यश ,प्रसिद्धी ,मानसन्मान ,या जीवनावश्यकपेक्षा  सध्याच्या या विषाणूजन्य परिस्थितीत   "जीवनच" महत्वाचे यासाठी प्रत्येकाला समान संधी मिळून "आत्मनिर्भर" होता यायला हवे हेच खरे उदिष्ट जीवन वाचवण्यासाठी गरजा पूर्तीसाठी स्वावलंबी तर हवेच पण समाधानी असणं क्रमप्राप्त जगणंच अवघड होत चाललयं....!!!

पण माझे म्हणणे आयुष्यात अपयशी, लाचार  माणसांना "गरीब" म्हणणं पहिल्यांदा थांबवायला हवं "गरीब" शब्दप्रयोग अजूनच आत्मबल कमी करतो सहानुभूती निर्माण करण्याची सवय दृढ करत असावा ..असे माझे मत.....!!

पुन्हा एकदा महाभारत अनुभवतोय का आपण??  पाप पुण्याचा विचार ,स्वर्ग-नरक ,धर्म -अधर्म सध्याच्या भाषेत सुख-दुःख....याचा अर्थ नकळत लावला जातोय का स्वःतच्याच  जगण्याशी ...!!!

मागील काळात.प्रचंड अमानुष कृत्य स्त्रियांवरील अत्याचार घडले  .याचा बिमोड करण्यासाठी कुठेतरी "आता हे थांबायला हवं असा सूचक संकेत" ...असे हे कोरोनाचे संकट सहजच विचार आला ...!!!

".संकट येते तेव्हा त्याचा उपाय ही तेव्हाच जन्म घेतो फक्त त्यासाठी पुन्हा योग्य वेळच "...असा विचार मनात आला पण प्राप्त परिस्थितीत समानतेचे  समान संधीचे महत्व ही लक्षात येते ..कुणी काय घ्यायचे ज्याचा त्याचा विचार....एक प्रसंग मांडण्याचा प्रयत्न ....

एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता.

त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला.

"ये तुला प्रत्यक्ष दाखवतो."
देव म्हणाला.
 
त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं.

त्याने पहिला दरवाजा ढकलला.एका मोठ्या खोलीत प्रवेश केला.

एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती.

टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं.

त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं.

पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी भुकेलेली दिसत होती.
त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.

त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.

कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता

त्यांच्या यातनांना अंत नव्हता.

भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते.

"हा नरक आहे..."देव म्हणाला.

"चल आता स्वर्ग पाहू.

"ते दुस-या दारातून आत आले.

ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती.

तेच टेबल तेच खिरीचं भांडं.

भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे.

पण ही सगळी माणसे तृप्त
समाधानी व आनंदी दिसत होती.

आपापसात हसत आनंदाने राहत होती.

"मला कळत नाहीये"
संत म्हणाला,"सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दु:खी का??

"सोपं आहे..."देव म्हणाला
"या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत.

जेव्हा तुम्ही दुस-याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील

स्वत:च्या गरजांपेक्षा इतरांच्या इच्छा व आवश्यकतांना अधिक मान किंवा प्राधान्यक्रम देणे हे समूह यशाचे गुपित आहे!!!!

स्वर्ग किंवा नरक निर्माण करणे आपल्याच हातात....!!

खोली,खीर,टेबल आणि चमचा..या वस्तू समोर असताना त्या किती 4 कि ५ याचा विचार  नंतर  आधी त्या मिळविण्याचा प्रयत्न कसा हा  विचार  आपलाच हवा

गरीब-श्रीमंत हा भेद जावून ,.....
सगळ्यांना समान संधी..,.!!!
मला काय म्हणायचे हे लक्षात आले  असेलच....
व्यक्ती सापेक्षता आहेच

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel