आषाढीचे वेध लागताच समोर येतो माऊली आणि तुकोबांचा पालखी सोहळा पायी चालण्याचा प्रदीर्घ प्रवास अखंड अव्याहत चालणारी परंपरा पढंरीची वारी ..,मात्र या परंपरेत कोरोना सावटाची झालर लागलेली बघायला मिळते आहे ..

आषाढसरी कोसळू लागताच  सावळ्या त्या विठुरायाच्या दर्शनाचे वेध लागतात सारा आसमंत विठुनामाच्या गजराने  प्रफुल्लित होतो पंधरा दिवसाच्या या प्रदीर्घ पारमार्थिक प्रवास यात्रा वारी  काही म्हणा भावना एकच अनुभवणारे असंख्य वारकरी आपल्या सांसरिक जबाबदाऱ्या चे नियोजन करुन वारीसाठी सज्ज होतात मात्र यावर्षी  मर्यादा चे महत्व सामाजिक अंतराचे महत्व लक्षात घेणे ही महत्वाचेच देव मानवाच्या मनात हीच भावना जपायला हवी .वारीचा अनुभव नामस्मरणाने आसमंततात लहरी उत्पन्न करेल अन् साक्षात सगुणरुपात विठुरायच अवतरेल ही इच्छा ही आगळीवेगळी वारी ठरवेल

वारी मानसरुपाने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकेल  असा साक्षात अनुभव वारकरी अनुभवतील
" कोरोना सावटाखाली "वारीचे प्रस्थान शासकीय नियमाबरहुकुम करताना नकळत  वारकरीची परीक्षाच पांडुरंग घेत नसेल ना असा विचार करुयात  

अव्याहतपणे वारीची वाट चालणाऱ्या त्या पाऊलांना होणाऱ्या वेदनांना कमी करण्याचे त्या पांडुरंगाने यावर्षी ठरवले अन् अनेक वर्षी च्या परंपरेत थोडी मर्यादा वजा सवलत देवून काळजी घेतली असा सकारात्मक विचार करणे योग्य.

मर्यादेचे उल्लंघन न करता मुखाने विठुनामाचा गजर, वारीत परंपरेनुसार घडणाऱ्या अनेक भक्तांच्या सेवा ते असा नामघोष करत कोरोनाबाधित मनुष्यांना मदतीचा आधार देत किंवा अशा महामारीमुळे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या मानवांना  मुक्त करत ,अन्नदान सेवा देत ,हा मानसवारीचा प्रवास अनुभवून महामारीच्या संकटात सापडलेल्या समाजाला मार्गदर्शन करुन मार्गस्थ करण्यास मदत करु शकतील हीच पंढरीची वारी प्रपंचाकडून परमार्थ कडे नेणारी आगळी वेगळी वारी...!

"वारी चुको न दे  कधी हरी "म्हणत पालखींनी पन्नास  लोकांच्या उपस्थितीत प्रस्थान ठेवले कोरोना सावटामुळे सामाजिक बांधिलकी चे  जतन करत ज्येष्ठ कृ सप्तमी ते आषाढी एकादशी पर्यतच्या प्रवासास सज्ज झाला असंख्य वैष्णवाचे प्रतिनीधित्व मोजक्याच वैष्णवांच्या साक्षीने हा प्रवास यंदा करावा लागला

वैष्णवांना यंदा मात्र वाटेत ह्या दर्शनाचा लाभ घेता येणार नाही मात्र विठ्ठलाप्रतीच्या त्यांच्या भावन त्यांना यात  सामील करुन घेणारच....

पालखीचा मुक्काम प्रस्थानानंतर दशमी पर्यत मंदिरात असला तरी विठ्ठल नामाच्या गजराने मंदिरातील स्पदंने  सारा आसमंत  भारावून टाकतील अन् दशमीला पंढरपूराकडे प्रस्थान करताना त्या विठुमाऊलीला नकळत सगुणरुपात आपल्या बरोबर अनुभवतील शेवटी भावना महत्वाची नियमांचे पालन करणे ही देखील एक सेवाच समजली तर कोरोनाच्या या महामारीला हद्दपार व्हावेच लागेल हा आशावाद दृढ करतील....

दिंड्या पताका ऐवजी मुखाने नामस्मरण हीच या पारमार्थिक सोहळ्याची जागृत जागरुकता यंदा म्हणावी लागेल ती भावाना त्याच्या पर्यंत पोहचली असेलच म्हणून वारीची सकारात्मकता
बघणेच यंदा योग्य ...

अशी ही यंदाची आगळीवेगळी आषाढवारी भान हरपत चाललेल्या मानवाला पुन्हा एकदा मार्गस्थ करण्यासाठी पांडुरंगाने ही आपला मार्ग तोच पण वहिवाट बदलायची ठरवली  अशी वाट दाखवणारी , "कोरोना "विषाणुला विष्षण करायला लावणारी , संकटातून संकटाचा उपाय शोधायला लावणारी यंदाची पंढरीची वारी इतिहासात आपली साक्ष ठेवून जाईल हे नक्कीच ....!!

© मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel