ोत्या. सुहासला ड्राइव्हिंगच प्रचंड वेड आणि त्यात गाडी म्हणजे जीवकी प्राण. सुहास नेहमी गमतीत म्हणायचा, "आपण दोन गोष्टींची खूप काळजी घेतो आयुष्यात, बायको आणि गाडी, जीव आहे आपला या दोघींवर" मालती फार मना पासून हसायची त्यावर.

"ए मालती ऐक ना"

"हं"

"लग्न करशील माझ्याशी?"

"का ?"

"सांग ना"

"अरे वेडा आहेस का ? पाच वर्ष झाली आपल्या लग्नाला"

"अगं मग काय झाल? पुन्हा करूया ना आपण लग्न, तेच आयुष्य नव्याने जगत राहायच गं"

"तू म्हणजे ना... तुझ्याशी शब्दात कोण जिंकेल?"

“ए सुहास थांब.. थांब..”

"काय ग? काय झालं?"

"ते बघ रस्त्यावर काहीतरी आहे"

पाल किंवा सरडा दिसावा असा कुठला तरी जीव प्रचंड आकांताने तडफडत होता. जवळजवळ एक फूट उंच वर उडत होता. गाडीच्या अगदी जवळ आला. सुहासने गाडी लगेच रिव्हर्स घेतली. दोघे खाली उतरले.

"अगं ते घोरपडीचं पिल्लू आहे"

ते पिल्लू खूपच जोरात तडफडत होतं नुकतीच त्याच्या अंगावरून गाडी गेली असावी बहुतेक. अचानक त्या पिल्लाने कुठलातरी पांढरा स्त्राव शरीरा बाहेर टाकला आणि तिची तडफड मंदावली, सुहासने गाडीतून पाणी आणलं. एका हाताने तो तिला पाणी देत होता आणि दुसर्यार हाताने त्याने मालतीला घ ट्टधरले होते. पिल्लाचे डोळे अजुन उघडेच होते, अंग धपापत होतं. तिच्यात जीव होता पण धडधड कमी झाली होती. सुहासने तिला अलगद उचलायचा प्रयत्न केला पण घोरपड उठत नव्हती. रस्त्याची पकड घट्ट होती तिची, पुन्हा गाडीखाली येऊ नये म्हणून सुहासने तिला रस्त्या कड्यालगतच्या गवतात ठेवलं.

"वाचलीच तर सुरक्षित असुदे."

सुहास तिला पुन्हा पाणी द्यायला गेला. पण तोवर त्या पिल्लाने शेवटचा श्वास घेतला होता.

"गेलंते"

"हं.. गेलं रे"

गाडी थांबल्यानं मालतीची तंद्री तुटली.

"कायगं काय झालं चेहऱ्याला? "

"काय होणार अजुन? काल इथे पगार झाला आणि घरी बोनस"

"आता कशानं मारलं?"

"हातानच की, दारूच्या नशेत काय कळतय तवा त्याला, जाऊ द्या तुम्ही नका टेन्शन घेऊ , माझं रोजचच हाय."

"ही फाइल सराना दे , बाकीचे रिपोर्ट्स मी मेल करते म्हणावं", सारिका फाइल घेऊन निघून गेली.

हिला कालही मार पडला. काय करू शकलो आपण? काहीनाही! नुसतीच हळहळ .. का वाटत राहते ही हळहळ? संपतही नाही.

ते घोरपडीचं पिल्लू अजूनही दिसत राहत.. काय केलं आपण त्याच्यासाठी? काहीच नाही, ना सारिका साठी, ना त्या पिल्लासाठी, आणि नाही सुहाससाठी. मालती खिडकी बाहेरच पाहत राहिली. बाहेरचं बदामाचं झाड सळसळत होतं. केबिनमध्ये एसी चालू असल्याने ते झाडही तिला आवाज नकरता नुस्तच हळहळल्या सारख वाटलं. लहानपणी वाटायचं ह्या बदामाच्या झाडाला बदामच्याच आकाराचे इवलेइवले लाल चुटूक चमचमणारे बदाम लागतात. झाड हलवलं की ते टपटप खाली पडतात.

कित्ती छान.....!!!!

कल्पनेनच तिला हसू आलं. इतक्यात बाजूच्या खिडकीवर धप्पकन आवाज झाला. काहीतरी आपटलं इतकंच कळलं. मालतील गबगीनं उठली. बाहेर उडणाऱ्या कबूतराला खिडकीची काच कळलीच नाही ते जोरात खिडकीवर आदळलं. मालतीने त्याला चोचीत पाणी दिलं. पंख जोरजोरात फडफडत होते, मान लुळी पडली होती, डोळ्यात करुणा दाटली होती. चोचीतलं पाणी आत जातच नव्हतं. थरथरत होतं नुसतं ते..मालतीने त्याच्या चोचीत पुन्हा पाणी दिलं. तोवर पंखांची थरथर थांबली होती. मालतीच्या डोळ्यात पाहातचं त्यानं जीव सोडला. मालती थरथरत उभी होती. डोळ्यात गच्च पाणी दाटले होते. कबूतराची उघडी चोच,त्याचे ते करूण डोळे..पुन्हापुन्हा तिला मागे नेत होते. कापऱ्या हातांनी ती उगाच कबूतराला कुरवाळत राहीली. असहाय्यपणे...

त्यादिवशी मालती जेवली नाही. तिला सुहासच वाक्य आठवलं, "अगं घडतात असे प्रसंग आयुष्यात पण माणसाच्या आयुष्यावर काय ? दिवसावर सुद्धा परिणाम होत नाही, दिवसाच्या अखेरी कुणी विचारलं की आपण काय म्हणणार, छान .. मस्त गेला दिवस.."

"असं नसतं सुहास,जीव कुणाचा जातोय यावर सगळं अवलंबून असतं....", तिने आवंढा गिळला.

निघताना उगाच तिने ऑफिसबॉयला विचारलं

"काय केलं रे कबुतराचं?"

"टाकलं झाडाच्या बुंध्याशी"

"अरे पुरायचं तरी ना"

"जाऊद्या ना मॅडम, तुम्ही कशाला मनाला लावून घेता एवढं, जीव गेलाय त्याचा", हं…बरोबर जीव गेलाय

त्याचा..आता कशाला कुणाला फरक पडायला हवा? त्या देहात आत्मा नाही..जीव नाही..चैतन्य नाही..अगदीच प्रॅक्टिकल भाषेत सांगायच झालं तर निरुपयोगी शरीर..निरुपयोगी घोरपड..निरुपयोगी कबुतर…आणि...निरुपयोगी सुहास....मालतीच्या कानात आवाज घुमला

"जाऊद्या ना मॅडम, तुम्ही कशाला मनाला लावून घेता एवढं, जीव गेलाय त्याचा"

मालतीने ट्रेन पकडली , आज तिला देशमुखांकडे जायचं होतं, वर्ष होतं आलं पण तिने अजून सुहासचा इन्शुरन्स क्लेम केला नव्हता. पण नुसत्या भावनांवर आयुष्य निभावता येत नाही हेच खरं...क्लेम मिळणारच नाही अशा वाटेव रहोता, मालतीला जाणं भाग होतं..इन्शुरन्स घेतला तेव्हा आपण कित्ती हसलो होतो.

"अरे तू कशाला जाशील? "

"कशाला म्हणजे तुझा कंटाळा आला की जाईन ,घे सही कर....", ह#285327345
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel