्याला कधीही तिथं मिळाली नव्हती.

लग्न आणि लग्नातलं जेवण आटोपून तो आपल्या आलिशान कारमधून घरी परतायला निघाला.त्याच्या शहरापासून साधारण पंचवीस किमी.अंतरावर असतांना त्याला दुरुनच एक माणूस येणाऱ्या वाहनांना थांबवण्यासाठी हात देतांना दिसला.पण वाहनं न थांबता त्याला वळसा घालून जात होती.जसा सुबोध त्याच्याजवळ आला त्याला दिसलं की रस्त्यावर त्या माणसाशेजारीच एक बाईक आणि माणूसही पडला आहे.सुबोधला रहावलं नाही त्याने त्याच्याजवळ गाडी थांबवली.
"काय झालं?"खिडकीची काच वर करुन त्याने विचारलं
" दादा अँक्सीडंट झालाय.पोराला दवाखान्यात न्यावं लागीन"
वयाची सत्तरी उलटलेला तो म्हातारा थरथर कापत सांगू लागला
"एक मिनीट थांबा" त्याने गाडी साईडला घेतली
"अहो कशाला या भानगडीत पडता.एक तर रविवार मिळतो तर घरी चलून आराम करा ना"
बायको त्राग्याने ओरडली
तिच्याकडे दुर्लक्ष करुन तो खाली उतरला आणि म्हाताऱ्याकडे गेला.
"कसं आणि केव्हा झालं हे?"
"दादा मी आणि पोरगा गावाकडे जात होतो.ट्रकवाल्याने मागून धडक मारली आणि पळून गेला.म्या झाडीत फेकल्या गेलो मला कायबी झालं न्हाई पण पोराच्या अंगावरुन ट्रक गेला" म्हातारा आता रडू लागला.सुबोधने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाकडे नजर टाकली.बापरे!प्रकरण गंभीर दिसत होतं.तो पटकन खाली वाकला.आणि त्याची नाडी तपासली.नाडी सुरु होती.पटकन अँक्शन घेतली तर वाचूही शकला असता.त्याने उठून म्हाताऱ्याकडे पाहिलं.तो हात जोडून उभा होता.डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
"दादा अर्ध्या तासापासून गाड्यांना हात देऊ लागलो.कुणीच थांबत नाही.पोराला दवाखान्यात घेऊन चला दादा तुमचे लई उपकार होतीन"
सुबोधने क्षणभर विचार केला.मग झटकन चेंदामेंदा झालेल्या खटारा बाईकला रस्त्याच्या बाजुला टाकलं.मग म्हाताऱ्याच्या मदतीने त्याने त्याच्या पोराला गाडीच्या मागच्या सीटवर टाकलं.त्याच्या शेजारीच म्हाताऱ्याला बसवून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून त्याने गाडी सुसाट सोडली.गाडी चालवतच त्याने मोबाईल काढला.शहरात अँक्सीडंट हाँस्पिटल असलेल्या डाँक्टर मित्राला त्याने फोन लावला.
"शेखर सुबोध बोलतोय.इमर्जन्सी केस आहे.दवाखान्याबाहेर स्ट्रेचर तयार ठेव.ओ.टी. तयार ठेव.मी ब्लडबँकेला रक्त तयार ठेवायला सांगतो.पंधरावीस बाटल्या रक्त लागू शकेल.मी वीस पंचवीस मिनिटात पेशंटला घेऊन पोहोचतोय"
" सुबोध अरे आज रवीवार आहे आणि अँक्सिडंटची केस असेल तर पोलिसांना..."
" मी करतो सगळं मँनेज.तू फक्त तयार रहा.आणि तुझ्यासारखाच माझाही रविवार आहे.सो प्लीज बी फास्ट.माझ्या जवळच्या नातेवाईकाची केस आहे असं समज"
याच शेखरला सुबोधने हाँस्पिटलच्या उभारणीसाठी पाच लाख दिले होते.शेखरने त्याला फक्त दोन लाख परत केले होते.पण या उधारीवर बोलण्याची ही वेळ नाही याची जाणीव सुबोधला होती.

शेखर दिलेल्या शक्षक्षक्ष क्ष ब्दाला जागला.त्याने खरोखरच सगळी तयारी करुन ठेवली होती.त्या म्हाताऱ्याला बाहेरच बसवून त्याच्या पोराला आँपरेशन थिएटरमध्ये तो घेऊन गेला.रक्तदाब झपाट्याने कमी होत असल्यामुळे ब्लड ग्रुप तपासून त्याने रक्ताच्या बाटल्या मागवल्या.सुदैवाने ब्लड बँंकेत ओ पाँझिटिव्हचा भरपूर साठा होता.एक्सरेतून कमरेचं ,खांद्याचं,उजव्या पायाचं हाड तुटल्याचं त्याच्या लक्षात आलं.तिन्ही ठिकाणी आँपरेशनची गरज होती.
तातडीने हालचाल केल्यामुळे पेशंट धोक्याबाहेर असल्याचं थोड्यावेळाने सुबोधला शेखरने सांगितलं तेव्हा सुबोधला एकदम हायसं वाटलं.त्याने बाहेर येऊन म्हाताऱ्याला सांगितलं तेव्हा म्हातारा त्याच्या पाया पडू लागला.सुबोधने लगेच त्याचे हात धरले.
" देवाचे आभार माना काका,त्यानेच तुमच्या मुलाला वाचवलं.बरं घरी कळवलं की नाही?"
" दादा पोराकडेच मोबाईल व्हता तोबी तुटी गेला.कसं कळवू?"
"अरे बापरे!मग आता?"
म्हाताऱ्याने खिशातून एक छोटी मळकट डायरी काढली.त्याच्यातून छोटू या नावाचा नंबर त्याने सुबोधला दाखवला.
" याले फोन करा"
"हे कोण?"
"धाकला पोरगा हाये"
"ओके" सुबोधने स्वतःच्या मोबाईलवरुन तो फोन डायल केला.अपघाताची तीव्रता त्याने सौम्य भाषेत सांगितली.'काळजी करु नका' असं तीनतीनवेळा सांगितलं.
" दादा किती दिवस लागतीन आणि किती पैसे लागतीन हो?"म्हाताऱ्याने विचारलं.त्याच्या प्रश्नातल्या काळजीने सुबोधचं काळीज हललं.म्हाताऱ्याची काळजी खरंच समजण्यासारखी होती. आजकाल डाँक्टरकडे पेशंटला अँडमिट करणं म्हणजे कसायाच्या हातात बकरी सोपवण्यासारखं होतं.आपण डाँक्टर असल्यामुळे शेखरने अजून पैशाची मागणी केलेली नाही नाहीतर रक्ताची बाटली लावण्यापुर्वीच शेखरने पन्नाससाठ हजार जमा करायला लावले असते हे काय तो जाणत नव्हता?
"काका डाँक्टरांनी अजून तरी काही सांगितलं नाहिये पण महिनाभर तरी तुमच्या मुलाला इथं रहावं लागेल हे नक्की. पैशाचं मी विचारुन सांगतो.डाँक्टरसाहेब माझे मित्र आहेत.तुमच्या घरची मंडळी येईस्तोवर तुम्हांला कुणी पैसे मागणार नाहीत.पण घरच्यांना पन्नाससाठ हजार तरी आणायला सांगा"
म्हाताऱ्याचा च
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel