कोकिळेच्या मधुर स्वराने आलेली जाग

आलं घातलेला वाफाळणारा चहा

अंगणातला प्राजक्ताचा सडा,

सगळ्यात पहिल्यांदा आपल्याच हातात पडलेला पेपर ,

अवीट गोडी असलेलं ... लतादिदीच जनपळ भर ....म्हणतील हाय हाय ...
किंवा
"सुनो सजना पपीहे ने कहा सब से पुकारले के ...",

लिंबू पिळलेला आणि वरुन साजूक तूप घातलेला गरम गरम वरण भात

पुलं चं पुस्तक , त्यांचं पेटीवादन  ... त्यांचं कथाकथन,

सुमनताईंच हुळुवार आवाजातलं
"शब्द शब्द ...बकुळीच्या फुलापरी , "

बिस्मिल्लांचे सनईचे सूर ,

सुधीर फडके यांचं "धुंदी कळ्यांना …" भावगीत

सोनचाफ्याची फुलं

अगदी आपल्याला हवी तशी बनलेली कॉफी

थोडीशी तिखट भेळ , गरम भजी , चुलीवरची भाकरी , गरम हुरडा आणि चटणी

रातराणीचा सुगंध ,

गाण्याच्या मैफिलीत जागवलेली पौर्णिमेची रात्र ,

पहाटे दिसलेली शुक्राची चांदणी

अचानक नजरेला पडलेला भारद्वाज

आपण लावलेल्या गुलाबाला आलेली पहिली कळी

दवांत न्हाऊन निघालेली मोगऱ्याची फुलं …

सुख सुख म्हणतात ते हेच…

पडल्या पडल्या स्वतःतच रममाण होवून असंख्य  आठवणी ....मनात रुंजी घालत छान आपल्या तच राहवं असे हे दिवस वाटायला लागलेत हे ही एक सुखच अजून काय हा ही वेळ खास माझ्या साठी परमेश्वराने राखून ठेवला मजला मीच उमगायला लागले  ....माझ्या तली मी हरवून गेलेली पुन्हा गवसतयं हे सुख ही वेगळेच नकारात्मकतेत सकारात्मक होत होत ...
हा विचार करत आजचा दिवस ही छान सरला पुन्हा नव्या दिवसाची  चांगली सुरुवात तर नसेल ....
..... आणखी काय पाहिजे.....छोटी छोटी  सुख शोधाल तर जीवन जगाल  !!!

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel