तेजोवलय स्पदनं ( vibration) Aura असे शब्द सतत कानावर पडतात आणि हे खरय संगीतातील सा ही न कळणा-याला ही एखाद गाणं ऐकल तरी तरतरी येते वातावरण बदलते असा स्वानुभव मग संगीत आणि आरोग्य याचा ही संबध नक्कीच अगदी जगदीशचंद्र बोस या शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहेच वनस्पती वाढीवर संगीताचा परिणाम होतो तसेच मानवी आरोग्य मग वाचनीय माहितीचा आधार ....अन्  ही माहिती....चित्रपटगीते सर्वाना परिचीत त्याचा आधार ...पण प्रत्यक्ष राग ऐकणेच जास्त उत्तम ....

राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ
MUSIC IS MEDICINE

१ राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.

२ राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.

३ राग देसकार – उत्थान व संतुलन साधणारा.

४ राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.

५ राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग.

६ राग शाम कल्याण – मुलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.

७ राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा.

८ राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच मुलाधार उत्तेजित करणारा.

९ राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.

१०  राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.

११  राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.

१२ राग मालकंस – अतिशय शांत - मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा.

१३ राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रुत करणारा असा आहे.

१४ राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.

१५ राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा.

१६ राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.

१७ राग गौरी – शुध्द इच्छा, मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करण.

संगीतोपचार म्हणूयात मात्र डाँक्टरांचे उपचार मात्र थांबवू नयेत.

हृदयरोग

राग दरबारी व राग सारंग

१) झनक झनक तोरी बाजे पायलिया....
( मेरे हुजूर )
२) तोरा मन दर्पण कहलाए....  ( काजल )
३) बहुत प्यार करते है ,तुमको सनम...
( साजन )
४) जादूगर संय्या छोडो मेरी     ( नागिन).

विस्मरण

लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा

१) मेरे नयना सावन भादों ....
( मेहबूबा )
२)ओ मेरे सनम....( संगम )
३)दिल के झरोखे मे तुझको बिठाकर ...
( ब्रह्मचारी )
४) जाने कहा गये वो दिन ...
( मेरा नाम जोकर )

मानसिक ताण, अस्वस्थता

ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत
१) पिया बावरी....४:०२ ( खूबसूरत )
२)मेरे सूर और तेरे गीत ....३:११
( गूँज उठी शहनाई )
३)मतवारी नार ठुमक ठुमक चली ....६:२९
( आम्रपाली )
४) तेरे प्यार मे दिलदार ....४:०४
( मेरे मेहबूब )

रक्तदाब

हाय ब्लड प्रेशर साठी हळू ( धीमी गती ) चालीची ,तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात

उच्च रक्तदाब

१) चल उड़ जा रे पंछी ...
( भाभी )
२) चलो दिलदार चलो ....
( पाकीजा )
३) नीले गगन के तले...
( हमराज )
४) ज्योती कलश छलके ...
( भाभी की चूड़ियाँ )

कमी रक्तदाब

१) जहाँ डाल डाल पर ....
( सिकंदरे आज़म )
२) पंख होती तो उड़ आती रे ....

रक्तक्षय, अनिमिया

अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी.

१) खाली शाम हाथ आई है ....
( इजाजत )
२) आज सोचा तो आँसू भर आये ...
( हँसते जख्म )
३)नदियाँ किनारे ....
( अभिमान )
४) मैने रंग ली आज चुनरिया .....
( दुल्हन एक रात की)

अशक्तपणा

शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय ,उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंती वरील आधारित गाणी ऐकावी

१) मोहब्बत की राहों मे चलना संभलके ....

२) मनमोहना बड़े झूठे....
( सीमा )
३) साज हो तुम आवाज हूँ मै

पित्तविकार, अँसिडीटी

अँसिडीटीवर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत

१) छूकर मेरे मन को
२) तुम कमसीन हो नादा हो ...
३) आयो कहाँ से घनश्याम...
४) तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये

माहितीच्या आधारे संकलन करण्याचा प्रयत्न ...

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel