परीक्षक :- हे कडीतोडे तुला आवडतात का ?

मी :- हो.

परीक्षक :- कडीतोडयाखाली तुझे मनगट बघ कसे झाले आहे ते ?

मी :- ते काळे झाले आहे.

परीक्षक :- का काळे झाले आहे ?

मी :- तेथे घासता येत नाही. आंघोळीच्या वेळेस चोळता येत नाही.

परीक्षक
:- खेळताना, लिहिताना तुझ्या हातात जड नाही का वाटत ?

मी :- पहिल्याने वाटे; परंतु आता नाही वाटत.

हेडमास्तर
:- आणि मारामारीत, मस्तीत, दुस-याला त्यांनी मारताही येते !
त्याबरोबर सारे हसले. मुलेही हसली. मी लाजलो होतो.

हेडमास्तर :- श्याम ! अशी खाली मान नको घालू.

परीक्षक
:- तू भिऊ नकोस. का रे श्याम, दागिने कोण घालतात ?

मी :- बायका.

परीक्षक
:- परंतु तुलाही आवडतात. तू उद्या नाकात आणखी एक नथ घाल. कानात कुडी घाल. चालेल का ?

मी
:- मला नकोत. बायकांचे दागिने बायका घालतात. पुरुषांचे पुरुष घालतात.

परीक्षक :- श्याम ! दागिने घालणे चांगले आहे का ? तुला दागिने घातल्याने लोक चांगले म्हणतील की, तू चांगला वागलास तर चांगले म्हणतील ?

मी
:- मी चांगला वागलो तर.

परीक्षक
:- एखादा मुलगा चोरी करतो; परंतु त्याच्या बोटात अंगठया आहेत. त्या मुलाला कोणी चांगले म्हणेल का ?

मी :- नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel