरुषोत्तमयोग
अध्याय १६ - दैवासुरसंपविभागयोग
अध्याय १७ - श्रद्धात्रयविभागयोग
अध्याय १८ - मोक्षसंन्यासयोग अठरावा अध्याय निष्कर्ष 

भूतकाळ भविष्य  वर्तमान अधिष्ठीत मानवी आयुष्य संचित कर्माचे फळ ....जे होते ते चांगल्यासाठी ...होईल ते ही चांगल्यासाठीच हाच आधार ...निराशेतून आशेकडे नेते हे श्री मद्भगवतगीता शिकवते असेच म्हणता येईल.

आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलण्यास मदत होते . प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडून काही घेण असेल किंवा आपण कोणाचं देण लागत असू तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीच प्रयोजन कळतं म्हणून फक्त आपण कर्म करत राहावं इतकंच!...फळ म्हणजे प्रारब्ध ते तो बघून घेतो. हेच गीता शिकवते असेच म्हणूयात

या सर्वाचा मूळ आधार भक्ती योग ..शेवटी सगळे श्रद्धा भक्तीवरच ... कारण सगळ्यात मोठी भक्तीच ...आणि ती करणारा भक्त ...म्हणजे आपल्यासारखा सामान्य मनुष्यच...!!!

आज गीता जयंतीच्या निमित्ताने एक सेवा या भावनेने मला माहित असलेल्या गीतेविषयीच्या काही गोष्टी ..मांडण्याचा केवळ एक प्रयत्न ....  गीताजयंती निमित्ताने भगवान श्री कृष्णाचरणी अर्पण

© मधुरा धायगुडे 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel